लोकमत न्यूज नेटवर्कब्रह्मपुरी : ग्रामीण भागातील विद्यार्थी स्पर्धेत येण्यासाठी त्यांना इंग्रजी भाषा अवगत होणे आवश्यक आहे. त्यासाठी तसे वातावरण निर्माण करण्याचे कार्य अध्यापनातून शिक्षकांनी तयार करावे व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या विकासाची कास धरावी, असे प्रतिपादन चंद्रपूर जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष कृष्णा सहारे यांनी केले.ब्रह्मपुरी पंचायत समिती शिक्षण विभागाद्वारा आयोजित तालुकास्तरीय इंग्लिश स्पोकन क्लब या कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.याप्रसंगी ब्रह्मपुरी पंचायत समितीच्या सभापती प्रणाली मैंद, उपसभापती विलास उरकुडे, संवर्ग विकास अधिकारी प्रदीप बिरमवार, सहायक विकास अधिकारी डॉ.चेतन जाधव हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यशाळेचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून नामदेव सहारे यांनी मार्गदर्शन केले.प्रास्ताविक डॉ.चेतन जाधव यांनी तर कार्यशाळेची रूपरेखा गटशिक्षणाधिकारी चंद्रकुमार नंदनवार यांनी सांगितली. यावेळी इतर मान्यवरांनीही समायोचित मार्गदर्शन केलेत. या कार्यशाळेत तालुक्यातील सर्व जि.प. शाळा, खासगी शाळा व कान्व्हेंट येथील प्रत्येकी एक अशाप्रकारे शिक्षकवृंद उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पंचायत समितीच्या शिक्षण विभागातील सर्व केंद्रप्रमुख, बिआरसीचे सधनव्यक्ती यांनी सहकार्य केले.
शिक्षकांनी विद्यार्थी विकासाची कास धरावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 07, 2017 12:42 AM
ग्रामीण भागातील विद्यार्थी स्पर्धेत येण्यासाठी त्यांना इंग्रजी भाषा अवगत होणे आवश्यक आहे. त्यासाठी तसे वातावरण निर्माण करण्याचे कार्य अध्यापनातून शिक्षकांनी तयार करावे व ग्रामीण भागातील ...
ठळक मुद्देकृष्णा सहारे : इंग्रजी विषयावर कार्यशाळा