आॅनलाईन लोकमतनागभीड : आॅनलाईन कामांमुळे शिक्षकांमध्ये प्रचंड ताण निर्माण होत आहे. परिणामी शिक्षक आॅनलाईन कामे करणार नाही. अशा आशयाचे निवेदन नागभीड तालुका प्राथमिक शिक्षक संघाने संवर्ग विकास अधिकाऱ्यांना सोमवारी दिले.२२ नोव्हेंबर रोजी प्राथमिक शिक्षक संघाच्या झालेल्या सभेत यासंबंधीचा निर्णय घेण्यात आला होतात्न आॅनलाईन कामांमूळे शिक्षकांवर कामाचा मोठ्या प्रमाणावर ताण पडत आहे. त्याचबरोबर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसानही होत आहे. परिणामी आॅनलाईन काम हे शैक्षणिकदृष्ट्या मारकच ठरत आहे. असे शिक्षकांनी निवेदनात म्हटले आहे. त्यामुळे आॅनलाईन कामातून आम्हाला मोकळे करा, अशी मागणीचे निवेदन प्राथमिक शिक्षक संघटना नागभीडच्या वतीने संवर्ग विकास अधिकारी प्रकाश तोडेवार यांना दिलेल्या निवेदनातून केली. शिष्टमंडळात संघाचे अध्यक्ष संतोष आंबोरकर, शेषराव लोणारे, गजेंद्र जवंजाळ, गिरीधर नगरे, राजेंद्र दोनोडे, दिलीप बावणे उपस्थित होते .
शिक्षकांचा आँनलाईन कामावर बहिष्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 05, 2017 11:24 PM