शहरं
Join us  
Trending Stories
1
मतांमधील तफावतीबाबत 'लोकमत'च्या बातमीवर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण, म्हणाले...
2
आग्रा-लखनौ एक्स्प्रेस-वेवर भीषण अपघात, सैफई मेडिकल युनिव्हर्सिटीमधील ५ डॉक्टरांचा मृत्यू   
3
मुख्यमंत्रि‍पदाच्या स्पर्धेतून एकनाथ शिंदेंची माघार?; भाजप हायकमांडच्या भूमिकेनंतर चर्चांना उधाण
4
'एक'नाथ हैं तो सेफ है' घोषणेवर भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...
5
युद्ध थांबले! इस्रायल आणि हिजबुल्लामध्ये युद्धविराम, दोन्ही देशात करार झाला; वाचा सविस्तर
6
६५ टक्के आमदारांवर गंभीर गुन्हे, २७७ करोडपती; जाणून घ्या, शिक्षित आमदार किती?
7
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
8
SIP Vs PPF Vs ELSS: ₹१.५ लाखांच्या गुंतवणुकीवर पहिलं कोण बनवेल कोट्यधीश; पाहा गणित, मिळतील ₹८.११ कोटी
9
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रिय व्यक्तीच्या सहवासात रोमांचित व्हाल!
10
मतदान करत नाही, मग 'हे' वाचाच; स्वतंत्र वाहन, रात्रभर २५० किमी प्रवास अन् पोहोचलं एक मत..
11
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
12
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
13
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
14
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
15
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
16
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
17
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
18
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
19
विद्यार्थ्यांच्या नोंदणीसाठी शिक्षकांचे 'अपार' कष्ट; २५ टक्के नोंदणी अपूर्ण
20
शेती आणि शेतकरी - यंदाच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतून दोघेही हद्दपार!

दिवाळीच्या साहित्याने बाजारपेठ सजली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2022 11:31 PM

वर्षभरात साजरे केले जाणाऱ्या विविध सणांपैकी दीपावली या सणाबाबत आबालवृद्धांपासून साऱ्यांना विशेष आकर्षण असते. पाच दिवसांच्या या सणामध्ये प्रत्येक दिवसाचे एक वेगळे दिनविशेष असल्याने प्रत्येक दिवसासाठी लागणाऱ्या विविध स्वरूपातील वस्तू खरेदी करण्यासाठी ग्राहकांनी बाजारपेठेत हळूहळू गर्दी करण्यास सुरुवात केली आहे. बाजारात खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकांची आपल्या दुकानाला पहिली

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : वर्षभरातील महत्त्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या दिवाळीच्या खरेदीसाठी ग्राहकांची बाजारात गर्दी वाढू लागली आहे. खरेदीसाठी लोकांमध्ये लखलख चंदेरी उत्साह दिसून येत आहे. नोकरदारवर्गाची दिवाळी खरेदीसाठी लगबग सुरू झाली आहे. मात्र, परतीच्या पावसाचा तडाखा बसल्याने यंदा शेतकरीवर्ग ऐन दीपावलीच्या तोंडावर हवालदिल झाला असल्याचे चित्र आहे.वर्षभरात साजरे केले जाणाऱ्या विविध सणांपैकी दीपावली या सणाबाबत आबालवृद्धांपासून साऱ्यांना विशेष आकर्षण असते. पाच दिवसांच्या या सणामध्ये प्रत्येक दिवसाचे एक वेगळे दिनविशेष असल्याने प्रत्येक दिवसासाठी लागणाऱ्या विविध स्वरूपातील वस्तू खरेदी करण्यासाठी ग्राहकांनी बाजारपेठेत हळूहळू गर्दी करण्यास सुरुवात केली आहे.बाजारात खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकांची आपल्या दुकानाला पहिलीपसंती मिळावी यासाठी दुकानदारांनीही आपापली दुकानेविविध प्रकारे सजवून ठेवली आहेत, तर किराणा सामान, फटाक्यांची दुकाने,इलेक्ट्रॉनिक वस्तू, फूलवाल्यांची दुकाने, कपड्याची दुकाने, मिठाईचीदुकाने, गृहोपयोगी वस्तूंची दुकाने आदी दुकानांमध्ये गर्दी दिसत आहे.

आकाशकंदील वेधत आहे लक्ष- अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपलेल्या दिवाळी सणासाठी बाजारपेठ बहरली आहे. प्रकाशाचा झगमगाट करणारे आकाशकंदील, दिवे, पणत्या विक्रीसाठी दाखल झाल्या आहेत. विविध डिझाइन, रंगसंगती, आकारांतील आकाशकंदील नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहेत. मात्र, कागदांच्या वाढत्या किमतीमुळे यंदा आकाशकंदील जवळपास २० टक्क्यांनी महागले आहेत. - दीपोत्सवासाठी रंगीबेरंगी कागदी. कापडी आणि प्लास्टिकचे आकाशकंदील विक्रीसाठी दाखल झाले आहेत. दोन वर्षांनंतर यंदा आकाशकंदिलाच्या बाजाराला बहर आला आहे

चांदणी कंदील खातोय भाव१ पारंपरिक आणि काही नव्या प्रकारातील आकर्षक आकाशकंदिलांनी बाजारपेठा सजल्या आहेत. चांदणी, पेशवाई, टोमॅटो बॉल, पॅराशूट यांच्यासह इको फ्रेंडली हॅण्डमेड आकाशकंदील यंदा बाजारात आहेत.

२ दिवाळीनिमित्त घर सुशोभित करण्यासाठी विविध आकर्षक स्टीकर बाजारात आले आहेत. यात शुभ-लाभ, स्वस्तिक, पावले. श्री, ॐ आणि इतर सजावट साहित्याचा समावेश आहे.

३ कागदी, प्लास्टिक, पीव्हीसी, मेटॅलिक, अक्रेलिक, अशा अनेक प्रकारांत दाखल आहेत. मोती तसेच फुलांचे तोरण, टिकाऊ फुलाची माळ, आकर्षक मेणाचे विविध प्रकारचे दिवे, लायटिंग पणत्यांनी दुकाने सजली आहेत.

आतषबाजीला ग्रहणदिवाळीच्या आतषबाजीला महागाईचे ग्रहण लागले आहे. यंदा फटाक्यांच्या किमतीत ३० ते ४० टक्क्यांनी वाढ झाल्याने सर्वसामान्यांच्या खिशाला मोठी कात्री लागणार आहे, मागील वर्षीच्या तुलनेत यंदा फटाक्यांच्या किमतीतही कमालीची वाढ झाल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे लहान मुलांसह फटाके फोडणाऱ्यांनादेखील चिंता सतावत आहे.

इलेक्ट्रॉनिक्स वस्तुंची मागणी वाढणार

चंद्रपूर औद्योगिक वसाहतीमधील लघू व मध्यम कारखाने सुरू झाले.  बऱ्यापैकी रोजगार मिळू लागला. कोरोना काळात डबघाईस आलेली इलेक्ट्रॉनिक्स वस्तुंची बाजारपेठ यंदा पहिल्यांदाच गणेशोत्सवापासून पूर्वपदावर आली. गणेश मंडळांनी सजावटीसाठी नवनवीन वस्तुंची डिमांड केल्याने उलाढाल वाढली. दिवाळीपर्यंत हे चित्र कायम राहू शकते.

 

टॅग्स :Diwaliदिवाळी 2022