लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : संपूर्ण भारतातून मिजल्स (गोवर) आणि रुबेला आजाराचे उच्चाटन करण्याची केंद्र व राज्य सरकारची भूमिका आहे. १०० टक्के लसीकरण करणे हेच आपले अंतिम ध्येय आहे. चंद्रपूर शहरातील १५ वर्षापर्यंतच्या शाळा वा शाळेबाहेरील विद्यार्थ्यांचे लसीकरण करण्याच्या नियोजनात शिक्षण विभागाचा सहभाग अतिशय महत्त्वाचा असून खासगी व शासकीय सर्व शाळांचे शिक्षक व मुख्याध्यापकांनी सहकार्य करावे, असे आवाहन महापौर अंजली घोटेकर यांनी सोमवारी केले.मनपाच्या आरोग्य विभागाने खासगी व शासकीय शाळांचे शिक्षक व मुख्याध्यापकांसाठी मनपाच्या राणी हिराई सभागृहात कार्यशाळा शाळा पार पडली.शिक्षकाचा मोठा प्रभाव विद्यार्थ्यांच्या मनावर असतो. ही भीती त्यांच्या मनातून काढण्यास, शिक्षकांची बरीच मदत होते. गोवर रुबेला लसीकरणासाठी शाळेने नोडल शालेय शिक्षकांची नेमणूक करावी. त्यांनी नाविन्यपूर्ण संकल्पना अमलात आणाव्या, आपल्या शाळेत नाटिका, वक्तृत्व स्पर्धा, वादविवाद, रांगोळी स्पर्धा, पोस्टर स्पर्धा, क्विझ, मेहंदी स्पर्धा आयोजित कराव्या. स्पर्धेद्वारे लसीकरणासंबंधी माहिती विद्यार्थ्यांना द्यावी. या स्पर्धा आयोजनाचे एक प्रोजेक्ट बुक बनवून पालिकेकडे सादर करावे, असेही सूचित करण्यात आले. मातोश्री विद्यालयात गोवर - रुबेला लसीकरणाची उत्तमरित्या जनजागृती करीत असल्याबद्दल महापौरांनी शाळेचे कौतुक केले.मनपा वैद्यकीय अधिकारी डॉ. अंजली आंबटकर यांनी प्रास्ताविकात ून गोवरच्या तुलनेत रुबेला हा आजार सौम्य आहे, परंतु गर्भवती स्त्रीला झाल्यास गंभीर परिणाम होऊ शकतात. आधी फक्त गोवरची लस देण्यात येत होती, आता गोवर रुबेला दोंन्ही रोगांसाठी एकच लस देण्यात येत आहे.भारतात आतापर्यंत २१ राज्यांमध्ये ही मोहीम राबविली गेली आहे. महाराष्ट्र हे २२ वे राज्य असणार आहे. संपूर्ण भारतात १५ वषार्खालील ४१ करोड बालके, महाराष्ट्रात ३.५० करोड बालके तर चंद्रपूर शहरात सव्वा लाख बालकांना ही लस देण्यात येणार आहे.जि. प. शिक्षणाधिकारी दीपेंद्र लोखंडे यांनीही मार्गदर्शन केले. शिक्षकांना माहिती गोळा करण्यासाठी फॉर्म्सचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी विस्तार अधिकारी अरुण काकडे, गणेश चव्हाण, मनपा शिक्षणाधिकारी नागेश नीत, डॉ. जयश्री वाडे, डॉ. विजया खेरा, डॉ. नरेंद्र जनबंधू, ग्रेस निठूरी, गणेश राखुंडे व इतर आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.
शिक्षकांनी विद्यार्थ्यांची भीती दूर करावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 01, 2018 11:15 PM
संपूर्ण भारतातून मिजल्स (गोवर) आणि रुबेला आजाराचे उच्चाटन करण्याची केंद्र व राज्य सरकारची भूमिका आहे. १०० टक्के लसीकरण करणे हेच आपले अंतिम ध्येय आहे. चंद्रपूर शहरातील १५ वर्षापर्यंतच्या शाळा वा शाळेबाहेरील विद्यार्थ्यांचे लसीकरण करण्याच्या नियोजनात शिक्षण विभागाचा सहभाग अतिशय महत्त्वाचा असून खासगी व शासकीय सर्व शाळांचे शिक्षक व मुख्याध्यापकांनी सहकार्य करावे, असे आवाहन महापौर अंजली घोटेकर यांनी सोमवारी केले.
ठळक मुद्देअंजली घोटेकर : गोवर-रुबेला लसीकरणाबाबत मनपात कार्यशाळा