लोकमत न्यूज नेटवर्कभद्रावती : नुकत्याच पार पडलेल्या केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहीर यांच्या वैज्ञानिकांच्या बैठकीनंतर कापूस संशोधन केंद्र नागपूर येथील चार सदस्यीय चमू डॉ.गोतमारे (वैज्ञानिक) यांच्या नेतृत्वात नंदोरी येथे दाखल झाली.यामध्ये कीटकनाशकाचा मानवी शरिरावर परिणाम होऊन जी मनुष्यहानी होत आहे, ती टाळण्याविषयी त्यांनी मार्गदर्शन केले.बाहेर राज्यातून आलेली आर.आर. बिटी-ककक याच्या ५० टक्क्याच्या वर पेरण्या आपल्याकडे झाल्या आहे. परंतु आर.आर. बिटी-ककक ला आपल्याकडे मान्यता नसल्याने लोक व कृषी केंद्र संचालक चोरून त्याची लागवड करीत आहे. सदर प्रश्न नरेंद्र जीवतोडे यांनी केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहीर यांच्याकडे जावून उपस्थित केला. त्यानंतर बिटी-ककक ची लागवड आपल्या राज्यात केल्यास त्याचे दुष्परिणाम काय हे तपासून पाहण्यासाठी वैज्ञानिकांची बैठक घेवून नमुने घेण्याच्या सूचना देण्यात आल्या. त्यानुसार वैज्ञानिकांची चमू बिटी-ककक पाहण्यासाठी नंदोरी येथे दाखल झाली व अनेक शेतामधील नमूने घेतले. याप्रसंगी जि.प. कृषी सभापती अर्चना नरेंद्र जीवतोडे, तालुका कषी अधिकारी, जि.प. कृषी अधिकारी उपस्थित होते.
केंद्रीय कापूस अनुसंधान केंद्राची चमू नंदोरीत दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2017 11:13 PM
नुकत्याच पार पडलेल्या केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहीर यांच्या वैज्ञानिकांच्या बैठकीनंतर कापूस संशोधन केंद्र नागपूर येथील चार सदस्यीय चमू डॉ.गोतमारे (वैज्ञानिक) यांच्या नेतृत्वात नंदोरी येथे दाखल झाली.
ठळक मुद्देनागपूर येथील चार सदस्यीय चमू डॉ.गोतमारे (वैज्ञानिक) यांच्या नेतृत्वात नंदोरी येथे दाखल