चंद्रपूर : स्वत:च्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधम बापाला बल्लारपूर पोलिसांनी अटक केल्याची घटना शहरात मंगळवारी (दि. २८) घडली. अत्याचाराची माहिती लपवून ठेवणारी आई व भावावरही गुन्हा दाखल झाला. न्यायालयाने आरोपीला दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
बल्लारपूर शहरातील एका वार्डात बापाने स्वत:च्याच अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला. याबाबत मुलीने आई आणि भावाला माहिती दिली. परंतु दोघांनी याकडे दुर्लक्ष केले. शेवटी मुलीनेच बल्लारपूर पोलिस ठाणे गाठून घडलेला सर्व प्रकार पोलिसांना सांगितला व तक्रार केली. त्यावरून पोलिसांनी वडिलाविरूद्ध भादंवि ३७६ व पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करून अटक केली. आई व भावाने माहिती लपवून ठेवल्याने पोलिसांनी दोघांवरही गुन्हा दाखल केला. पुढील तपास बल्लारपूर पोलिस करीत आहेत.