चंद्रपूर : कोरोना संकटामुळे यावर्षी शाळा अद्यापही सुरू झालेल्या नाहीत. दरम्यान, दहावी तसेच बारावीच्या विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी काही दिवसांपूर्वी शाळा सुरू करण्यात आल्या. मात्र, आता या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्याच्या हालचाली सुरू झाल्यामुळे अभ्यासक्रम कसा पूर्ण होणार याची चिंता विद्यार्थ्यांसह पालकांना पडली आहे, तर दुसरीकडे शिक्षकांनाही अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी कसरत करावी लागणार आहे.
विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी यावर्षी प्रथमच ऑनलाईन शिक्षण सुरू करण्यात आले. त्यानंतर कोरोना संदर्भातील नियम पाळून वर्ग सुरू करण्यात आले. दहावी आणि बारावीचे वर्ष जीवनातील अत्यंत्य महत्त्वाचे असल्यामुळे विद्यार्थ्यी अधिक गंभीर होतात. एवढेच नाही तर शिक्षकही अतिरिक्त क्लास घेऊन त्यांच्या ज्ञानामध्ये सतत भर पाडतात. विशेष म्हणजे, विद्यार्थी आठ ते नऊ महिने कठोर मेहनत घेतात. मात्र, यावर्षी पाहिजे तशी शैक्षणिक वर्षाची सुरुवातच झाली नसल्याने आता विद्यार्थ्यांसह पालकांची चिंता वाढली आहे. विशेष म्हणजे, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना इंग्रजी हा विषय थोडाफार कठीण वाटणारा आहे. त्यामुळे याकडे विशेष लक्ष द्यावे लागते. सोबतच विज्ञानच्या विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिकांद्वारे अभ्यासक्रम पूर्ण करावा लागतो. यावर्षी ऑनलाईन अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे. मात्र, काही ठिकाणी मोबाईल रेंज मिळत नसल्यामुळे ते यापासून वंचित आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे यामध्ये मोठे नुकसान होत आहे.
बा्ॅक्स
दहावीचा अभ्यासक्रम
कोरोना संकटामुळे अभ्यासक्रम २५ टक्के कमी केला आहे. मात्र, उर्वरित अभ्यासक्रमही पूर्ण होण्याची शक्यता कमीच आहे. विज्ञान, गणित या विषयांसाठी विद्यार्थ्यांना शाळा, कालेजमध्ये जाणे अत्यावश्यक आहे. विशेषत: ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना इंग्रजी विषय समजून घेणे अवघड जाते. त्यामुळे प्रत्यक्ष शिक्षकांकडून शिकविणे महत्त्वाचे आहे. आता परीक्षा तोंडावर आल्या आहेत. त्यामुळे शिक्षकांना कसरत करावी लागणार आहे.
बारावीचा अभ्यासक्रम
दरवर्षी बारावीचा अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी आठ ते दहा महिन्यांचा कालावधी लागतो. यावर्षी २५ टक्के अभ्यासक्रम कपात करण्यात आला आहे. मात्र, प्रत्यक्षात वर्गात अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी अत्यल्प कालावधी शिल्लक आहे. ७५ टक्के अभ्यासक्रम पूर्ण कसा होणार, असा प्रश्न सध्या पालकांसह विद्यार्थ्यांना पडला आहे.
----
कोट
कोरोना संकटामुळे यावर्षी २५ टक्के अभ्यासक्रम कपात करण्यात आला असला, तरी अभ्यासक्रम पूर्ण करण्याचे आव्हान आहे.
आता नियमित वर्ग सुरू झाल्यामुळे अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी अडचण नाही. मात्र, तीनच तासिका घेण्याचे बंधन असल्यामुळे शिक्षकांना शिकविण्यासाठी वेळ पुरत नाही.
- प्राचार्य नरेंद्र बोबडे
अध्यक्ष, चंद्रपूर जिल्हा मुख्याध्यापक संघटना, चंद्रपूर
कोरोना संकटामुळे यावर्षी सर्वांचेच नुकसान झाले आहे. मात्र, यातूनही मार्ग काढणे गरजेचे आहे. दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना कमी वेळेत अभ्यासक्रम पूर्ण करावा लागणार आहे, तर शिक्षकांनाही कमी वेळेत विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम समजावून सांगावा लागणार आहे. कमी वेळेत योग्य नियोजन करणे गरजेचे आहे.
- धनंजय चाफले
प्राचार्य डायट
कोट
शाळा नियमित आणि पूर्णवेळ सुरू झाली तर अभ्यासक्रम पूर्ण होऊ शकतो. सध्या तीनच तास शाळा सुरू आहे. त्यामुळे यावर्षी अभ्यासक्रम पूर्ण होणार की नाही याची चिंता आहे. शिक्षक पूर्णपणे सहकार्य करीत आहेत.
दहावीचा विद्यार्थी
आता नियमित काॅलेज सुरू करून अभ्यासक्रम पूर्ण करणे गरजेचे आहे. ऑनलाईन अभ्यासक्रमामध्ये अनेक अडचणी येत आहेत. काॅलेजमध्येही तीनच तास होत असल्यामुळे अतिरिक्त क्लास घेऊन अभ्यासक्रम पूर्ण करणे आवश्यक आहे.