चंद्रपुरात स्पर्धा परीक्षा केंद्राचे लोकार्पण : सुधीर मुनगंटीवार यांचे प्रतिपादनचंद्रपूर : महाराष्ट्र ही जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराजांची भुमी आहे. महाराष्ट्राला पुढे न्यायचे असेल तर शिक्षणाशिवाय दुसरा कोणताही समर्थ पर्याय नाही, असे प्रतिपादन राज्याचे वित्त वनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. ज्युबिली हायस्कुल चंद्रपूर येथे स्पर्धा परिक्षा पूर्व तयारी केंद्राचा लोकार्पण सोहळा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते सोमवारी पार पडले. या कार्यक्रमात ते बोलत होते. ज्युबिली हायस्कुल येथील स्पर्धा परिक्षा पूर्ण तयारी केंद्र हिऱ्यासारख्या विद्यार्थ्यांवर पैलु पाडण्यासाठीचे केंद्र ठरावे, अशी अपेक्षा ना. मुनगंटीवार यांनी यावेळी व्यक्त केली.लोकार्पण सोहळ्याला आ. नाना शामकुळे, जि. प. अध्यक्ष देवराव भोंगळे, महापौर अंजली घोटेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी पापळकर, जि. प. उपाध्यक्ष कृष्णा सहारे, सभापती अर्चना जिवतोडे, संतोष तंगडपल्लीवार, केंद्रे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक सिरसे, शिक्षणाधिकारी डोर्लीकर आदींची प्रामुख्याने उपस्थीती होती. यावेळी बोलताना ना. मुनगंटीवार म्हणाले, जेव्हा आपण एक रस्ता बनवितो त्यावरून हजारों व्यक्तींना सहज चालता येते. मात्र या केंद्राच्या माध्यमातून हजारों रस्ते तयार करणारे ज्ञानी व्यक्ती आपण तयार करणार आहोत. हे स्पर्धा परिक्षा पूर्ण तयारी केंद्र सोईसुविधांनी परीपूर्ण होण्याच्या दृष्टीने वातानुकुलीत संयंत्र, संगणक संच, जनरेटर, प्रोजेक्टर व ध्वनी व्यवस्था, पुस्तके यासाठी जिल्हा वार्षीक योजनेच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून देवू, असे आश्वासन ना. मुनगंटीवार यांनी यावेळी दिले.
विकासासाठी शिक्षणाशिवाय पर्याय नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 02, 2017 1:05 AM