चंद्रपूर : अंगणवाडी सेविकांना पोषण आहाराशी संबंधित माहिती भरण्यासाठी पोषण ट्रॅकर ॲप उपलब्ध करून दिले आहे. मात्र, या ॲपवर मराठी भाषा नसल्याने अंगणवाडी सेविकांना इंग्रजीमधून माहिती भरावी लागत आहे. त्यामुळे अनेक अंगणवाडी सेविकांची दमछाक होत असून, आधी इंग्रजी शिकवा, असे म्हणण्याची वेळ आली आहे.
अंगणवाडी सेविकांना
गावातील बालकांना दिल्या जाणाऱ्या पोषण आहारासंबंधी तसेच इतरही माहिती ऑनलाईन भरावी लागते. यासाठी अंगणवाडी सेविकांना मोबाईल पुरविण्यात आला असून, ही माहिती भरावी लागते. केंद्र शासनाच्या वतीने माहिती भरण्यासाठी काॅमन ॲप्लिकेशन साॅफ्टवेअरमध्ये पोषण ट्रॅकर ॲप देण्यात आले आहे. या ॲपमध्ये माहिती भरता येते. परंतु पोषण ट्रॅकर साफ्टवेअरमध्ये मराठी भाषेचा उल्लेख नाही. त्यामुळे इंग्रजी किंवा हिंदी भाषेतून माहिती भरावी लागते. प्रत्येक अंगणवाडी सेविकेला इंग्रजी भाषा पाहिजे त्या प्रमाणात येत नाही. अशावेळी त्यांना इंग्रजी येत असलेल्या एखाद्याचा आधारा घ्यावा लागत आहे.
बाॅख्स
जिल्ह्यातील अंगणवाड्या - २,६८४
एकूण अंगणवाडी सेविका -
बाॅक्स
पोषण ट्रॅकरवरील कामे
अंगणवाडी सेविकांना मोबाईलद्वारे पोषण आहार स्थिती, कुटुंब व्यवस्थापन, दैनिक आहार, गृहभेटी नियोजन, बालकाचे वजन, पोषण आहार नोंद, अंगणवाडी केंद्र व्यवस्थापन, मासिक प्रगती अहवाल, गरोदर महिला, स्तनदा माता, किशोरवयीन मुले, मुली, लसीकरण नोंद आदी सर्व माहिती भरावी लागते.
बाॅक्स
मोबाईलवरील अडचण वेगळीच
ग्रामीण भागात अनेक ठिकाणी मोबाईलला रेंज मिळत नसल्याने या कामात व्यत्यय येत आहे. विशेषत: मोबाईल रिचार्जसाठी पैसे मिळत नसल्याचेही अंगणवाडी सेविकांचे म्हणणे आहे. जिल्ह्यातील दुर्गम भागात आजही इंटरनेट सुविधा नाही. अशावेळी अंगणवाडी सेविकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. यासाठी रेंज असलेल्या ठिकाणी येऊन माहिती भरावी लागते.
बाॅक्स
आम्हाला इंग्रजी कशी येईल ?
शासनाची योजना प्रत्येक वेळी चांगलीच असते. मात्र, त्यासाठी पूर्वनियोजन आणि ग्रामीण तसेच दुर्गम भागाचा कधीच विचार केला जात नाही. त्यामुळे योजना चांगली असतानाही त्याची अंमलबजावणी करताना अडचणी जात आहे.
अंगणवाडी सेविकांना पोषण आहाराशी संबंधित माहिती भरण्यासाठी पोषण ट्रॅकर पुरविण्यात आले आहे. मात्र, गावांमध्ये कधी रेंज नसते. अशावेळी अंगणवाडी सेविकांनी काय करावे, हेच कळत नाही.
-अंगणवाडी सेविका
कोट
कोरोना संकट काळात अनेक अडचणींवर मात करून अंगणवाडी सेविकांनी काम केले. आता पोषण आहार तसेच इतर माहिती पोषण ट्रॅकरवर भरावी लागत आहे. मात्र, अनेकवेळा मोबाईलला रेंज नसते. कधी मोबाईमध्ये रिजार्च नसते. अशावेळी अडचणींचा सामना करावा लागतो.
-अंगणवाडी सेविका.