कमळ फुलले; पंजा बचावला; बल्लारपुरात मुनगंटीवार चौथ्यांदा चंद्रपुरात जोरगेवार कायम

By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2024 12:41 PM2024-11-24T12:41:06+5:302024-11-24T12:43:46+5:30

Chandrapur Assembly Vidhan Sabha Election 2024 Results Winning Candidates : ब्रह्मपुरीमुळे काँग्रेसचे अस्तित्व; वरोऱ्यात धानोरकरांना धक्का: राजुऱ्यात भोंगळेचा विजय; चिमुरात भांगडियांची हॅटट्रीक

The lotus blossomed; congress escaped; Mungantiwar in Ballarpur for the fourth time Jorgewar in Chandrapur | कमळ फुलले; पंजा बचावला; बल्लारपुरात मुनगंटीवार चौथ्यांदा चंद्रपुरात जोरगेवार कायम

The lotus blossomed; congress escaped; Mungantiwar in Ballarpur for the fourth time Jorgewar in Chandrapur

लोकमत न्यूज नेटवर्क 
चंद्रपूर:
सहाही विधानसभा मतदारसंघांच्या निवडणुकीच्या झालेल्या मतमोजणीत कुठे चुरस, कुठे अटीतटीच्या लढती झाल्या. भाजपने बल्लारपूर, चिमूर राखत चंद्रपूर, वरोरा आणि राजुरा या विधानसभा मतदार संघांवरही वर्चस्व निर्माण केले आहे. ब्रह्मपुरीची जागा कायम ठेवण्यात काँग्रेसला यश आले असले तरी वरोरा, राजुरा मतदारसंघ काँग्रेसला गमवावे लागले आहेत. वंचित बहुजन आघाडी कोणाचेही गणित बिघडवू शकली नाही.


राजुऱ्यात कधी काँग्रेसचे सुभाष थोटे तर कधी स्वभापचे अॅड. वामनराव चटप यांच्यात आघाडीवर होते. अचानक भाजपचे देवराव भोंगळे यांनी आघाडी घेत विजयावर शिक्कामोर्तब करून आश्चर्याचा धक्का दिसला, बल्लारपुरात भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी सुरुवातीपासूनच आघाडीवर घेत विजय संपादन केला. चंद्रपुरात भाजपचे किशोर जोरगेवार यांनी सुरुवातीपासून घेतलेली आघाडी विजय पटकावला. वरोरात भाजपचे करण देवतळे यांची आघाडी विजयावर शिक्कामोर्तब करणारी ठरली. चिमुरात काट्याच्या लढतीत भाजपचे बंटी भांगडिया बाजी मारली, ब्रह्मपुरीत काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी अटीतटीच्या लढतीत. भाजपचे कृष्णालाल सहारे यांचा पराभव केला. चुरशीच्या लढीत वडेट्टीवारांनी नावाप्रमाणेच विजय संपादन केला.


"लोक वारंवार तुमच्यावर विश्वास दाखवतात तेव्हा ती निवडणूकही जनतेची व विजय देखील जनतेचाच असतो. या प्रेमासाठी माझ्या मतदारसंघातील जनता व लाडक्या बहिणींच्या कायम ऋणात राहीन. विजय झाला तर माजायचे नाही व पराभव झाला तर लाजायचे नाही' या सूत्रानुसार कार्यरत आहे आणि पुढेही राहणार."
- सुधीर मुनगंटीवार,


विजयाची कारणे 
बल्लारपूर विधानसभा मतदारसंघाचा आमुलाग्र विकास. जनतेने योजनेची मागणी केल्यानंतर प्रत्यक्ष कृती येईपर्यंत पाठपुरावा करण्याचे कौशल्य. मतदारसंघातील सर्वांना आदराने वागणूक देऊन मग तो कुठल्याही पक्षाचा असो त्यांचे काम करण्यासाठी घेतलेला पुढाकार. केंद्र व राज्य सरकारकडून विकासासाठी निधी खेचून आणण्यात हातखंडा. बोले तैसा चाले, अशी लोकांमध्ये प्रतिमा


"ब्रह्मपुरी मतदारसंघातील जनतेने मला पून्हा विधानसभेत पाठविले. या मतदारसंघाच्या आमुलाग्र विकासासाठी आजपर्यंत योगदान दिले. विकासाच्या अनेक योजना प्रभावीपणे राबविल्या. सर्वसमावेशक व सकलांचे कल्याण ही माझी भूमिका आहे. पक्षाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मी मनस्वी आभारी आहे."
- विजय वडेट्टीवार 


विजयाची कारणे 
उत्तम संघटन कौशल्य, राज्याचे विरोधी पक्षनेते पद सांभाळत असतानाही मतदारसंघातील तळागाळात कार्यकर्त्यांची सक्षम फळी उभी केली. कोट्यवधींची विकासकामे केल्याने स्थानिक स्वराज्य संस्थांवर पकड़, व्यापक विकासाचा दृष्टिकोण, शेती व सिंचनासाठी विशेष प्रयत्न. मतदारसंघातील सर्व समाजाला पक्षाशी जोडून घेण्याचे कौशल्य. ओबीसी व आंदोलनांचे कणखर नेतृत्व म्हणून मतदारसंघात लोकप्रियता


"हा विजय माझा नाही तर मतदारसंघातील समस्त जनतेचा आहे. त्यांच्या स्नेहामुळेच मी आजवर इथपर्यंत पोहोचलो. विकासासाठी सर्वधर्मियांनी माझ्यावर विश्वास ठेवला. या मतदारसंघाचा कणखर आवाज विधानसभेत पून्हा एकदा पोहोचविला आहे. मतदारसंघाला प्रगतीच्या शिखरावर पोहोचविण्यास कटिबद्ध आहे."
किशोर जोरगेवार, भाजप


विजयाची कारणे 
आमदारकीच्या पहिल्या टर्ममध्ये चंद्रपूर मतदार संघात बरीच विकास कामे केली, ग्रामीण मतदारांशी सतत संपर्क ठेवला. चंद्रपुरातील नागरी संघटना व सर्व समाज घटकांना जोडण्यासाठी अनेक उपक्रम राबविले. भाजपमध्ये प्रवेश घेतल्यानंतर लगेच उमेदवारीही मिळाली. पक्षाचे संघटनात्मक बळ व कार्यकर्त्यांच्या फळीने मतांचा जनाधार वाढला.


"माझ्या आमदारकीच्या दोन टर्ममध्ये जनतेने भरभरून प्रेम दिले. पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी प्रचंड मेहनत घेतली. या मतदारसंघाच्या विकासासाठी कोट्यवधीची कामे केली. त्यामुळे जनता पून्हा एकदा माझ्या बाजूने उभी झाली. त्यांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. लोकहित हेच माझे ध्येय आहे."
- बंटी भांगडिया भाजप


विजयाची कारणे 
चिमूर मतदारसंघात सलग दोन टर्ममध्ये बरीच विकास कामे केली. अनेक कामे मंजूर करून ठेवली. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पकड. या मतदारसंघातील जनतेसोबत सतत संपर्क ठेवला. त्यामुळे धावून येणारे अशी प्रतिमा सर्व सामान्य जनतेमध्ये निर्माण झाली. पक्षाचे निष्ठावंत पदाधिकारी व कार्यकर्ते ठामपणे पाठीशी होती. प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जंगी सभा झाल्याने माहोल बदलला.


"राजुरा मतदारसंघातील जनतेशी माझा कायम सुसंवाद राहीला आहे. निवडणुकीच्या निमित्ताने पून्हा लोकांना सामोरे गेलो. पक्षाने माझ्यावर विश्वास ठेऊन उमेदवारी दिली. पदाधिकारी व कार्यकर्ते पाठीशी होते. जनता हेच माझे दैवत. या मतदारसंघाचा कायापालट करण्यासाठी झटणार आहे."
- देवराव भोंगळे


विजयाची कारणे 
जि. प. अध्यक्षपदाच्या कार्यकाळातही लक्ष ठेवले होते. चार वर्षांपासून मतदारसंघात विविध कार्यक्रमातून सतत संर्पकात होते. R भाजपचे मजबूत संघटन आणि कार्यकर्त्यांची ताकद पाठीशी होती. लाडकी बहिण व अन्य योजनांसाठी तालुकास्थळी सेवा केंद्र सुरू केले. ● लक्षणीय मतसंख्येतील गोंडपिपरी तालुक्याचे जावई म्हणून मतदारांमध्ये सहानुभूती. तिहेरी लढतीने मत विभाजनाचा लाभ झाला.


"वरोरा मतदारसंघातील जनतेने माझ्यावर मोठा विश्वास दाखविला. त्यामुळे पहिल्याच प्रयत्नात यशस्वी झालो. पक्षाचे संघटन पाठीशी ठामपणे उभे होते. जनतेला खोटी आश्वासने न देता प्रामाणिकपणे माझे मुद्दे प्रचारातून समजावून सांगत होतो. मतदारसंघाच्या विकासासाठी पदाचा पूर्ण शक्तीने वापर करणार." 
- करण देवतळे भाजप


विजयाची कारणे 
प्रचारादरम्यान महायुतीतील मित्र पक्षांची एकजुट होती. देवतळे कुटुंबाला राजकीय वारसा असल्याने अने जुने कार्यकर्ते जुळले. मतदार संघांतील बहुसंख्य खैरी कुणबी समाजाचे एकजुट झाली. आठ उमेदवारांमुळे धनोजे कुणबी मतांचे विभाजन झाले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जाहीर सभेने समिकरण बदलले. महायुती सरकारच्या योजनांचा मतदारसंघांत जोरदार प्रचार केला. 
 

Web Title: The lotus blossomed; congress escaped; Mungantiwar in Ballarpur for the fourth time Jorgewar in Chandrapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.