शहरं
Join us  
Trending Stories
1
मतांमधील तफावतीबाबत 'लोकमत'च्या बातमीवर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण, म्हणाले...
2
आग्रा-लखनौ एक्स्प्रेस-वेवर भीषण अपघात, सैफई मेडिकल युनिव्हर्सिटीमधील ५ डॉक्टरांचा मृत्यू   
3
मुख्यमंत्रि‍पदाच्या स्पर्धेतून एकनाथ शिंदेंची माघार?; भाजप हायकमांडच्या भूमिकेनंतर चर्चांना उधाण
4
'एक'नाथ हैं तो सेफ है' घोषणेवर भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...
5
युद्ध थांबले! इस्रायल आणि हिजबुल्लामध्ये युद्धविराम, दोन्ही देशात करार झाला; वाचा सविस्तर
6
६५ टक्के आमदारांवर गंभीर गुन्हे, २७७ करोडपती; जाणून घ्या, शिक्षित आमदार किती?
7
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
8
SIP Vs PPF Vs ELSS: ₹१.५ लाखांच्या गुंतवणुकीवर पहिलं कोण बनवेल कोट्यधीश; पाहा गणित, मिळतील ₹८.११ कोटी
9
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रिय व्यक्तीच्या सहवासात रोमांचित व्हाल!
10
मतदान करत नाही, मग 'हे' वाचाच; स्वतंत्र वाहन, रात्रभर २५० किमी प्रवास अन् पोहोचलं एक मत..
11
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
12
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
13
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
14
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
15
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
16
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
17
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
18
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
19
विद्यार्थ्यांच्या नोंदणीसाठी शिक्षकांचे 'अपार' कष्ट; २५ टक्के नोंदणी अपूर्ण
20
शेती आणि शेतकरी - यंदाच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतून दोघेही हद्दपार!

झाडीपट्टीतील रंगमंचाची उणीव दूर करणार नाट्यगृह

By admin | Published: April 05, 2017 12:35 AM

रामनवमीचा दिवस मूलवासीयांसाठी आनंदाचा ठरला. या दिवसाचा मुहूर्त साधून मुख्यमंत्र्यांच्या हस्ते कर्मवीर मा.सा. कन्नमवार सांस्कृतिक सभागृहाचे थाटात लोकार्पण झाले.

कन्नमवार सांस्कृतिक सभागृहाचे थाटात लोकार्पण : श्यामाप्रसाद मुखर्जी वाचनालय जनसेवेत रूजूराजू गेडाम/ भोजराज गोवर्धन मूलरामनवमीचा दिवस मूलवासीयांसाठी आनंदाचा ठरला. या दिवसाचा मुहूर्त साधून मुख्यमंत्र्यांच्या हस्ते कर्मवीर मा.सा. कन्नमवार सांस्कृतिक सभागृहाचे थाटात लोकार्पण झाले. तर, याच दिवसाचा मूहूर्त साधून मूलवासीयांच्या सेवेत शामाप्रसाद मुखर्जी वाचनालय जनसेवेत रूजू करण्यात आले. जिल्ह्याचे पालकमंत्री तथा वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पुढाकार घेवून या दोन्ही वास्तू मूल वासीयांच्या सेवेत सादर केल्या. भर उन्हातही मोठ्या उत्साहाने आलेली जनता आपल्या गावच्या पुत्राचे अर्थात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतूक न्यहाळत मोठ्या आनंदाने या सोहळ्यात सहभागी झाली होती. दुपारच्या रणरणत्या उन्हातही कर्मवीर मा. सा. कन्नमवार उपाख्य दादासाहेब यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी झालेला हा सोहळा म्हणजे मूलच्या विकासातील एक नवी पर्वणी ठरली.ज्या महाराष्ट्रात कन्नमवारांनी सेवा केली त्या कन्नमवारांची ही कर्मभूमी आहे, त्यांच्याच नावाने सांस्कृतिक सभागृह उभे झाले. कन्नमवारांचे विचार चांदापासून तर बांद्यापर्यंत पोहचविण्याची तमची व माझी जबाबदारी आहे, ते आपण मिळून पूर्ण करु, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जनतेला केले, तेव्हा टाळ्यांच्या कडकडाने परिसर निनादून गेला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हा लोकार्पण सोहळा पार पडला. केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहीर, वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार, प्रमुख अतिथी म्हणून शोभाताई फडणवीस, वनविकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंग चंदेल, आमदार नाना शामकुळे, संजय धोटे, कीर्तीकुमार भांगडिया, विधान परिषदेचे सदस्य मितेश भांगडिया, जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे, माजी मंत्री संजय देवतळे, भाजपाच्या तालुकाध्यक्ष संध्या गुरुनुले, नगराध्यक्ष रत्नमाला भोयर, बल्लारपूरचे नगराध्यक्ष हरीष शर्मा आदी उपस्थित होते. यावेळी स्व. मा.सा.कन्नमवाराचे वारसदार नंदा कन्नमवार, पुतणे सुरेश कन्नमवार, नात पद्मा जोगेवार, किशोर जोगेवार, डॉ. राहुल कन्नमावार यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शाल व नटराजाची मूर्ती देवून स्वागत करण्यात आले. व मूर्तीकार अनुप पोहेकर यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला. सुमारे १३ लाख रुपये खर्च करुन स्व. मा.सा. कन्नमवार यांच्या नावाने स्मारक उभारण्यात आले. यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अधिकारी नरेंद्र बुरांडे, शाखा अभियंता बाळू षटगोपनवार, बोबडे, पुरुषोत्तम मेश्राम यांनी काम पाहिले.ना. मुनगंटीवार यांनी मनातील भावना बोलून दाखविली. ते म्हणाले, मुंबईत कलामंदिर आहेत. चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात कलाकाराची कमी नाही परंतु त्यांना व्यासपिठ उपलब्ध नाही. ही भूमी हिरा निर्माण करणाऱ्यांची आहे. त्यामुळेच हे व्यासपीठ मा.सां. कन्नमवारांच्या नावाने स्मारक तयार केल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. तालुका क्रीडा संकुलाच्या मैदानावर झालेल्या समारंभादरम्यान मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मा.सा. कन्नमवार यांच्यावर आधारीत पुस्तिकेच प्रकाशन करण्यात आले. तसेच कॅशलेश व्यवहार करता यावे यासाठी स्वस्त धान्य दुकानदारांना पॉस मशिनचे वाटपही करण्यात आले.नाट्यगृहातील कार्यक्रमाचे संचालन प्रा. नरेंद्र आरीकर यांनी केले. तर, जाहीर सभेच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अधीक्षक बालपांडे यांनी केले. संचालन ऐश्वर्या भालेराव यांनी केले. उपस्थितांचे आभार नगराध्यक्ष रत्नमाला भोयर यांनी मानले.वित्तमंत्र्यांचे कौतुकराज्यात देवेंद्र फडणवीस आणि वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या रुपाने युवाजोडी मिळालेली आहे ही जोडी मोठ्या प्रमाणावर विकास करीत आहे, अशा शब्दात गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी या दोघांचे कौतुक केले. तर, कर्मवीर कन्नमवारांच्या स्मारकासाठी वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केलेल्या संघर्षाची जाणीव मुख्यमंत्र्यांनी सभेतून करून दिली. ज्या कॉंग्रेस पक्षाचे ते नेते होते तो पक्षच त्यांना विसरला. मात्र त्यांच्या कर्तृत्वाचा सन्मान करत त्यांचे स्मारक मूल शहरात उभारण्यासाठी ना.मुनगंटीवार यांनी केलेला संघर्ष अभिनंदनीय आणि आदर्शवत आहे, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले.