चेहरे खुलले : दोन दिवसांत उत्पादन सुरु होणारबल्लारपूर : मागील बऱ्याच दिवसांपासून बंद असलेल्या येथील बल्लारपूर पेपरमिलमधील बॉयलरच्या चिमणीमधून काल मंगळवारला पहाटेपासून धूर निघू लागला. ते बघून, आता पेपरमिल पूर्ववत सुरु होऊन उत्पादनाला सुरुवात होणार, या आनंदाने कामगारांचे चेहरे खुलून गेलेत. पेपरमिल कामगारांना कितीतरी दिवसांपासून याचीच वाट लागली होती.बॉयलर आज सुरु झाले आहे. कागदाचे प्रत्यक्ष उत्पादन दोन दिवसांनी सुरु होणार असल्याचे पेपर मिलच्या एका वरिष्ट अधिकाऱ्यांनी लोकमतश्ी बोलताना सांगितले. हे मिल १५ जानेवारीला सुरु होणार अशी जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात चर्चा होती. या तारखेला सांगता येत नाही. परंतु २० ते २५ तारखेपर्यंत ते सुरु होईल कारण, एकदा मिलचे उत्पादन सुरु झाले की ते बंद होणार नाही अशी व्यवस्था करुनच मिल सुरु करायचे आहे, असे पेपरमिल सूत्राकडून सांगण्यात येत होते. त्याची आता प्रचिती येत आहे.(तालुका प्रतिनिधी)पेपर मिल सुरु व्हावे म्हणूनजिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पेपर मिल कोणत्याही स्थितीत चालू करा, असा आदेश १५ दिवसापूर्वीच जिल्हा प्रशसनाला दिला होता. बल्लारपूर इंडस्ट्रीज मजदूर संघाने पेपरमिल सुरु करा या मागणीकरिता मोर्चा काढला व बल्लारपूर बंद आंदोलन केले होते.मिलवरील संकट दूर होऊन, मील पूर्ववत चालू व्हावे याकरिता बल्लारपूर पेपरमिल मजदूर सभा आणि पेपरमिल व्यवस्थापनाने गणेश मंदिरात हवन केले होते.
पेपर मिलच्या चिमणीतून धूर निघू लागला
By admin | Published: February 09, 2017 12:38 AM