लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्हा परिषदेअंतर्गत कार्यरत प्राथमिक शिक्षकांच्या विविध समस्या प्रलंबित आहेत. याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांशी वारंवार चर्चा करुन निवेदने देण्यात आली. मात्र, त्याची कोणतीही दखल घेण्यात आली नाही. परिणामी समस्या सुटण्याऐवजी वाढतच चालल्या आहेत. त्यामुळे पुरोगामी शिक्षक समितीच्या नेतृत्वात शनिवारी जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन करण्यात आले. तसेच मागण्यांचे निवेदन शिक्षणाधिकाऱ्यांना देण्यात आले.वरिष्ठ वेतन श्रेणी मंजूर यादी तत्काळ प्रकाशित करुन वेतन निश्चित करावे, सदोष समायोजन तात्काळ करावे, पदोन्नतीने भरावयाची विस्तार अधिकारी रिक्त पदे तत्काळ भरावी, सहाव्या वेतन आयोगाचे पाच ही हप्ते खात्यात जमा करण्यासबंधी शिबिराचे आयोजन करावे, जिल्ह्यातील कार्यरत सर्व शिक्षकांचे सेवा पुस्तक अद्ययावत करुन पडताळणी करण्यासंबंधी शिबिराचे आयोजन करावे, पदवीधर, उच्चश्रेणी मुख्याध्यापक व केंद्रप्रमुखांची वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड श्रेणी मंजूर करावी, प्राथमिक शिक्षकांची निवड श्रेणी यादी प्रकाशित करुन आतापर्यंत किती शिक्षकांना निवड श्रेणी दिली गेली आणि पुढील निवड श्रेणी प्रतीक्षा यादी प्रकाशित करावी, शिक्षकांचे वेतन राष्ट्रीयीकृत स्टेट बँकेत करावे, यासह अन्य मागण्यांसाठी जिल्हा परिषदेसमोर आंदोलन करण्यात आले. त्यानंतर शिष्टमंडळातर्फे शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.यावेळी विजय भोगेकर, ससनकर, ठाकरे, कांबळे, वऱ्हेकर, रवी सोयाम यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.
शिक्षकांचे जि. प.समोर धरणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 04, 2019 12:21 AM
जिल्हा परिषदेअंतर्गत कार्यरत प्राथमिक शिक्षकांच्या विविध समस्या प्रलंबित आहेत. याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांशी वारंवार चर्चा करुन निवेदने देण्यात आली. मात्र, त्याची कोणतीही दखल घेण्यात आली नाही. परिणामी समस्या सुटण्याऐवजी वाढतच चालल्या आहेत.
ठळक मुद्देप्रलंबित समस्या सोडवा : पुरोगामी शिक्षक समिती