शहरात जागा मिळेल तिथे इमारती उभ्या होत आहेत. मात्र, वाहनतळाकडे दुर्लक्ष केले जात आहे. महापालिकेकडे दाखल नकाशानुसार बांधकाम न करता आपल्या मर्जीनुसार बांधकाम केले जात आहे. शहरातील रस्ते पूर्वीच अरुंद आहेत. त्यातच या रस्त्यावर वाहन ठेवण्यात येत असल्याने अडचण होते.
उड्डाणपुलाच्या देखभालीकडे दुर्लक्ष
चंद्रपूर : शहरात चार ते पाच उड्डाण पूल आहेत. मात्र, त्याच्या देखभाल दुरुस्तीकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष झाले आहे. विशेष म्हणजे, येथील वरोरा नाका चौकामध्ये असलेल्या उड्डाण पुलाच्या भिंतीवर झुडुपे वाढली आहेत. त्यामुळे पुलाला भेगा जात आहेत. मात्र, सदर झुडपे काढण्याकडे कुणीही लक्ष द्यायला तयार नाही. त्यामुळे भविष्यात अपघात झाल्यास जबाबदार कोण, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
वरोरा नाका चौकामध्ये मोठ्या प्रमाणात अपघात होत होते. त्यामुळे पर्यायी व्यवस्था म्हणून नव्याने पुलाचे बांधकाम करण्यात आले. दरम्यान, डाॅ. आंबेडकर काॅलेजकडे जाणारा पूल तयार असूनही तो अद्याप सुरू करण्यात आलेला नाही.