चैतन्य कोहळेलोकमत न्यूज नेटवर्कमाजरी : भद्रावती तालुक्यातील माजरी गावात वाघांची दहशत कायम आहे. सोमवारी रात्री आठ वाजताच्या दरम्यान एका कामगारावर वाघाने त्याच्या घराजवळच हल्ला करून ठार मारल्याची घटना घडली. वनविभागाकडून वाघाला पकडण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरुच आहेत. गेल्या तीन दिवसांपासून माजरीत वाघाचा मुक्तसंचार असल्याने गावात दहशत पसरली आहे.सोमवारपासून वन विभाग आणि पोलीस प्रशासनाच्या अनेक टीम या वाघाचा शोध घेत आहे. दरम्यान, नवीन पोलीस अधीक्षक रविंद्रसिंग परदेशी हे परिस्थितीवर सतत लक्ष ठेवून आहे. वेळोवेळी ते माजरी पोलिसांना सूचना देत आहे. वाघाचा धोका लक्षात घेता पोलीस अधीक्षकांनी गस्तीकरिता बुधवारी रात्री एक पथक पाठविले. माजरी पोलीस प्रभावित क्षेत्रात तीन दिवंसापासून रात्रभर सायरन वाजवून गस्त देत नागरिकांना सुरक्षा देत आहे.
वेकोलिने ते पथदिवे बंद केल्याने धोका वाढलावेकोलि एका चुकीमुळे माजरी ग्रामस्थांना व कर्मचाऱ्यांना दहशतीत रहावे लागत आहे. एकता नगर व न्यू हाउसिंग परिसरातील पथदिवे माजरीचे मुख्य महाप्रबंधक वि के. गुप्ता यांनी बंद करून टाकले.
वनविभागाकडून प्रभावित क्षेत्रात ११ ट्रेस कॅमेरे लावण्यात आले आहे. मात्र एकाही कॅमेऱ्यात वाघाचा फोटो कैद झाला नाही.- धनराज गेडाम, वनरक्षक, वनविभाग भद्रावती.
नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. खोटी अफवा पसरविण्याऱ्यांवर कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल. नागरिकांनी याची नोंद घ्यावी. जर कोणालाही वाघ दिसून आल्यास माजरी पोलिसांना व वनविभागाला तात्काळ सूचना द्यावी.- विनीत घागे, ठाणेदार, पो. स्टे. माजरी