ग्रामपंचायत तारसा खुर्द येथे बैठक घेत संबंधित पदाधिकाऱ्यांना नागरिकांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देऊन उपाययोजना करण्यासंदर्भात सूचना केल्या, तर आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन आरोग्यव्यवस्थेचा आढावा घेतला. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन येथे आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम करण्यासाठी निर्देश दिले. याप्रसंगी त्यांनी स्थानिक नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. येथे परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पूर्ण प्रयत्न करण्यात येणार असल्याचे सांगितले.
याप्रसंगी तहसीलदार के.डी. मेश्राम, गटविकास अधिकारी साहेबराव बुलकुंडे, कृउबा सामिती संचालक संभू येलेकर, सरपंच अजय भोयर, उपसरपंच माधुरी येलेकर, ग्रापं सदस्य ममता चौधरी, संध्या वासेकर, विभा चांदेकर, आशा चंदे, शरद चोचले, राकेश अलोने, निकेश बोरकुटे, नितीन धानोरकर, पंढरी कोडपत्तुलवार यासह स्थानिक नागरिक उपस्थित होते.
010921\img-20210831-wa0011.jpg
तारसा खुर्द येथे भेटीदरम्यान नागरिकांशी चर्चा करताना आमदार सुभाष धोटे