शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
2
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
3
मृत्यूच्या १५ मिनिटं आधी सृष्टी आई, मावशीशी आनंदाने बोलली अन्...; कुटुंबीयांचा गंभीर आरोप
4
अजित पवारांची राष्ट्रवादी मोठा विस्तार करणार, दिल्लीतही निवडणूक लढणार; प्रफुल्ल पटेलांची मोठी घोषणा
5
'ये है मोहोब्बते' फेम अभिनेत्याचा झाला साखरपुडा, होणाऱ्या बायकोसाठी लिहिली सुंदर पोस्ट
6
“लिहून ठेवा, एक दिवस उद्धव ठाकरे कुटुंबाला घेऊन देश सोडून निघून जातील”: रामदास कदम
7
रोहित शर्माची ऑस्ट्रेलियन संसदेत 'बोलंदाजी'; शेअर केल्या ऑस्ट्रेलियन दौऱ्यातील खास गोष्टी
8
बच्चू कडू यांचे राणा दाम्पत्यास आव्हान; म्हणाले, "पुन्हा निवडणूक घ्या..."
9
मराठी सिनेमे डब का होत नाहीत? नाना पाटेकरांनी व्यक्त केली खंत; 'फुलवंती' चं नाव घेत म्हणाले...
10
EVM उत्पादक कंपनीने गुंतवणूकदारांना केलं श्रीमंत! अवघ्या २२० रुपयांचे मिळाले ३ लाख, सरकारचा आहे हिस्सा
11
पुण्याला हादरवणाऱ्या भयंकर घटनेवर आधारीत सिनेमा अखेर २२ वर्षांनी होतोय रिलीज, जाणून घ्या
12
शुक्र-अरुण ग्रहाचा नवपंचम योग: ६ राशींना वरदान, हाती लागेल घबाड; व्हाल मालामाल, शुभ-लाभ काळ!
13
सॅल्यूट! १६ व्या वर्षी लग्न, २ मुलांसह सासर सोडलं; कौटुंबिक हिंसाचाराशी लढून 'ती' झाली IAS
14
हेमंत सोरेन चौथ्यांदा बनले झारखंडचे मुख्यमंत्री, इंडिया आघाडीच्या नेत्यांच्या उपस्थितीत घेतली शपथ 
15
मी मोदी सरकारसोबत उभी ठाकणार; ममता बॅनर्जींचे भर विधानसभेत मोठे वक्तव्य 
16
Chhagan Bhujbal: देवेंद्र फडणवीस यांनी झोकून काम केलंय; ते मुख्यमंत्री झाले तर आनंदच होईल - छगन भुजबळ
17
बांगलादेशात अटक करण्यात आलेल्या चिन्मय प्रभूंशी इस्कॉनने संबंध तोडले; कोणत्याही कामासाठी जबाबदार नसल्याचे सांगितले
18
१५ हजार एकर जमीन, हजारो कोटी रुपये किंमत, पण वारस नाही, या राजघराण्याची मालमत्ता सरकारने घेतली ताब्यात
19
बांगलादेशातील इस्कॉनला मिळाला मोठा दिलासा! उच्च न्यायालयाने बंदी घालण्यास दिला नकार
20
'प्यार का पंचनामा' फेम लोकप्रिय अभिनेत्री झाली आई, लग्नानंतर दीड वर्षांनी आयुष्यात आली छोटी पाहुणी

-तरच टिकेल नैसर्गिक समतोल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 02, 2019 10:22 PM

वन व वन्यप्राण्यांचे संरक्षण, संवर्धन व जतन करण्यासाठी सर्वसामान्य जनतेमध्ये जागरूकता निर्माण केल्या जात आहे. परंतु, मानव आणि वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी प्रभावी उपाययोजनेची आज गरज निर्माण झाली आहे. यातूनच निसर्गातील समतोल टिकू शकतो.

ठळक मुद्देताडोबा समृद्ध जंगलाचे प्रतीक : मानव-वन्यजीव संघर्ष टाळण्यास हव्या योजना

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : वन व वन्यप्राण्यांचे संरक्षण, संवर्धन व जतन करण्यासाठी सर्वसामान्य जनतेमध्ये जागरूकता निर्माण केल्या जात आहे. परंतु, मानव आणि वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी प्रभावी उपाययोजनेची आज गरज निर्माण झाली आहे. यातूनच निसर्गातील समतोल टिकू शकतो.जंगलात वाघांचा अधिवास असणे हे समृद्ध जंगलाचे प्रतीक आहे. जगप्रसिद्ध ताडोबा व्याघ्र प्रकल्प यासंदर्भात लक्षवेधी ठरला. अन्नसाखळीतील वाघ हा मुख्यघटक आहे. वाघामुळे जंगलातील वनस्पती व इतर तृणभक्षी प्राण्यांमध्ये समतोल राखला जातो. वाघांची संख्या ज्या जंगलात अधिक ते जंगल किंवा तेथील परिसर परिपूर्ण मानला जातो. जंगल उत्कृष्ट असेल तर मानवी जीवन सुसह्य होण्यास कारणीभूत ठरते. वनसंपदेमुळे प्राणीमात्रांसाठी आॅक्सिजन, मुबलक पाणी व जमिनीची धूप थांबविण्यासही मदत होते. पर्यायाने जंगलासाठी सर्व वन्यजीव वाचविणे सर्वांचेच कर्तव्य आहे. वाघ हा नैसर्गिक जैविक साखळीतील महत्त्वाचा घटक आहे. व्याघ्र प्रकल्पासाठी घोषीत केलेले क्षेत्र हे निमसदाहरित जंगल असून ते दुर्गम व अति उतार, डोंगराळ व घनदाट असल्याने या भागात गवे, सांबर, रानडुक्कर व अन्य प्राण्यांचा संचार अधिक प्रमाणात असतो.अभयारण्य व व्याघ्र प्रकल्पाच्या विकासासाठी विविध योजना राबविताना यामध्ये मानवहित नजरेआड झाल्यास टोकाचा संघर्ष निर्माण होतो. वाघ व अन्य वन्यजीवांचे अस्तित्व कायम टिकविण्यासाठी प्रकल्प क्षेत्रात पोषक वातावरण तयार करावे. परिसरातील नागरिकांच्या कल्याणासाठी विविध योजना राबविणे, यामध्ये सुसंवादाची आज गरज आहे.निर्भरता कमी करावीवन परिसर, अभयारण्य व व्याघ्र प्रकल्प परिसरात राहणाऱ्या लोकांच्या गरजा भागविण्यासाठी कोर क्षेत्रावर अवलंबून राहावे लागते. ही स्थिती बदलविण्याची गरज आहे. गावकऱ्यांच्या दैनंदिन गरजा गावातच पूर्ण व्हावे आणि जंगलावरील निर्भरता कमी करण्यासाठी आवश्यकतेनुसार नवीन योजनांची आखणी केली पाहिजे.वाघांच्या अधिवास क्षेत्रात हवी सुधारणाव्याघ्र प्रकल्पाच्या माध्यमातून वाघांचे संनियंत्रण व संख्येत वाढ होण्यासाठी त्यांच्या अधिवासामध्ये सुधारणा करावी. वन्यजीव संवर्धनाकरिता केंद्र शासनाने सन १९७२ पासून विशेषतत्वाने राबविण्यात येत असलेल्या शासन पुरस्कृत योजनेअंतर्गत राष्ट्रीय उद्याने व अभयारण्यांचा व्याघ्र प्रकल्पामध्ये समावेश केला आहे. भारतीय अधिनियम १९२७ अन्वये वनक्षेत्र व वन्यजीवांचे संरक्षण करता येते. वन (संवर्धन) अधिनियम १९८० या कायद्यात वनक्षेत्रांचे कामासाठी उपयोगाबाबत अनेक तरतुदी आहे. यावर आधारीत वाघांच्या अधिवास क्षेत्रात सुधारणेसाठी पाऊल उचलण्याची गरज आहे.