शहरं
Join us  
Trending Stories
1
'काँग्रेसचा खरा चेरहा समोर आला', मल्लिकार्जुन खर्गेंच्या 'त्या' वक्तव्यावर PM मोदींचा घणाघात
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: काटेवाडीत पाडवा का साजरा करणार? अजित पवारांनी कारणच सांगितलं, म्हणाले...
3
"बाळासाहेब असते तर थोबाड फोडलं असतं"; अरविंद सावंतांच्या वक्तव्यावर CM शिंदेंची प्रतिक्रिया
4
ऐन दिवाळीत मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी दोन्ही पवारांची धावाधाव
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : सांगली विधानसभेत महाविकास आघाडीला धक्का! जयश्री पाटील निवडणूक लढवण्यावर ठाम
6
Maharashtra Election 2024: नाशिक पूर्वमध्ये थेट सामना; अन्य तीन मतदारसंघात तिरंगी, चौरंगी लढत
7
Muhurat Trading : मुहूर्त ट्रेडिंगनंतर तेजीसह बाजार बंद, 'या' १० शेअर्समध्ये जोरदार खरेदी, गुंतवणूकदारांनी कमावले ४ लाख कोटी
8
Mumbai Crime: फटाके फोडण्याच्या वादातून तरुणाची हत्या, मुंबईतील धक्कादायक घटना
9
जरांगेंच्या यादीला ओबीसींची यादी तयार, जो तो उठतोय त्यांनाच भेटायला जातोय; लक्ष्मण हाकेंनी रणशिंग फुंकले
10
किंग कोहलीची 'विराट' चूक; मैदानात थांबण्यापेक्षा चोरटी धाव घेण्याच्या नादात फसला (VIDEO)
11
पोस्टर'वार'! योगी आदित्यनाथ यांच्या 'बटेंगे तो कटेंगे'ला अखिलेश यादवांकडून पलटवार
12
भीषण! पाकिस्तानमध्ये मोठा बॉम्बस्फोट; ५ शाळकरी मुलं आणि एका पोलिसासह ७ जणांचा मृत्यू
13
'लॉरेन्स बिश्नोईने मला लवकर मारावे...', खासदार पप्पू यादव असं का म्हणाले?
14
IND vs NZ, 3rd Test Day 1 Stumps : फलंदाजांमुळे टीम इंडिया अडचणीत; ८६ धावांत गमावल्या ४ विकेट्स
15
"चुकीची चिठ्ठी काढणारा पोपट, आजपर्यंत...!"; शंभूराज देसाई यांचा संजय राऊतांना टोला
16
AUS vs PAK : "ऑस्ट्रेलियात पाकिस्तानने एक सामना जिंकला तर...", अक्रमने आपल्याच संघाची लाज काढली
17
मल्लिकार्जुन खरगेंनी कर्नाटक सरकारवर ताशेरे ओढले,मुख्यमंत्र्यांनी दिले स्पष्टीकरण; नेमकं प्रकरण काय?
18
ऐन सणासुदीच्या-निवडणुकीच्या काळात मावळ हादरले! पवन मावळातील ३० वर्षीय तरुणाची दगडाने ठेचून हत्या
19
Maharashtra Election 2024: दादा भुसे विरुद्ध अद्वय हिरे; दुभंगलेल्या शिवसेनेचे अस्तित्व पणाला
20
Washington Sundar वर का आली सहकाऱ्यांची जर्सी घालून खेळण्याची वेळ? जाणून घ्या त्यामागचं कारण

केंद्रप्रमुख होण्याच्या एकमेव संधीतही शिक्षक राहणार वंचित

By साईनाथ कुचनकार | Published: June 15, 2023 4:26 PM

केंद्रप्रमुख पदोन्नतीसाठी उपलब्ध होत असलेल्या या एकमेव संधीमधील अटीमुळे ते या पदापासून वंचित राहणार आहेत.

चंद्रपूर : केंद्रप्रमुख मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा २०२३ साठी कार्यरत प्राथमिक शिक्षकांसाठी वयमर्यादा व अन्य अटी लादण्यात आल्या आहे. यामुळे केंद्रप्रमुख होण्याच्या एकमेव संधीतही प्राथमिक शिक्षकांना वंचित रहावे लागणार आहे. या अटी कमी कराव्यात, यासाठी महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटनेच्या वतीने राज्य शासनाला निवेदन दिले आहे.

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांनी ५ जून रोजी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार केंद्रप्रमुखपदासाठी परीक्षा घेण्यात येणार आहे. यातील काही अटींमुळे कार्यरत प्राथमिक शिक्षकांवर अन्याय होणार आहे. प्राथमिक शिक्षकांना सेवेत असताना पदोन्नतीच्या अतिशय अल्प संधी उपलब्ध आहेत. सेवेत असताना शैक्षणिक पात्रता वाढवूनदेखील त्यांना पदोन्नतीची संधी मिळत नाही. केंद्रप्रमुख पदोन्नतीसाठी उपलब्ध होत असलेल्या या एकमेव संधीमधील अटीमुळे ते या पदापासून वंचित राहणार आहेत.

या परीक्षा आयोजनात सेवेत कार्यरत असलेल्या शिक्षकांसाठी ५० वर्ष वयोमर्यादा ठेवलेली आहे. ती रद्द करण्यात यावी. पदवीला ५० टक्के गुणांची अट कमी करण्यात यावी. अर्ज भरताना पदवी कधी प्राप्त केली याबाबत अट नसावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आल्या आहेत. यासाठी राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, शिक्षण विभागाचे प्रधान सचिव, शालेय आयुक्तांना राज्याध्यक्ष प्रसाद पाटील, राज्य सरचिटणीस हरिश ससनकर यांच्या स्वाक्षरीने निवेदन पाठविण्यात आले आहे.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रTeacherशिक्षक