शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
5
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
6
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
7
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
8
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
9
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
10
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
11
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
12
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
13
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
14
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
15
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
16
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
17
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
18
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
19
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
20
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."

आदिवासींमध्ये घुसखोरीला वाव नाही

By admin | Published: June 11, 2017 12:31 AM

धनगरांसह कोणत्याही गैर जात समूहांची संविधानातील आदिवासींच्या दुसऱ्या सूचीमध्ये घुसखोरी होऊ नये,...

आदिवासी विकास परिषद : राज्यपालांना निवेदन सादरलोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : धनगरांसह कोणत्याही गैर जात समूहांची संविधानातील आदिवासींच्या दुसऱ्या सूचीमध्ये घुसखोरी होऊ नये, या महत्त्वपूर्ण मागणीसह आदिवासींवरील अन्याय अत्याचार, शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक आणि मूलभूत समस्येसाठी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष मधुकरराव पिचड यांच्या नेतृत्वात राज्यपाल विद्यासागर राव यांची मुंबई येथील राजभवनात भेट घेण्यात आली. यावेळी राज्यपालांनी आदिवासींच्या घटनादत्त अधिकारात कोणाचाही समावेश करता येणार नसल्याचे सांगितले.यावेळी आदिवासींच्या अज्ञानाचा फायदा घेऊन सवलती लाटणाऱ्या बोगस जातींसह आदिवासींमध्ये घुसखोरी करू पाहणारी धनगर जात कशी विभिन्न आहे, हे संपूर्ण दाखले पुराव्यासह सर्वश्री आदिवासींचे नेते मधुकरराव पिचड, माजी मंत्री अ‍ॅड. शिवाजीराव मोघे, माजी मंत्री प्रा. वसंतराव पुरके, माजी मंत्री अ‍ॅड. पद्माकर वळवी, ज्येष्ठ आदिवासी साहित्यिक डॉ. प्रा. विनायक तुमराम, डॉ. अ‍ॅड. नामदेवराव किरसान आणि आदिवासींच्या सामाजिक अभ्यासकांनी राज्यपालांना समजावून सांगितले. राज्यापाल सी. विद्यासागर राव यांनी आदिवासींच्या घटनादत्त अधिकारात गैरांचा समावेश करणार नाही किंवा आदिवासींच्या आरक्षणावर आच येऊ देणार नसल्याचे आश्वासन दिले.शिष्टमंडळात माजी आमदार पांडू चापू गांगड, माजी आमदार शिवराम झोले, नारायण सिडाम, राम चव्हाण, रामनाथ भोजने, लक्की जाधव, विलास वाघमारे, केशव तिराणिक, बाबूराव जुमनाके, कृष्णराव परतेकी, आर.यु. केराम, प्रभुदास सोयाम, दिनेश शेराम, गोविंद साबळे, उमेश पवार, आनंद पवार, मंगलदास भवारी आदींचा समावेश होता.राजकीय नेत्यांचे आमिषकोणत्याही जाती संविधानाच्या सूचीमधून काढायच्या आणि घालायच्या झाल्यास आदिवासी संशोधन व प्रशिक्षण केंद्र, पुणे यांचा अहवाल प्राप्त झाल्यावरच फेरबदल घडून येवू शकतो. तसेच टाटा इंस्टिट्युट आॅफ सोशल सायंसेस या संस्थेनेही धनगर ही जात कोणत्याच बाजूने आदिवासींचे निकष पूर्ण करू शकत नसल्याचे आपल्या एका अहवालात म्हटले आहे. धनगरांना आदिवासी बनविण्याचे दिशाहीन आश्वासन दिले जात आहे. ही बाब राज्यपालांच्या निदर्शनास आणण्यात आली.