शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशातील हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराबाबत ममता बॅनर्जींनी मोदी सरकारला केली खास विनंती
2
यूपी गेट, चिल्ला बॉर्डरवर प्रचंड वाहतूक कोंडी… चर्चा निष्फळ झाल्यास शेतकरी दिल्लीकडे कूच करणार! 
3
“उद्धव ठाकरेंप्रमाणेच भाजपाने एकनाथ शिंदेंना फसवले”; काँग्रेसमधील ज्येष्ठ नेत्याचा दावा
4
सुखबीर सिंग बादल यांना शिक्षा; सुवर्ण मंदिरातील शौचालय आणि भांडी साफ करण्याचे आदेश
5
"तुमची कोंडी करण्याचा प्रयत्न होईल, शिंदेंना मी आधीच सांगितलं होतं’’, या नेत्यानं केला दावा  
6
INDU19 vs JPNU19 : भारतीय संघानं २११ धावांनी जिंकला सामना; जाणून घ्या सेमीचं समीकरण
7
जुळून येती रेशीमगाठी! मालिकेच्या सेटवर जमल्या जोड्या, बांधली लग्नगाठ, पाहा कोण आहेत ते?
8
“निवडणूक संपताच ST भाडेवाढ, लाडक्या बहिणीला २१०० देतील असे वाटत नाही”: नाना पटोले
9
"देवीने स्वप्नात येऊन सांगितलं, बळी द्या म्हणजे मुलगा बरा होईल", त्यानंतर घडलं भयानक...  
10
स्टीलनंतर आता ईव्ही मार्केटमध्ये JSW Group उतरणार, Tata-Mahindra ला देणार टक्कर!
11
“शेवटी भाजपा सांगेल तेच आता करावे लागणार”; मनसे नेत्याची एकनाथ शिंदेवर टीका
12
बांगलादेशमधील हिंदूंसाठी ठाकरे गट आक्रमक, प्रियंका चतुर्वेदींचं थेट मोदींना पत्र, केली अशी मागणी 
13
धक्कादायक! फुटबॉल मॅचमध्ये तुफान राडा, चाहते भिडले, हाणामारीत १००हून जास्त लोकांचा मृत्यू (Video)
14
भाजपाचा विधिमंडळ गटनेता कोण, निर्मला सीतारमन आणि रूपानींच्या उपस्थितीत होणार निर्णय
15
एकनाथ शिंदे नाराज होणं स्वाभाविक, त्यांच्यावर 'ही' जबाबदारी सोपवा; आठवलेंची नवी मागणी
16
Video कॉलने ९० वर्षीय आजोबांच्या आयुष्यात वादळ! आयुष्यभरात कमावलेले १.१५ कोटी गायब
17
८ दिवसांत २२ वेळा लागली शेतकऱ्याच्या घराला आग, धक्कादायक प्रकारामुळे गावकरी भयग्रस्त
18
'इतकं स्पष्ट बोलूनही शिंदेंवर आरोप करणं योग्य नाही'; संजय शिरसाटांनी मांडली भूमिका
19
ओला इलेक्ट्रिक ३२०० नवीन स्टोअर्स उघडणार, देशभरातील सर्व्हिस नेटवर्क मजबूत करणार!
20
२४ तासांत युटर्न! अविनाश जाधवांनी घेतला राजीनामा मागे; राज ठाकरेंच्या आदेशाचे पालन करणार

जलजीवन मिशनचेही काम दीड वर्षापासून अर्धवट; नागरिकांमध्ये तीव्र संताप

By ऑनलाइन लोकमत | Published: December 02, 2024 2:06 PM

जुनी नळयोजना ठप्प : नागरिकांत तीव्र संताप, काम त्वरित पूर्ण करण्याची मागणी

दीपक साबने लोकमत न्यूज नेटवर्क जिवती : दोन वर्षांपूर्वी जलस्वराज्य प्रकल्प अंतर्गत ग्रामपंचायत येल्लापूर येथे नळयोजनेद्वारे पाणीपुरवठा अनियमित का होईना पण सुरू होता. सर्वांना स्वच्छ व मुबलक पाणी देण्याच्या उदात्त हेतूने शासनाच्या जलजीवन मिशन या महत्त्वाकांक्षी योजनेअंतर्गत तालुक्यातील येल्लापूर येथे काम मंजूर झाले व कामास सुरुवातही करण्यात आली. तेव्हा अस्तित्वात असलेली गावातील जुनी जलस्वराज्य प्रकल्प अंतर्गत नळयोजनेसाठी केलेली पाइपलाइनही उद्ध्वस्त केली. आता नवीन जलजीवन मिशनचे कामही जवळपास दीड वर्षापासून ठप्प आहे. त्यामुळे गावात कृत्रिम पाणीटंचाईसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे.

परिणामी गावातील नागरिकांसह दिव्यांग, वयोवृद्ध, दीर्घ आजार असणाऱ्या कुटुंबांतील सदस्यांना पाण्यासाठी नाहक त्रास सहन करावा लागत असल्याचे वास्तव चित्र आहे. ग्रामपंचायत येल्लापूर येथे जवळपास अडीच हजार लोकसंख्या आहे. येथे पाच हातपंप, सहा विहिरी आहेत. सध्या जवळपास सर्वच पाण्याच्या स्रोतात पाणी मुबलक आहे. जिल्हा परिषद शाळेजवळील व गावालगत असलेली पिण्याच्या पाण्याची विहीर ढासळून दोन वर्षांचा कालावधी लोटला, तरी प्रशासन लक्ष द्यायला तयार नाही. या विहिरीवरून पाणी भरताना दुर्दैवी घटना घडण्याची दाट शक्यता आहे. सध्या येल्लापूरवासीय तलावाखाली असलेल्या पिण्याच्या पाण्याच्या विहिरीवरून बैलबंडी, ऑटो, सायकल व दुचाकीच्या साहाय्याने पाणी आणतात. ज्यांच्याकडे वरील साधने नाहीत, त्यांना पाण्यासाठी पायपीट करावी लागते व जे दूरवर पायपीट करू शकत नाही, त्यांना एक माठ पाण्याचे १५० ते २०० रुपये मोजावे लागतात. 

विशेष म्हणजे, गावात अशी काही कुटुंबे आहेत, त्यांच्या घरी पाणी आणण्यासाठी कोणीही नाहीत. दिव्यांग व्यक्तींनाही त्यांच्या तीनचाकी सायकलवर पाणी आणण्याची वेळ आली आहे. सुपारी आत्राम हा दिव्यांग पाणी आणण्यासाठी दररोज आपल्या नातेवाइकांना सोबत घेऊन आपल्या तीन चाकी सायकलवरून पाणी आणतो. दीड वर्षापासून अर्धवट असलेल्या जलजीवनच्या कामामुळे वरील त्रास गावकऱ्यांना सहन करावा लागत आहे. 

शेतीची कामे सोडून पाण्यासाठी भटकंती गावात सर्व शेतकरीवर्ग असल्याने सध्या शेतकरी कुटुंबातील सर्वच सदस्य शेतीच्या कामात व्यस्त आहेत. सकाळी उठून पाणी आणण्यासाठी जास्तीचा वेळ वाया जातो. याचा परिणाम शेती कामावर होताना दिसून येत आहे.

"जलजीवनचे अर्धवट काम पूर्ण करून पाणीपुरवठा सुरळीत करण्यासंदर्भात अनेकदा पाठपुरावा केला. मात्र, या गंभीर समस्येची प्रशासनाने दखल घेतली नाही. संबंधित विभागाने या गंभीर समस्येकडे जातीने लक्ष देऊन दीड वर्षापासून अर्धवट राहिलेल्या जलजीवन मिशनचे काम त्वरित पूर्ण करावे आणि गावातील नागरिकांना नळयोजनेद्वारे पाणीपुरवठा करावा. अन्यथा नाइलाजाने आंदोलनाचा मार्ग अवलंबावा लागेल." - प्रशांत कांबळे, सदस्य ग्रामपंचायत तथा सामाजिक कार्यकर्ता.

टॅग्स :water transportजलवाहतूकwater shortageपाणीकपातwater scarcityपाणी टंचाईchandrapur-acचंद्रपूर