डेबू सावली वृद्धाश्रमाची उभारणी : समाजाला दिशा देण्याचा प्रयत्नचंद्रपूर : डेबू बहुउद्देशीय समाज विकास संस्थेच्या माध्यमातून सुभाष शिंदे या ध्येयासक्त समाजसेवकाने कर्मयोगी गाडगेबाबांच्या विचारांना प्रत्यक्ष कृतीमध्ये उतरवून रंजल्या- गांजल्यांची सेवा करण्यात आपले जीवन सार्थकी लावण्याचे कार्य अवलंबिले आहे. त्यांच्या या कार्यातून समाजाला दिशा मिळेल, असे प्रतिपादन शिवसेना उपप्रमुख किशोर जोरगेवार यांनी केले.देवाडा येथील डेबू सावली वृद्धाश्रमात कृतज्ञता सन्मान सोहळा प्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी भाजप युवा नेते सुभाष कासनगोट्टूवार, विकलांग सेवा समितीचे श्रीराम पान्हेरकर, जिल्हा मध्यवर्तीॅ बँकेच्या संचालिका नंदाताई अल्लूरवार, सामाजिक कार्यकर्ते श्याम पुगलिया, आस्था चॅरिटेबल ट्रस्टचे संजय पेचे, पडोली पोलीस स्टेशनच्या महिला अधिकारी किरण बुटले यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुभाष शिंदे होते.सुभाष कासनगोट्टूवार म्हणाले की, सामाजिक ऋणाची बांधिलकी फ स्वीकारत समाजातील शोषित, पीडित निराधारांची सेवा करणाऱ्यांमुळेच आज समाज डौलाने उभा आहे, असेही त्यांनी सांगितले. यावेळी कवी संमेलनाचा बहारदार कार्यक्रमही झाला. त्यात धोपटे व इरफान शेख आदींसह अनेकांनी रंगत आणली.यावेळी मान्यवरांच्या हस्ते या कार्यास प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष सहकार्याचा हात देणाऱ्या अनेक सामाजिक कार्यकर्त्यांचा कृतज्ञता पुरस्कार देवून गौरव करण्यात आला. कार्यक्रमाला मनोहरभाई टहलियानी, अशोक डोडानी, रमेश मुलकलवार, वासुदेव भिलकर, भाऊराव तुरानकर, वनिता भिलकर, माया पोटे, छाया चौधरी, रेखा जाधव, पप्पु गुलानी, मनोज सिंघवी, रत्नमाला बावणे, शारदा पिंपळे आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे संचालन जया सालफळे तर आभार प्रदर्शन धनंजय तावाडे यांनी केले. (प्रतिनिधी)
देवाडा येथे कृतज्ञता सन्मान सोहळा
By admin | Published: January 25, 2017 12:53 AM