चंद्रपूर : येणाऱ्या निवडणुकीत शिक्षकांचा प्रतिनिधी शिक्षकच असावा. तो राजकीय नसावा यासह
सर्वांना जुनी पेन्शन, समान काम, समान वेतन, एक तारखेला नियमित वेतन, अतिरिक्त शिक्षक समायोजन, डीसीपीएस, एनपीएस खात्याचा हिशोब, वरिष्ठ श्रेणी, निवड श्रेणीचे प्रशिक्षण निःशुल्क आयोजित करावे, सातव्या वेतन आयोगाचे प्रलंबित हप्ते, केंद्रीय कर्मचाऱ्यांप्रमाणे महागाई भत्ता द्यावा, या विषयांवर विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाच्या सहविचार सभेमध्ये चर्चा करण्यात आली.
बल्लारपूर येथील जनता विद्यालय, सिटी ब्रँचमध्ये सभा पार पडली. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका वहिदा शेख होत्या. संघटनेच्या ७५ वर्षांच्या इतिहासात विदर्भ माध्यमिक शिक्षक संघटनेने उमेदवारी प्रथमतःच चंद्रपूर जिल्ह्याला दिली आहे. यावर चर्चा करण्यात आली. सभेमध्ये सिनेट सदस्य दीपक धोपटे, प्राध्यापक राजेंद्र खाडे यांचा संघटनेच्या वतीने सत्कार करण्यात आला. जिल्हाध्यक्ष केशव ठाकरे व जिल्हा कार्यवाह श्रीहरी शेंडे यांनी आढावा सादर केला. याप्रसंगी लक्ष्मणराव धोबे, प्रमोद कोंडलकर, मारोतराव साव, डी.एन. जुआरे, एम.डी. कोपूलवार, मुख्याध्यापक बी.बी. भगत, शळानंद पोडे, मत्ते, चौधरी, अनिल वाग्दरकर, आशा पाटील, पर्यवेक्षक गंगाधर खिरटकर आदींची उपस्थिती होती. संचालन प्रमोद उरकुडे यांनी केले, तर प्रास्ताविक राजू निखाडे व आभार महेश पानघाटे यांनी मानले. सभेला राजू वानखेडे, चंद्रकांत पावडे, सुरेश पंदीलवार, पंकज मत्ते, एन.एन. टोंगे, डी.एल. कुबडे, रोहणकर, उदय रांगणकर, मिनमुले, चित्रा धकाते, पी.आर. सातपुते, एस.डब्ल्यू. गेडाम यांचे सहकार्य लाभले.