शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेनेच्या पहिल्या यादीत चूक, उमेदवार बदलणार?; राऊतांनी पत्रकार परिषदेत केले कबूल
2
अखेर ठरलं! ८५-८५-८५ मविआच्या फॉर्म्युल्यावर शिक्कामोर्तब; उर्वरित जागांचं गणित कसं असणार?
3
Mahayuti Seat update: साताऱ्यात महायुतीचा विद्यमान आमदारांवरच भरोसा! 
4
Maharashtra Election 2024: भाजपसमोर बंड थंड करण्याचे आव्हान; नाशिकमध्ये समीकरण काय?
5
मोठी बातमी: CM शिंदेंविरोधात केदार दिघे; ठाकरेंच्या शिवसेनेकडून ६५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर!
6
तुर्कीची राजधानी अंकारामध्ये मोठा दहशतवादी हल्ला; अनेकांचा मृत्यू
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : सकाळी पक्षप्रवेश अन् संध्याकाळी मिळालं तिकीट; के.पी. पाटलांना दिली उमेदवारी; शाहूवाडीतही शिलेदार मैदानात उतरवला
8
मुंबईतील 'या' १३ जागांवर ठाकरेंचे शिलेदार ठरले; शिवडी मतदारसंघात ट्विस्ट? 
9
जागावाटपाआधीच ठाकरेंकडून AB फॉर्म वाटप; नाशिक मध्य मतदारसंघात काँग्रेस बंडखोरी करणार
10
जालन्यात शिवसेनेच्या अर्जुन खोतकरांविरोधात रावसाहेब दानवेंच्या भावाने ठोकला शड्डू
11
Madha Vidhan Sabha 2024: चार वेळा काँग्रेस, पाच वेळा राष्ट्रवादी, शेकापला एकदा मिळाली संधी!
12
अद्भुत! झिम्बाब्वेने ट्वेंटी-२० मध्ये केल्या तब्बल ३४४ धावा; सिकंदर रझाची झंझावाती खेळी
13
Maharashtra Vidhan Sabha Election : बारामतीचं ठरलं! काका विरोधात पुतण्या निवडणूक लढणार? जितेंद्र आव्हाडांनी दिले संकेत
14
राजकारण करावं तर समोरासमोर करावं...; संदीप क्षीरसागर यांची फेसबुक पोस्ट चर्चेत!
15
Virat Kohli Record : पुण्याच्या मैदानात किंग कोहलीच्या निशाण्यावर असतील हे ५ विक्रम 
16
उदय सामंतांविरोधात ठाकरेंचा उमेदवार ठरला; पक्षप्रवेश होताच हाती मिळाला AB फॉर्म
17
फडणवीसांची शिष्टाई, राज पुरोहित आणि राहुल नार्वेकरांमध्ये दिलजमाई, कुलाब्यातील बंड शमवण्यात भाजपाला यश 
18
"मुलीला शिकवलंस तर सुशिक्षित नवरा कुठून आणणार?", लोकांचे टोमणे; मजुराची लेक झाली अधिकारी
19
Maharashtra vidhna Sabha 2024: शिंदेंच्या शिवसेनेचे पावशे निवडणूक लढविण्यावर ठाम
20
मोठी बातमी! "उद्धव ठाकरेंनी विश्वासघात केला, जो शब्द..."; संभाजी ब्रिगेडनं युती तोडली

रेकॉर्डिंगमुळे तीन महिन्यानंतर फुटले पतीच्या हत्येचे बिंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2022 10:50 PM

वडील मरण पावल्यानंतर आईच्या मोबाइलमधील त्रिवेदी यांच्यासोबत ६ ऑगस्ट, २२ रोजी पहाटे २.१४ वाजता तब्बल १०.५७ मिनिटे बोलल्याची त्यात रेकॉर्डिग आढळली. मुलीने ही रेकॉर्डिंग आपल्या मोबाइलमध्ये ट्रान्स्फर केली. त्यात वडिलांचे हात बांधले, विषारी द्रव्य पाजले आणि उशीने तोंड दाबले, असा उल्लेख आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कब्रह्मपुरी : अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या पतीचा प्रियकराच्या मदतीने खून केल्याची धक्कादायक घटना तब्बल तीन महिन्यांनी शनिवारी उघडकीस आली. मुलीच्या तक्रारीवरून पोलिसांनी महिलेसह प्रियकराला अटक केली. रंजना श्याम रामटेके (५०) रा.गुरुदेवनगर ब्रह्मपुरी आणि मुकेश राजबहादूर त्रिवेदी (४८) रा.हनुमान मंदिराजवळ पेठ वार्ड ब्रह्मपुरी अशी आरोपींची नावे आहेत.शहरातील आंबेडकर चौकात आरोपी रंजना रामटेके यांचे जनरल स्टोअर्स आहे. त्यालगतच मुकेश त्रिवेदी याचे भाजीपाला व बांगडीचे दुकान आहे. त्यामुळे त्रिवेदी याचे रंजनाच्या घरी नेहमी येणे-जाणे सुरू होते. फिर्यादी मुलीने दिलेल्या तक्रारीनुसार, तिचे शिक्षण बीएससीपर्यंत झाले असून, नागपूर येथे एका मॉलमध्ये काम करत होती. ६ ऑगस्ट, २०२२ रोजी सकाळी तिच्या आईने फोन करून वडील हृदयविकाराच्या धक्क्याने मरण पावल्याचे सांगितले. त्यावेळी दोन्ही बहिणी नागपूर येथे होत्या. वडील वनविभागात क्लार्क पदावरून निवृत्त झाले होते. ६६ वय असल्याने हृदयविकाराने मृत्यू झाल्याचे सत्य मानून त्यांचा अंत्यविधी करण्यात आला. दोन्ही बहिणी परत नागपूरला गेल्या. 

हात बांधून पाजले होते विषदोन बहिणी आणि आई-वडील असा परिवार ब्रह्मपुरीतील गुरुदेवनगरात राहत होता. मोठी मुलगी नागपूरला होती. घटनेच्या काही महिने आधी लहान मुलीने तिचा मोबाइल आईला दिला. त्यात ती आपला सिम टाकून वापरत होती. वडील मरण पावल्यानंतर आईच्या मोबाइलमधील त्रिवेदी यांच्यासोबत ६ ऑगस्ट, २२ रोजी पहाटे २.१४ वाजता तब्बल १०.५७ मिनिटे बोलल्याची त्यात रेकॉर्डिग आढळली. मुलीने ही रेकॉर्डिंग आपल्या मोबाइलमध्ये ट्रान्स्फर केली. त्यात वडिलांचे हात बांधले, विषारी द्रव्य पाजले आणि उशीने तोंड दाबले, असा उल्लेख आहे. त्रिवेदी याने अंथरूण नीट करून सकाळी सर्वांना पती गेल्याचे सांग, असा सल्ला दिल्याचेही त्या संभाषणात आढळले. यावरून मोठ्या मुलीने शनिवारी पोलिसात तक्रार दाखल केली. स्वयंचलित रेकॉर्डिंगमुळे खुनाचे सत्य तीन महिन्यांनी उघडकीस आले.

मुलीने केली आईविरूद्ध पोलिसात तक्रारदरम्यान, आईचे वागणे बदलल्याचे दोन्ही मुलींच्या लक्षात आले. आरोपी मुकेश त्रिवेदी याचे घरी येणे वाढले होते. त्यामुळे समाजात बदनामी होत असल्याने, आईला व त्रिवेदीला मुलींनी समज दिली होती. आई एकटी राहात असल्याने, लहान मुलगी  काही दिवसांत ब्रह्मपुरी येथे परत आली. त्यावेळी आईच्या मोबाइलमध्ये असलेल्या एका संभाषण (रेकॉर्ड)वरून आईनेच त्रिवेदी याच्याशी संगनमताने  वडिलांचा खून केल्याचे समजताच, मुलीने शनिवारी (दि.१२) पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिसांनी रंजना रामटेके आणि मुकेश त्रिवेदी या दोघांना ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता, पती श्याम रामटेके यांचा खून केल्याचे सत्य बाहेर आले. पोलिसांनी रंजना रामटेके व तिचा प्रियकर मुकेश त्रिवेदी यांच्याविरुद्ध भादंवि १२० ब, २०१, ३०२ अन्वये गुन्हा दाखल करून अटक केली आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस