शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

बसस्थानकावरील प्रवाशांचे पाण्याविना हाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2019 10:45 PM

उन्हाळा सुरू होण्यापूर्वीच राज्य परिवहन महामंडळाने जिल्ह्यातील सर्व बसस्थानक परिसरात पिण्याचे शुद्ध पाणी उपलब्ध करून देण्यासाठी नियोजन करणे अत्यावश्यक होते. परंतु, याकडे दुर्लक्ष केल्याने प्रमुख बसस्थानकांसह ग्रामीण भागातील अनेक बसस्थानक व प्रवासी निवाऱ्यात पिण्याचे पाणी मिळत नाही. यामुळे प्रवाशांचे हाल सुरू आहेत.

ठळक मुद्देराज्य परिवहन महामंडळाचे दुर्लक्ष : पिण्याच्या पाण्यासाठी घ्यावा लागतो उपहारगृहांचा आधार

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : उन्हाळा सुरू होण्यापूर्वीच राज्य परिवहन महामंडळाने जिल्ह्यातील सर्व बसस्थानक परिसरात पिण्याचे शुद्ध पाणी उपलब्ध करून देण्यासाठी नियोजन करणे अत्यावश्यक होते. परंतु, याकडे दुर्लक्ष केल्याने प्रमुख बसस्थानकांसह ग्रामीण भागातील अनेक बसस्थानक व प्रवासी निवाऱ्यात पिण्याचे पाणी मिळत नाही. यामुळे प्रवाशांचे हाल सुरू आहेत.शहरातील तीनही बसथांब्यांचा घसा कोरडानागभीड : शहरात तीन बसथांबे आहेत. पण तिनही बस थांब्यांचा पाण्याविना 'घसा' कोरडा पडला, असे म्हणण्याची वेळ आली. येथून प्रवास करणाºया प्रवाशांना आपला पाणी विकत घ्यावे लागते अथवा उपहारगृहांचा आधार घ्यावा लागत आहे. ही परिस्थिती अनेक वर्षांपासून बदलली नाही. शहरात जुने बसस्थानक, टी पार्इंट चौक आणि राम मंदिर चौक बसथांबा देण्यात आला. नागपूर, वर्धा,गडचिरोली, च्ांद्र्रपूर, भंडारा , गोंदिया या जिल्ह्यांना नागभीड हे मध्यवर्ती ठिकाण आहे. या ठिकाणाहून प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. सर्व जिल्ह्यातील बस तथा ट्रॅव्हल व अन्य वाहनांची नागभीड येथूनच सतत ये-जा सुरू असते. पण, तिनही बसस्थानकांवर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही. येथून प्रवास करणाºया प्रवाशांना तहान लागल्यानंतर हॉटेल किंवा दुकानातून पाणी विकत घ्यावे लागते. बसस्थानकाजवळ असलेल्या उपहारगृह चालकांना विनंती करून पाणी मागण्याची वेळ आली आहे. राम मंदिर चौकात तत्कालीन ग्रामपंचायत आणि राममंदिर व्यवस्थापन समितीच्या संयुक्त विद्यमाने एका पाणपोई कायमस्वरूपी व्यवस्था करण्यात आली होती. मात्र पाच वर्षांपूर्वी रस्ता रूंदीकरणाच्या कामात ही पाणपोई तोडण्यात आली. त्यानंतर या ठिकाणी कायमस्वरूपी पाणपोई सुरू होऊ शकली नाही.वरोरा बसस्थानकावर नाही थंड पाणीवरोरा: तालुक्यातील ग्रामीण भागातील शेकडो नागरिक शासकीय तसेच बाजाराकरिता शहरात येतात. यामुळे बसस्थानक परिसरात दिवसभर प्रचंड गर्दी असते. पण बसस्थानकात पिण्याच्या थंड पाण्याची व्यवस्था नाही. प्रवाशांना पैसे खर्च करुन आपली तहान भागवावी लागत आहे. शहरातील बसस्थानकावर वरोरा, भद्रावती, चिमूर, वणी तालुक्यातील शहरी व ग्रामीण भागातील नागरिकांची मोठी वर्दळ असते. याशिवाय शाळा व महाविद्यालयाचे शेकडो विद्यार्थ्यांनी बसने प्रवास करतात. पण, पिण्याच्या शुद्ध पाण्याची व्यवस्था नाही. उन्हामुळे पिण्याचे पाणी गरम होते. प्रवासी पिण्याच्या पाण्यापर्यंत जातात. मात्र, पाणी गरम असल्याने पिऊ शकत नाही. सामाजिक संघटना दरवर्षी उन्हाळ्यात दिवसात बसस्थानकाच्या आवारामध्ये पाणपोई सुरु करते. सामाजिक भावनेने सुरू असलेला हा उपक्रम प्रवाशांसाठी उपयुक्त ठरला होता. या पाणपोईमधून प्रवाशांना थंड पाणी मिळत होते. यंदा सामाजिक संघटनेने बसस्थानक परिसरात पाणपोई लावली नाही. बसस्थानकासोबतच वरोरा शहरातील रत्नमाला चौक, बोर्डा चौक, आनंदवन चौकामधून मोठ्या प्रमाणात प्रवासी नागपूर-चंद्रपूर शहराकडे जाण्याकरिता उभे असतात. याठिकाणीही प्रवाशांकरिता पिण्याची पाण्याची व्यवस्था नाही. यामुळे नाईलाजस्तव प्रवाशांना पैसे देवून पाणी विकत घ्यावे लागत आहे. एप्रिल महिन्यातच यंदा सुर्य आग ओकू लागला आहे. मे महिन्यात उन्हाच्या चटक्यांना नागरिक कसे सामोरे जाणार, याची चिंता वाटू लागली आहे. त्यामुळे राज्य परिवहन मंडळाने थंड पाण्याची व्यवस्था करण्याची मागणी जोर धरत आहे.गोंडपिपरी बसस्थानकावर मिळते अशुद्ध पाणीआक्सापूर: गोंडपिपरी बसस्थानक चंद्र्रपूर ते अहेरी महामार्गावर मध्यभागी आहे. या बसस्थानकावरून दररोज शेकडो बसेस ये-जा करतात. तालुक्याचे ठिकाण असल्याने बसस्थानकावर मोठी गर्दी असते. बसस्थानकाची निर्मिती झाल्यापासून येथे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली. याकरिता स्वतंत्र कक्ष आहे. प्रवाशांची संख्या लक्षात घेऊनच राज्य परिवहन महामंडळाने नियोजन केले. नागपूर, अमरावती, गडचिरोली, अहेरी, आल्लापल्ली, सिरोंचा, मूल, सावली शहराकडे जाण्यासाठी हे बसस्थानक महत्त्वपूर्ण आहे. सध्या लग्नाचा हंगाम सुरू असल्याने बसस्थानकावर शेकडो प्रवासी बसची प्रतीक्षा करतात. त्यामुळे पिण्याचे शुद्ध पाणी मिळणे गरजेचे आहे. पण, येथील जलकक्षात थंड पाणी मिळत नाही. उन्हातून आल्यानंतर थंड पाणी मिळाल्यास प्रवाशांचा थकवा दूर होतो. मात्र, गोंडपिपरी बसस्थानकावर उलट चित्र दिसून येत आहे. गरम व अशुद्ध पाण्यावरच तहान भागवावी लागत आहे.ब्रह्मपुरी आगारात मिळते गरम पाणीब्रह्मपुरी: शहरातील बस आगारात थंड पाण्यासाठी एक फ्रिजर आहे. पण मागील १५ दिवसांपासून नादुरूस्त आहे. त्यामुळे पाणी उपलब्ध असूनही प्रवाशांना नाईलाजास्तव गरम पाणी प्यावे लागत आहे. ब्रम्हपुरी आगारात दररोज १५० बसफेºया ये जा करतात. दिवसभर शेकडो प्रवासी बसस्थानक राहतात. सध्या ब्रम्हपुरीचे तापमान ४५ अंश सेल्सिअसच्या जवळ जात आहे. अशातच सार्वजनिक ठिकाणी पिण्याच्या पाण्यासाठी पाणपोई उभारण्यात आल्या आहेत. बसस्थानकावरील प्रवाशांची संख्या विचारात घेऊन थंड पाण्याची सुविधा उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. येथील आगारात पाणी उपलब्ध आहे. पण फ्रिजर एकच असल्याने थंड पाण्याचा पुरवठा खंडित होतो. फ्रिजर नादुरूस्त असल्याचे निदर्शनास आले. प्रवासी वाहतूक विस्कळीत होऊन ख्रिस्तानंद चौकात वाहतूक एकवटली. या ठिकाणी मोठी गर्दी असते. शेकडो प्रवाशांना सहजपणे पिण्याचे थंड पाणी मिळावे, याकरिता उपाययोजना करण्याची मागणी प्रवाशांनी केली.