शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
2
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
3
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
4
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
5
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
6
"देवेंद्र फडणवीस हे भारतीय राजकारणाचे भविष्य"; केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांचे विधान
7
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
8
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
9
"बंद सम्राटांना कायमचं घरात बंद करायची वेळ आलीय"; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

तंत्रज्ञानामुळे विद्यार्थ्यांचे भविष्य उज्ज्वल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2017 12:28 AM

आजच्या माहिती तंत्रज्ञानाच्या युगात प्रत्येक दिवशी नवनवीन ज्ञान उदयाला येत आहे. डिजिटल शाळांमुळे शिक्षण क्षेत्रात मोठी क्रांती झाली आहे.

संदीप गोडशेलवार : डिजिटल शाळेचे उद्घाटनचंद्रपूर : आजच्या माहिती तंत्रज्ञानाच्या युगात प्रत्येक दिवशी नवनवीन ज्ञान उदयाला येत आहे. डिजिटल शाळांमुळे शिक्षण क्षेत्रात मोठी क्रांती झाली आहे. डिजिटल शाळांमुळे विद्यार्थ्यांचे भविष्य उज्ज्वल झाले आहे, असे प्रतिपादन भद्रावती पंचायत समितीचे सहायक संवर्ग विकास अधिकारी संदीप गोडशेलवार यांनी केले.डिजिटल वर्गखोलीचे उद्घाटन गोडशेलवार यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गटशिक्षणाधिकारी रमण गुज्जनवार होते. यावेळी प्रमुख पाहुणे पंचायत समिती सदस्या अश्विनी ताजने, सुंदराताई कुळमेथे, सरपंच ग्रामपंचायत तिरवंजा सुनिता चन्ने, शिक्षण विस्तार अधिकारी मारोती रायपुरे, केंद्र प्रमुख, गणपत कारेकर उपसरपंच, राजू डाहुले अध्यक्ष शाळा व्यवस्था समिती, भास्कर ताजने, रवींद्र कारेकर, संजय राजूरकर, संभा वैद्य, राजू पेटकर, अर्चना पिंगे, माधुरी चौधरी, संजय कुळमेथे, ग्रामपंचायत सदस्य सरला चांदेकर आदी उपस्थित होते. प्रत्येक व्यक्ती तंत्रज्ञानाच्या साह्याने नवनवीन कल्पना, नवे अध्यापन, अध्ययन तंत्र विकसित करीत आहे. क्षणात आपणास पडलेल्या प्रश्नांचे उत्तर माहिती तंत्रज्ञानाच्या जोरावर सहज मिळवतो. या ज्ञानाचे स्रोत डिजिटल तंत्रज्ञानात आहे. डिजिटल शाळा अशाच डिजिटल शाळेचे उद्घाटन भद्रावती पंचायत समिती अंतर्गत घोडपेठ बिटातील तिरवंजा (मोकासा) येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा येथे झाले.यावेळी गटशिक्षणाधिकारी रमन गुज्जनवार म्हणाले की, जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा तिरवंजा ही शाळा भद्रावती तालुक्यातील उपक्रमशील व मुलांच्या जाणीव वृद्धिंगत करणारी, संस्काराचे मूल्य रूजवण करून बालकांचे अनुभव विश्व समृद्ध करणारी शाळा आहे. विविध नाविण्यपूर्ण उपक्रम राबवून ही शाळा सतत प्रगतीच्या दिशेने पाऊल टाकत आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेच्या मुख्याध्यापिका अल्का ठाकरे यांनी केले. संचालन जयश्री कांबळे यांनी आणि आभार प्रदर्शन वैशाली वडेट्टीवार यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता शशिकांत रामटेके, मान्चामवार, दिगांबर गोकटे व शाळेतील शालेय मंत्रिमंडळातील विद्यार्थ्यांनी प्रयत्न केले. (प्रतिनिधी)