शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्योगसूर्याचा अस्त, रतन टाटा कालवश; ब्रीच कॅण्डी रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
2
Ratan Tata News Live: ज्ञानी-दानी अन् स्वाभिमानी 'भारत रतन'; देश गहिवरला, मान्यवरांची रतन टाटांना श्रद्धांजली
3
आजचे राशीभविष्य १० ऑक्टोबर २०२४; आजचा दिवस चिंतामुक्त, खुशीचा
4
‘असे’ घडले रतन टाटा; आजीने सांभाळले, स्कूटरमधून नॅनोची प्रेरणा अन् फोर्डला धडा शिकवला
5
चीन युद्धामुळे रतन टाटांची प्रेम कहाणी राहिली अधुरी; पण, नशिबाने काही वेगळेच ठरवले होते
6
मराठीत वैद्यकीय शिक्षण घेण्याचे स्वप्न होणार पूर्ण: PM मोदी; १० मेडिकल कॉलेजचे उद्घाटन
7
अनपेक्षित निकालांचे आम्ही विश्लेषण करू; काँग्रेस नेते राहुल गांधी यांची माहिती
8
हरयाणामध्ये अहंकाराचा फुगा जनतेनेच फोडला; CM एकनाथ शिंदेंची इंडिया आघाडीवर टीका
9
मविआच्या ७० जागांचा तिढा अद्यापही सुटेना; २१८ जागांवर एकमत, बैठकीत बंडखोरी रोखण्यावर भर
10
लवकरच येणार कर्ज स्वस्ताई; RBIकडून व्याजदर ६.५ टक्क्यांवर कायम, आगामी बैठकीत कपातीचे संकेत
11
...तर बांधकामाच्या सर्व नव्या परवानग्या थांबवू; उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला इशारा
12
STला मिळणार ३०० कोटी; बिल्डरांमार्फत ३८ जागांचा विकास, मुंबईतील मोक्याच्या जागांचा समावेश
13
१९ ओबीसी जातींचा केंद्रीय सूचीमध्ये समावेश; राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाने दिली मंजुरी
14
AI मदतीने शोधला प्रथिनांचा कोड अन् मिळाले नोबेल; डेव्हिड बेकर, डेमिस हसाबिस, जॉन जम्पर मानकरी
15
Ratan Tata Passed Away : “मोठं स्वप्न पाहणं अन् दुसऱ्यासाठी दायित्वाची भावना...” PM मोदींनी या शब्दांत वाहिली टाटांना श्रद्धांजली
16
Ratan Tata Death: गडकरींची टाटांना आदरांजली: देशाने संवेदनशील उद्योजक-समाजसेवक गमावल्याची व्यक्त केली भावना
17
नाशिकच्या नेहरु वनोद्यानाने रतन टाटा यांना घातली होती भुरळ; राज ठाकरे यांना म्हणाले होते, हा तर इनोव्हेटिव्ह प्रोजेक्ट...!
18
Ratan Tata News: ७९ व्या वाढदिवशी टाटा पोहोचले होते संघ मुख्यालयात; नेमकं काय घडलं होतं?
19
महाराष्ट्राच्या फायद्यासाठी हरयाणाची पुनरावृत्ती करा; अजित पवार यांचं राज्यातील जनतेला आवाहन
20
IND vs BAN : विक्रमी विजयासह टीम इंडियाच्या नावे झाली आणखी एक मालिका

पतीविरुद्धच्या तक्रारीत सहा वर्षांत दहापट वाढ

By admin | Published: September 28, 2016 12:48 AM

पुरुषांकडून महिलांवर अत्याचार होत असल्याची चर्चा नेहमीच ऐकायला मिळते.

 माहिती अधिकारात उघड : नवऱ्यांविरोधात ११ हजार १६० तक्रारीचंद्रपूर : पुरुषांकडून महिलांवर अत्याचार होत असल्याची चर्चा नेहमीच ऐकायला मिळते. मात्र महिलाही पुरूषावर अत्याचार करतात, हे कुणीही समजून घ्यायला तयार दिसत नाही. महिलांकडूनही पुरुषावर शारिरीक, मानसिक व लैंगिक असे अत्याचार सतत घडत असून गेल्या सहा वर्षात अशाप्रकारच्या तक्रारीत तब्बल दहापट वाढ झाल्याचे सत्य माहिती अधिकारातून समोर आले आहे. भारतीय परिवार बचाव संघटनेने मागितलेल्या माहिती अधिकारतील माहितीत शासकीय माहिती अधिकारी तथा पोलीस उपअधीक्षक (मुख्यालय) चंद्रपूर यांनी ही माहिती दिली आहे. विवाहित महिलांचे छळापासून रक्षण करण्यासाठी १९८० च्या दशकात ४९८ (अ) हुंडाबळी व २००५ मध्ये गृहहिंसाचार यासारखे कडक कायदे करण्यात आले. परिणामी २०१२ ते २०१६ या पाच वर्षात ११ हजार १६० च्यावर महिलांनी पुरुषांवर या कायद्यानुसार तक्रारी नोंदविल्या. एकीकडे या कायद्याने स्त्रीयांचे रक्षण होत असले तरी दुसरीकडे याच कायद्याचा शस्त्रप्रमाणे धाक दाखवून समाजातील असामाजिक तत्वाकडून गैरवापर करण्यात येत आहे. त्यामुळे भारतीय संस्कृतीचा पाया असलेली आदर्श कुटुंब व्यवस्था मोडकळीस येत असल्याचे दिसून येते.चंद्रपूर जिल्ह्यात हुंडाबळी व गृहहिंसाचार अंतर्गत पोलीस स्टेशन तथा महिला पोलीस तक्रार निवारण कक्षात २०१२ ते १२५१, २०१३ मध्ये २०८०, २०१४ मध्ये २९४४, २०१५ मध्ये २०३८ व २०१६ मध्ये १६६६ तक्रारी प्राप्त झाल्या. तसेच गृह हिंसाचार प्रकरणी सन २०१२ मध्ये १२५, २०१३ मध्ये १७८, २०१४ मध्ये २०३, २०१५ मध्ये २०१, २०१६ मध्ये ७३ तक्रारी प्राप्त झाल्या. मागील सहा वर्षा अगोदर सन २००५ मध्ये ४०७, २००६ मध्ये ५०२, २००७ मध्ये ४०७, २००८ मध्ये १७०, २००९ मध्ये २४०, २०१० मध्ये ४७ अशा पुरुषविरोधी ११७३ तक्रारी होत्या. मात्र सहा वर्षात या तक्रारी १० पटीने वाढलेल्या आहेत. भारतात एक हजार विवाहामागे १३ घटस्फोट होत आहेत. सन २०१४-१५ मध्ये भारतात ४ लाख ५२ हजार ७४३ पुरुषांनी तर ९ लाख ९ हजार ५७३ स्त्रीयांनी घटस्फोट घेतला. म्हणजे एका वर्षात १३ लाख ६२ हजार ३१६ कुटुंबाने घटस्फोट घेतला आहे. पुरूषांवरिल तक्रारीचा आलेख असाच वाढत राहिला तर विवाह संस्थेवरचा विश्वास कायम राहणार नाही. त्यामुळे सदर कायद्याचा दुरुपयोग थांबवून कुटुंब वाचविण्याचे आवाहन भारतीय परिवार बचाव संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ. नंदकिशोर मैंदळकर, अ‍ॅड. प्रदीप क्षिरसागर, यशवंत वाघ, सुदर्शन नैताम, डॉ. राहूल विधाते, शितल साळवे, गोपी आक्केवार, डॉ. गुरूदेव गेडाम, मनोज तारे, दीपक पराते, किशोर जंपलवार, गंगाधर गुरनुले, संदिप आत्राम यांनी केले आहे. (स्थानिक प्रतिनिधी) मोबाईलमुळे वाढलेपती-पत्नीत गैरसमजसध्याच्या युगात मोबाईलमुळे पती-पत्नीत गैरसमज वाढू लागले आहेत. कुटुंबावर आलेल्या संकटाचा सामना करण्यासाठी संकटमोचक म्हणून पती पत्नीच्या मागे उभा राहतो. मात्र त्याची संपत्ती आपल्या नावे करण्यासाठी तगादा लावणे, अनैतीक संबध ठेवणे, ज्या घरात माहेरच्या मंडळींची ढवळाढवळ असते, त्या घराच वाटोळ झाल्याशिवाय राहत नाही. गृहहिंसाचार ४९८ (अ) या कायद्याला सर्वोच्च न्यायालयानेही दहशतवाद असे संबोधले आहे. या कायद्याने एक सून घरातील दहा स्त्रीयांना वेठीस धरते, हा कुठला न्याय, असे भारतीय परिवार बचाव संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ. नंदकिशोर मैंदळकर यांनी म्हटले आहे.