चंद्रपूर : कोरोना संकटामुळे मागील दीड वर्षापासून शाळा भरल्याच नाहीत. दरम्यान, चालू शैक्षणिक सत्रात २८ जूनपासून शाळा सुरू होणार आहे. विद्यार्थ्यांच्या उपस्थितीबाबत शासनस्तरावर अद्यापही निर्णय झाला नाही; मात्र शाळांमध्ये किती शिक्षकांनी उपस्थित रहावे याबाबत शिक्षण संचालकांनी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. या सूचनानंतर शिक्षकांमध्ये संभ्रम वाढला आहे. दरम्यान, जिल्हा परिषद शिक्षण विभागाने शिक्षकांच्या उपस्थितीबाबत अद्याप तरी असे पत्र काढले नाही. त्यामुळे या पत्राची सध्या जिल्ह्यातील शिक्षक वाट बघत आहेत.
शिक्षण संचालकांच्या पत्रानुसार विदर्भ वगळता राज्यातील इतर ठिकाणच्या शाळा शिक्षकांसाठी १५ जूनपासून सुरु करण्यात आल्या आहेत. विद्यार्थी नसतानाही शिक्षकांना उपस्थित रहावे लागणार असल्यामुळे शिक्षकांमध्ये संभ्रम आहे. शाळांमध्ये येऊन काय करणार, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. विशेष म्हणजे, २८ जूनपासून विदर्भातील शाळा सुरु होणार आहे. यासंदर्भात विदर्भातील काही जिल्हा परिषदांनी शिक्षकांच्या उपस्थितीबाबत पत्र काढले आहे. मात्र चंद्रपूर जिल्ह्यात शिक्षण विभागाने असे कोणतेही पत्र सध्यातरी काढले नाही.
बाॅक्स
शिक्षण संचालकांचे पत्र
शिक्षण संचालकांनी प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा शिक्षकांच्या उपस्थितीबाबत १४ जून रोजी एक पत्र जारी केले. यानुसार इयत्ता पहिली ते ९ वी व ११ वीच्या शिक्षकांची ५० टक्के उपस्थिती शाळांत अनिवार्य करण्यात आली आहे. इयत्ता १० वी व १२ वीच्या शिक्षकांची तसेच शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची १०० टक्के उपस्थिती अनिवार्य करण्यात आली आहे. प्राथमिक, माध्यमिक शाळा मुख्याध्यापकांसह कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्यांची १०० टक्के उपस्थिती अनिवार्य राहणार आहे.
--बाॅक्स
जि.प.चे पत्र नाही
२८ जूनपासून शाळा सुरु करण्याच्या शिक्षण विभागाच्या सूचना आहेत. यामध्ये केवळ शाळा सुरू होणार असून शिक्षकांना उपस्थित रहावे लागणार आहे. विद्यार्थ्यांच्या उपस्थितीबाबत शासनाचे कोणतेही आदेश नाही. असे असले तरी जिल्हा परिषद शिक्षण विभागाने शिक्षकांच्या उपस्थितीबाबत अद्यापपर्यंत असे कोणतेही पत्र काढले नसून शिक्षण संचालकांच्या पत्रानुसारच शिक्षकांना उपस्थित रहावे लागणार असल्याची माहिती शिक्षण विभागाने दिली.
बाक्स
दोन शिक्षकी शाळांचे काय ?
शिक्षण उपसंचालकांच्या पत्रानुसार शिक्षकांची उपस्थिती अनिवार्य करण्यात आली आहे. असे असले तरी दोन शिक्षकी शाळांचे काय, असा प्रश्न सध्या उपस्थित केला जात आहे. विशेष म्हणजे, दोन शिक्षकी शाळांमध्ये सध्यस्थितीत उच्च श्रेणी मुख्याध्यापक नाही. त्यामुळे या शाळेत किती शिक्षकांनी उपस्थित रहावे, असे प्रश्न सध्या शिक्षक उपस्थित करीत आहेत.
बाॅक्स
जिल्ह्यातील शाळा -
जि.प.शाळा-
अनुदानित शाळा-
विनाअनुदानित शाळा-
शिक्षक-
शिक्षकेत्तर कर्मचारी-