शहरं
Join us  
Trending Stories
1
जितेंद्र आव्हाडांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट! राजकीय वर्तुळात चर्चा
2
निकालानंतर मुख्यमंत्र्यांनी किती दिवसांत शपथ घेणे बंधनकारक आहे? काय सांगतो नियम? पाहा...
3
एकनाथ शिंदे नाही, तर कोण? शिवसेनेतून उपमुख्यमंत्रिपदासाठी 'या' 5 नावांची चर्चा...
4
अजमेर शरीफ वादावरून मेहबूबा मुफ्ती संतापल्या; म्हणाल्या, "आता मुस्लिमांच्या घरात मंदिर शोधतील"
5
Samantha Ruth Prabhu: समंथा रुथ प्रभूच्या वडिलांचं निधन, अभिनेत्रीने शेअर केली भावुक पोस्ट
6
तुमचा पगार, पॅकेजच नाही, ऑफिसमध्ये या ९ गोष्टीही बोलू नका; नोकरी करताय तर नक्कीच घ्या हा सल्ला...
7
Ed Sheeran ची पुन्हा भारतात कॉन्सर्ट, ६ शहरांमध्ये घुमणार गायकाचा आवाज; कधी आणि कुठे? वाचा
8
Ananya Panday : चंकी पांडे यांच्या 'या' कृतीने अनन्या पांडे त्रस्त; इन्स्टाग्राम डिलीट करण्याचा दिला सल्ला
9
"तुमचा मित्र हिंदूंना चिरडतोय"; इन्फोसिसच्या माजी सीईओंनी मोहम्मद युनूस यांच्या मित्राला सुनावलं
10
तिढा सुटेना, महायुतीचे नेते पुन्हा दिल्लीला जाणार, का होतोय सत्तास्थापनेस उशीर? 
11
Video: 'सुपरमॅन' कॅच! तुफान वेगाने जाणाऱ्या चेंडूवर फिल्डरने हवेतच घेतली चित्त्यासारखी झेप
12
एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा; राजकीय गदारोळात उदय सामंतांकडून महत्त्वाचा खुलासा
13
गोंदिया-कोहमारा मार्गावर शिवशाही बसचा भीषण अपघात! ११ जणांचा मृत्यू; मुख्यमंत्र्यांकडून मदत जाहीर
14
"वाढीव मतदानाचे व्हिडीओ चित्रीकरणासह पुरावे सादर करा", नाना पटोलेंचं निवडणूक आयोगाला पत्र
15
"लॉरेन्स बिश्नोईचा जेलमधून शूटर्सना कॉल; म्हणाला, पोलिसांना घाबरु नका, आपल्याकडे वकिलांची फौज"
16
PAN 2.0 नंतर सरकार आता EPFO 3.0 आणण्याच्या विचारात; ATM मधूनच करता येणार 'हे' काम
17
Maharashtra Politics : मोठी बातमी! महायुतीची बैठक रद्द, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साताऱ्याला जाणार
18
भारतीय गुंडांचा अमेरिकेत 'डंकी'पद्धतीने प्रवेश; लॉरेन्स बिश्नोई टोळीचेही आवडते ठिकाण बनले
19
रोल्स रॉयस घ्यायची असेल तर डाऊन पेमेंट किती करावे लागणार? EMI किती बसणार... जाणून घ्यायला काय हरकत आहे...
20
Shubman Gill कमबॅकसाठी सज्ज; हा घ्या तो १०० टक्के फिट असल्याचा पुरावा (VIDEO) 

अफगाणिस्तानात तणाव वाढला; इकडे ड्रायफ्रुट्स महागले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2021 4:32 AM

सुकामेवा हे श्रीमंती खाणे समजले जाते. मात्र, कोरोनामुळे मध्यमवर्गीय व सामान्य कुटुंबेही पोषक तत्त्वे व आरोग्यासाठी सुकामेवा विकत घेऊ ...

सुकामेवा हे श्रीमंती खाणे समजले जाते. मात्र, कोरोनामुळे मध्यमवर्गीय व सामान्य कुटुंबेही पोषक तत्त्वे व आरोग्यासाठी सुकामेवा विकत घेऊ लागले. चंद्रपुरात अनेक ठिकाणी स्पेशल सुकामेव्याची दुकाने आहेत. तालुकास्थळी व ग्रामीण भागातील मोठ्या गावांमध्ये किराणा दुकानातच सुकामेवा विक्रीसाठी ठेवला जातो. सुकामेवा थोक विक्रीची राज्य आणि देशपातळीवर एक साखळी आहे. आंतरराष्ट्रीय उद्योग व्यवसायात काही अघटित घडल्यास त्याचा परिणाम पुरवठा साखळीवर होतो. अफगाणिस्तानच्या पायाभूत विकासकामांसाठी भारताने मोठी गुंतवणूक केली. या देशाचा भारताशी व्यावसायिक संबंध आहे. विशेषत: सुकामेवा पुरवठा करण्यात अफगाणिस्तान आघाडीवर आहे. मात्र, अमेरिकेने आपले सैन्य माघारी घेतल्याने तेथील उद्योग स्थिती बदलली. त्याचे अनिष्ट परिणाम आता राज्यासह चंद्रपूर जिल्ह्यातही दिसू लागले आहेत. सुकामेव्याच्या किमती वाढणे त्याचाच भाग असल्याचे चंद्रपुरातील व्यावसायिक गोविंद लालवानी यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

बॉक्स

नवीन ऑर्डर घेणे बंद

अक्रोड, काजू, खारीक, पिस्ता, बदाम, अंजिर, जर्दाळू व किसमिस खरेदीची नवीन ऑर्डर घेणे नागपुरातील मोठ्या व्यापाऱ्यांनी बंद केले. चंद्रपुरातील आठ-दहा व्यापाऱ्यांकडे आठवडाभर पुरेल इतकाचा सुकामेवा उपलब्ध आहे. हा स्टॉक संपल्यानंतर पुन्हा उपलब्ध होईल, याची खात्री नाही. बदामचे दर तर याच आठवड्यात प्रति किलो ३०० रुपयांनी वाढले. यापूर्वी ७०० रुपये किलो असा दर होता.

कोट

...तर दर पुन्हा भडकतील

सुकामेवा विकत घेणाऱ्यांची संख्या कोरोनापासून वाढली. तेव्हा दर कमी होते. काही ड्रायफ्रुट्सचा औषधीसारखा उपयोग केला जातो. स्थिर असलेल्या दरात दोन आठवड्यात अचानक वाढ झाली. आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय स्तरावरील व्यापार स्थिती बदलली नाही तर दर पुन्हा भडकू शकतात.

- देवांश पंजवानी, व्यावसायिक, चंद्रपूर

कोट

ग्रामीण भागातील लहान दुकानदार चंद्रपुरातून सुकामेवा विकत घेतात. पण, आता दर वाढल्याने त्यांना गुंतवणूक अधिक करावी लागते. यासाठी हे दुकानदार रिस्क घेऊ इच्छित नाहीत. किमती वाढल्याने ग्राहक सुकामेव्याऐवजी दुसऱ्या वस्तूंना विकत घेतील, अशी स्थिती निर्माण झाली.

- परमानंद कावडकर, किराणा व्यावसायिक, चंद्रपूर

हे पाहा भाव (प्रति किलो)

तणावापूर्वीचे भाव

बदाम ७००- १०००

काजू ७०० -७५०

अंजिर ९५०- १०५०

पिस्ता ९५०- १०५०