चंद्रपूर: राज्याचे वने, सांस्कृतीक कार्य, मत्स्यव्यवसाय मंत्री तथा चंद्रपूर जिल्हयाचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे बल्लारपूर विधानसभा क्षेत्रात विकासाची गंगा ओघवती करत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेअंतर्गत (दलीत वस्ती सुधार योजना) सन २०२२-२३ या वर्षाकरिता ग्रामीण क्षेत्रातील दलित वस्त्यांमध्ये विकासकामांसाठी ९ कोटी रू. मंजूर करण्यात आले आहे.
राज्यातील नागरी व ग्रामीण क्षेत्रातील अनुसुचित जाती व नवबौध्द घटकांच्या वस्त्यांमध्ये मुलभूत सुविधा पुरविण्यासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजने अंतर्गत सन २०२२-२३ या वर्षासाठी (दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत) मंजूर बल्लारपूर विधानसभा क्षेत्रातील ग्रामीण भागात विकासकामे प्रामुख्याने मंजूर करण्यात आले आहेत.
यामध्ये सिमेंट कॉंक्रीट बंदीस्त नाली, सिमेंट कॉंक्रीट रस्ते, समाजभवन, चौकांचे सौंदर्यीकरण, धम्मकेंद्र, विपश्यना केंद्र, प्रशिक्षण केंद्र, विद्यार्थ्यांकरिता अभ्यासिका तथा स्मशानभुमी शेड इत्यादी विकासकामे मंजूर करण्यात आले आहे. पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने मंजूर सदर निधी ग्रामीण क्षेत्रातील अनुसुचित जाती लोकसंख्येच्या प्रमाणात निश्चीत करण्यात आलेला आहे. या निधीच्या माध्यमातुन बल्लारपूर विधानसभा क्षेत्रातील दलित वस्त्यांच्या विकासाचा मार्ग सुकर झाल्यामुळे बल्लारपूर विधानसभा क्षेत्रातील नागरिकांनी सुधीर मुनगंटीवार यांचे आभार मानले आहे.