शहरं
Join us  
Trending Stories
1
"दिवट्या आमदार...", पोर्शे प्रकरणावरून सुनील टिंगरे शरद पवारांच्या 'रडार'वर!
2
"मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनामागील सूत्रधार..."; नरेंद्र पाटलांचा गंभीर आरोप
3
मोबाईलमधले फोटो, टोकाचं भांडण, रक्तरंजित प्रेम; महालक्ष्मीच्या हत्येच्या रात्री नेमकं काय घडलं?
4
NCP च्या जागेवर दावा; मुलाच्या उमेदवारीसाठी माजी आमदाराची उद्धव ठाकरेंकडे मागणी
5
एका घरात पाच मृतदेह! चार मुलींसह वडिलांनी संपवलं आयुष्य, कारण...
6
गौतम अदानींना ज्यांनी तारलं, त्यांनाच अमेरिकेत बसला लाखो डॉलर्सचा दंड; कारण काय?
7
IND vs BAN : जा रे जारे पावसा! दुसऱ्या दिवसाचा बहुतांश खेळ पाहण्यात नव्हे पाण्यात जाणार?
8
त्रिग्रही बुधादित्य राजयोग: ७ राशींना अनुकूल, सरकारी कामात लाभ; उत्पन्नात वाढ, मनासारखा काळ!
9
मुंबईत ठाकरेंच्या युवासेनेचा जल्लोष; सिनेट निवडणुकीत पुन्हा एकदा १० पैकी १० विजयी
10
विधानसभा निवडणूक एकाच टप्प्यात घ्या; शिंदेसेना, अजित पवार गटाची मागणी
11
Today Daily Horoscope आजचे राशीभविष्य: विविध पातळ्यांवर यश, किर्ती व लाभासह धन प्राप्ती होईल
12
'ती माझी मुलगी आहे...', IIFA सोहळ्यावेळी आराध्याबद्दल विचारताच ऐश्वर्याचं पत्रकाराला थेट उत्तर
13
आज शेअर बाजार खुला राहणार, NSE वर होणार विशेष ट्रेडिंग सेशन; कारण काय?
14
Zomatoच्या सह-संस्थापक आकृती चोप्रा यांचा राजीनामा; १३ वर्षाचा प्रवास थांबला, पाहा त्यांची Networth किती?
15
Bigg Boss Marathi Season 5: राखी सावंतची घरात एन्ट्री! 'ड्रामा क्वीन'ला पाहून निक्कीची झाली अशी अवस्था; प्रोमो व्हायरल
16
उद्धव युवासेनेचा अखेर सिनेटवर झेंडा; विद्यापीठाच्या निवडणुकीत अभाविपचा उडाला धुव्वा
17
अग्रलेख : फडणवीसांचा कबुलीनामा; अजित पवारांना सोबत घेतल्यानंतर ‘परिवार’ फारच अस्वस्थ
18
मतदारांची गैरसोय झाल्यास अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई; केंद्रीय निवडणूक आयोगाचा इशारा
19
बहिणींच्या पैशांवर नजर ठेवाल तर खबरदार...; फडणवीस यांचा विरोधकांना इशारा
20
मध्य रेल्वेवर उद्या ५ तासांचा मेगाब्लॉक; तिन्हा मार्गांवरील लोकल धावणार उशिरा

रक्तपेढ्यांमध्ये दोन दिवस पुरेल एवढाच रक्तसाठा

By परिमल डोहणे | Published: May 14, 2024 2:23 PM

चंद्रपूर ब्लड बँकेतील स्थिती : स्वयंस्फूर्तीने रक्तदान करण्याचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : उन्हाळ्यात रक्तदान शिबिरांची कमी झालेली संख्या व गैरसमजुतीमुळे रक्तदानाचा टक्का घसरला आहे. परिणामी, शासकीयसह खासगी रक्तपेढ्यांमध्ये दोन ते तीन दिवस पुरेल एवढाच रक्तसाठा आहे. धक्कादायक म्हणजे, शासनाच्या 'ई रक्तकोष पोर्टल'वर खासगी रक्तपेढ्यात, तर नाहीच्या बरोबरीत रक्तसाठा उपलब्ध असल्याची नोंद आहे.

रक्ताची भीषण टंचाई पाहता दात्यांनी स्वयंस्फूर्तीने रक्तदान करण्याचे आवाहन केले जात आहे. चंद्रपुरात शासकीयसह खासगी रुग्णालयातून अत्याधुनिक आणि दर्जेदार सुविधा देणारी अनेक खासगी रुग्णालये आहेत. यामुळे चंद्रपूर, गडचिरोलीसह, आंध्र प्रदेश, तेलंगणा राज्यातील रुग्ण चंद्रपुरात उपचारांसाठी येतात. यात प्रामुख्याने गंभीर आजार, अपघात आणि बाळंतपणाच्या रुग्णांची संख्या अधिक असते. याशिवाय, सिकलसेल, थलेसेमिया, कॅन्सरबाधित रुग्णांना नियमित रक्त द्यावे लागते. यांना रक्तपुरवठा करणाऱ्या चंद्रपुरातील जनरल हॉस्पिटल ब्लड बैंक ही शासकीय, ख्रिस्तानंद एज्युकेशन सोसायटी ब्लड सेंटर चंद्रपूर ही चॅरिटेबल ब्लड बैंक, तर संजीवन ब्लस सेंटर व अंकुर ब्लड सेंटर या दोन खासगी ब्लड बँक आहेत.

परंतु, या सर्वच ब्लड बँकेचा विचार केल्यास बोटावर मोजण्याइतक्या रक्तपिशव्या उपलब्ध असल्याचे पोर्टलवर दिसून येत आहे. खासगी रुग्णालयात तर नाहीच्या बरोबरीतच रक्तपिशव्या असल्याची पोर्टलवर नोंद आहे. त्यामुळे तुटवळा भासण्याची शक्यता आहे.

'ई रक्तकोष पोर्टल' नुसार रक्तपेढ्यांमधील सोमवारची अशी होती स्थितीरक्तपेढीचे नाव                   एबी+              ए+                   बी+                 ओ+           ए-               बी-           ओ-अंकुर हॉस्पिटल                       ०                   १                        १                        ०                 ०                 ०                ० संजीवनी ब्लड                         ०                    ०                        ०                        ०                 १                 १                ०ख्रिस्तानंद                                ४                   १७                     १५                      १०                ०                 ०                ०जनरल हॉस्पिटल                     १२                  १८                     ४७                     ३८                १                 ०                २

सामाजिक संस्थांनी पुढाकार घ्यावाउन्हाळा असल्याने रक्तदान शिबिर घेण्याचे प्रमाण अत्यल्प आहे. जिल्ह्यात सद्यःस्थितीत रक्ताचा साठा अल्प प्रमाणात दिसून येत आहे. त्यामुळे सामाजिक संस्थांनी रक्तदान शिबिर राबविण्यासाठी पुढाकार घेणे गरजेचे आहे. यासोबतच इतर रक्तदात्यांनीसुद्धा रक्तदानासाठी सामोरे जाणे गरजेचे आहे.

दररोज ५० पिशव्यांची मागणीचंद्रपूर शहरात अनेक अद्ययावत खासगी रुग्णालये आहेत. तसेच जिल्हा सामान्य रुग्णालयात वैद्यकीय महाविद्यालय सुरू झाल्यापासून येथे चंद्रपूर, गडचिरोलीसह, आंध्र प्रदेश, तेलंगणा राज्यातील रुग्ण उपचारांसाठी येतात. त्यामुळे येथे दररोज ४० ते ५० युनिटची मागणी असते. मात्र, त्यातुलनेत ब्लड संकलित होताना दिसून येत नाही. परिणामी ब्लडची टंचाई नेहमीच दिसून येत असते.

चंद्रपुरात दररोज ४० ते ५० युनिटची आवश्यकता असते. त्या तुलनेत ब्लड संकलित होण्याचे प्रमाण कमी असते. सद्यःस्थितीत जिल्ह्यात केवळ दोन ते तीन दिवस पुरेल एवढाच रक्तसाठा उपलब्ध आहे. रक्तदान श्रेष्ठदान असल्याने सामाजिक संस्था, तसेच रक्तदात्यांनी पुढाकार घेऊन रक्तदान करावे.-डॉ. अमित प्रेमचंद, रक्तपेढी विभाग प्रमुख, चंद्रपूर 

टॅग्स :Blood Bankरक्तपेढीchandrapur-acचंद्रपूर