जगदंब प्रॉडक्शनने त्याची या भूमिकेसाठी निवड केली असून या मालिकेत छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमिका खासदार व अभिनेते डॉ. अमोल कोल्हे साकारत आहेत.
या मालिकेचे चित्रीकरण मुंबई येथील दादासाहेब फाळके चित्रनगरी गोरेगाव येथे सुरू आहे. तेजसने आपले प्राथमिक शिक्षण नागभीड येथील ट्विंकल इंग्लिश स्कूलमधून पूर्ण केले असून माध्यमिक शिक्षण जनता विद्यालय नागभीड येथे तर उच्च माध्यमिक नेवजाबाई हितकारिनी विद्यालय ब्रह्मपुरी येथून पूर्ण केले आहे. बालपणापासूनच अभिनयाची आवड असलेल्या तेजसने औरंगाबाद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नाट्यशास्त्र विभागातून बी.पी.ए. (बॅचलर इन परफार्मिंग आर्ट) ही पदवी प्राप्त केली असून या आधी त्याने अनेक एकांकिका, नाटक, मालिका, शॉर्ट फिल्ममध्ये काम केले असून दिग्दर्शनसुद्धा केले आहे.
नागभीडसारख्या ग्रामीण भागातून तेजसने घेतलेली भरारी ही नव कलाकारांना प्रेरणा ठरत आहे. तेजस गावी आला की या क्षेत्रात येऊ पाहणाऱ्यांना मार्गदर्शन करतो.