शहरं
Join us  
Trending Stories
1
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
2
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
3
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेटपाटे मारावे लागतील”: संजय राऊत
4
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
5
महाराष्ट्रात मविआ सरकार आल्यास आरक्षणात मुस्लीम कोटा देण्यावर चर्चा; रेवंथ रेड्डींची गॅरंटी
6
मुख्यमंत्री नितीश कुमार एकुलता एक मुलगा निशांतला लाँच करण्याच्या तयारीत? चर्चांना उधाण
7
शर्वरी जोग नव्या मालिकेत झळकणार, अभिनेत्रीच्या खऱ्या आयुष्यातील 'मितवा' कोण माहितीये का?
8
जेठालालचंही मालिकेच्या निर्मात्याशी भांडण? थेट कॉलरच पकडली; नक्की प्रकरण काय वाचा
9
याला म्हणतात रिटर्न...! ₹2 चा शेअर ₹120 वर पोहोचला; 5 वर्षांत 5500% चा तुफान परतावा दिला; केलं मालामाल
10
RCB ची खतरनाक चाल! 'मुंबई'ला गतवैभव मिळवून देणाऱ्या चेहऱ्यावर खेळला मोठा डाव
11
फक्त या ४ गोष्टी वर्ज्य करून गायकानं घटवलं १३० किलो वजन, ट्रान्सफॉर्मेशन पाहून व्हाल हैराण
12
कोण आहेत अयातुल्लाह अली खामेनेई यांचे पुत्र मोजतबा? जे होऊ शकतात इराणचे पुढील सर्वोच्च नेते
13
दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा
14
ना बाबा रामदेव, ना आचार्य बालकृष्ण? कोण आहे ₹67535 कोटींच्या पतंजलीचा खरा मालक? योगगुरूंनीच सांगितलं...
15
बुलढाण्यात शिवसेना उमेदवाराला पाठिंबा दिल्याचं पत्र खोटं; राष्ट्रवादी काँग्रेसनं दिलं स्पष्टीकरण
16
यशाच्या शिखरावर असताना लग्न का केलं? माधुरी दीक्षित म्हणाली, "मी माझं स्वप्न..."
17
रूकेगा नहीं... इस्रायलचे लेबनानवर हल्ले सुरूच, हिज्बुल्लाच्या मुख्य प्रवक्त्याचा केला खात्मा
18
175 किमीची रेंज देणारी 'ही' इलेक्ट्रिक बाईक, किंमत 90 हजारांपेक्षा कमी
19
Numerology: ‘या’ ५ मूलांकांवर दत्तकृपा; गुरुपुष्यामृत योगावर अपार लाभ, लक्ष्मी शुभच करेल!
20
Vastu Tips: आजारमुक्त वास्तु ठेवण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या वास्तुटिप्स!

बाबांच्या श्रमसंस्कार छावणीची सांगता

By admin | Published: May 28, 2016 1:13 AM

राष्ट्रसंतांच्या संदेशाचा व विचारांचा अंगीकार करीत सोमनाथ लगतच्या कुष्ठधाम परिसरात सहभागी झालेल्या शेकडो युवक-युवतींच्या श्रमसंस्कार छावणी शिबिराची सांगता झाली.

तापमानावर उत्साहाची मात : देशभरातील शेकडो युवक-युवती सहभागीमूल : राष्ट्रसंतांच्या संदेशाचा व विचारांचा अंगीकार करीत सोमनाथ लगतच्या कुष्ठधाम परिसरात सहभागी झालेल्या शेकडो युवक-युवतींच्या श्रमसंस्कार छावणी शिबिराची सांगता झाली.देशाचा आधार असलेल्या युवकांना श्रमाचे महत्व कळावे, श्रमदानातून एक कल्पना साकार होवून त्याचा उपयोग इतरांना व्हावा, हा उद्देश समोर ठेवून ज्येष्ठ समाजसेवक बाबा आमटे यांनी श्रमसंस्कार छावणीची मुहूर्तमेढ रोवली. वरोरा येथील महारोगी सेवा समितीद्वारा दरवर्षी उन्हाळ्यात सदर शिबिराचे आयोजन करण्यात येते. सूर्याची दाहकता दिवसेंदिवस वाढत असताना राज्याच्या ३३ जिल्ह्यातून सहभागी झालेले ५७० युवक-युवती आणि काही वयस्क मंडळी बाबांनी दिलेला ‘हात लगे निर्माण मे, नही मारणे-नही मांगणे, या नाऱ्याला ओ देत शिबिरात सहभागी झाले. गाव, मित्र, कुटुंब, आरामदायी जीवन, आपसातील मतभेद आणि उन्हाळ्याच्या दिवसात घेतल्या जाणाऱ्या गार हवेला दूर सारून शेकडो किलोमीटर अंतरावरील निसर्गरम्य परिसरात रखरखत्या उन्हात ही मंडळी श्रमदानात रमून जात होती. लगतच्या पडझरी गावात गटार व रस्त्याची स्वच्छता आणि प्रकल्पाच्या परिसरात तलावाचे खोलीकरण व शेतीची मशागत करून बाबांच्या स्वप्नांना मूर्तरूप देण्याचा प्रयत्न करण्यात आला.शिबिराची सुरूवात डॉ. भारती आमटे यांनी ध्वजारोहण आणि बाबा आमटे तथा साधनाताई आमटे यांना आदरांजली वाहून केली. यावेळी शिबिरार्थी युवकांनी भारत जोडोची गिते गावून बाबांच्या आठवणींना उजाळा देत वातावरण भारावून टाकले. सिंधुदुर्ग आणि वाशिम जिल्हा वगळता राज्याच्या सर्वच जिल्ह्यातील जवळपास ५७० शिबिरार्थी शिबिरात सहभागी झाले होते, श्रमदानानंतरच्या दुपारच्या बौद्धिक सत्रात डॉ. विकास आमटे यांनी आनंदवन एक प्रयोग, प्राचार्य सोमनाथ रोडे यांनी बाबा आमटे आणि युवक या विषयावर तर कौस्तुभ आमटे यांनी समाजभान अभियानाची माहिती देऊन युवकांना ग्रामीण भागात काम करण्याचे आवाहन केले. सायंकाळच्या सांस्कृतिक कार्यक्रमात राज्यभरातून आलेल्या शेकडो शिबिरार्थ्यांनी आणि आनंदवनातील अंध व अपंग बालकांनी स्वरानंदवन सादर करून कलेचा अविष्कार दाखविला. जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप दिवाण, उपविभागीय पोलीस अधिकारी बाबाराव महामुनी, उपविभागीय अधिकारी मनीषा दांडगे यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांनी शिबिरास भेट देऊन शिबिरार्थ्यांचे मनोधैर्य वाढविले. शिबिरादरम्यान बाबांच्या कार्याचा परिचय होण्याच्या उद्देशाने प्रकाशवाट आणि आनंदवन यावर आधारित चित्रप्रदर्शनी व माहितीपट दाखविण्यात आला. महाविद्यालयीन युवक-युवतीशिवाय सदर शिबिरात डॉक्टर, वकील, इंजिनिअर, चार्टर्ड अकाऊंटंट, प्राध्यापक, शिक्षक आणि सामाजिक कार्यकर्ते आदी विविध क्षेत्रातील वयस्क मंडळी सहभागी झाली होती.शिबिर काळात शिस्तबद्धता आणि गैरसोय टाळण्यासाठी शिबिरार्थ्यांचा गट निर्माण करून श्रमदान केले. शिबिराचा समारोप डॉ. विकास आमटे यांच्या उपस्थितीत वृक्षदिंडीने झाला. यावेळी शिबिरार्थ्यांना रोपांचे बियाणे वितरित करून वृक्ष संवर्धनाचे आवाहन केले. डॉ. विकास आमटे आणि डॉ. कौस्तुभ आमटे यांच्या मार्गदर्शनात शिबिर संयोजक रवींद्र नलगंटीवार, हरिभाऊ बढे, अरुण कदम, विजय जुमडे यांनी प्रयत्न केले. (तालुका प्रतिनिधी)