- साईनाथ कुचनकारचंद्रपूर - ग्रामीण भागामध्ये पाहिजे त्या सुविधा उपलब्ध नसतात. अनेक वेळा ग्रामस्थांजवळ असलेल्या वस्तू नादुरुस्त झाल्या की, त्या दुरुस्त करणेही कठीण होते. अशा एक ना अनेक अडचणी असतात. या अडचणीवर मात करून ग्रामीणांचे जीवन सुसह्य करण्यासाठी येथील आयटीआयच्या विद्यार्थ्यांनी पुढाकार घेतला. वढा या गावातील प्रत्येक नागरिकांच्या घरी जाणून विविध मेंटेनन्सची कामे निःशुल्क करून देत ग्रामस्थांची मने जिंकली.इलेक्ट्रिक ट्रेडच्या विद्यार्थ्यांनी कुणाचे कुलर, पंखे दुरुस्ती, वॉटर फिल्टर पंप, फ्रीज यासारख्या विजेची उपकरणे, तसेच वेल्डिंगची कामे करून दिली. एवढेच नाही तर पेंटर ट्रेडच्या प्रशिक्षणार्थ्यांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या भिंतीवर शालेय शिक्षणाच्या संबंधित पेंटिंग काढले. गवंडी विभागाच्या प्रशिक्षणार्थांनी सिव्हिल वर्क मेंटेनन्स करून दिले.
अख्ख्या गावातील इलेक्ट्रिक साहित्याची विद्यार्थ्यांनी करून दिली दुरुस्ती, वढा गावातील नागरिक झाले थक्क
By साईनाथ कुचनकार | Published: February 21, 2024 3:15 PM