बॉक्स
धोक्याची सूचना देणारे कुणीही नाही
जिवती व कोरपना तालुक्यात १२ पेक्षा अधिक धबधबे आहेत. पावसाळ्यात तेथील दृश्य नयनरम्य असते. पर्यटनाच्या दृष्टीने विकास झाला नाही. धोक्याची सूचना देणारे तिथे कुणीही राहत नाहीत.
स्थानिकांचे ऐकायला विसरू नका
प्लॅनिंगशिवाय धबधब्याला भेट देऊ नका. संपूर्ण माहिती नसताना जाण्याचा अति शहाणपणा टाळा. फोटो काढायला आवडत असेल तर सुरक्षित काढा.
स्थानिकांचे ऐकायला विसरू नका. त्यांना त्याची जास्त माहिती असते.
जंगलातील धबधब्याचे पाणी कधीही वाढू शकते. पर्यटकांनी तिथे पोहण्याचा प्रयत्न करू नये, असे आवाहन वन विभागाने केले.
पर्यटनाला जा, पण काळजी घ्या...
अमलनाला-कोरपना तालुक्यात जांबूळझरा, बोदबोदी, खडक्या, सावलहिरा, भस्म नागाची खोरीतील धबेधबे प्रसिद्ध आहेत. भिमलकुंड, टांगाडा, सिंगारपेठ, अमलनाला येथेही प्रचंड गर्दी असते. काळजी घेतली नाही तर जीव जाऊ शकतो.
घोडाझरी - नागभीड तालुक्यात घोडाझरी प्रकल्प व धबेधबे आहेत. घोडाझरीत खबरदारीचे पलक आहेत. मात्र, अन्य ठिकाणी नाहीत.
मद्यपान किंवा धूम्रपान करणे टाळा. उंचावरील धबधब्यांना भेट देताना काळजी घ्यावी.
मुक्ताई- चिमूर तालुक्यातील मुक्ताई धबधबा पर्यटकांचे पसंतीचे ठिकाण आहे. येथे विदर्भातील अनेक ठिकाणांहून पर्यटक येतात. शासनाकडून सुरक्षेच्या कोणत्याही सुविधा नाहीत.