लोकमत न्यूज नेटवर्कवरोरा : शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या अत्यल्प पीक नुकसानीसंदर्भात आमदार बाळू धानोरकर यांनी टॉवरग्रस्त शेतकऱ्यांना घेऊन उपविभागीय अधिकाऱ्यांच्या दालनात रायपूर-राजनांदगाव ट्रान्समिशन कंपनीच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. सदर बैठकीत शेतकऱ्यांना पीक नुकसानीचे फेरसर्वेक्षण करून योग्य मोबदला देण्याचे मान्य करण्यात आले.शेतकऱ्यांना दिला जाणारा पीक नुकसानीचा मोबदला हा अत्यल्प असून तो केव्हा मिळणार याबाबत शेतकऱ्यांमध्ये शांसकता होती. तसेच ट्रान्शमिशन लाईनच्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या पीक नुकसानीचे केलेल्या सर्व्हेक्षणावरती शेतकऱ्यांचा आक्षेप होता. सदर बैठकीदरम्यान उपविभागीय अधिकारी वरोरा यांच्या समक्ष पीक नुकसानीचे पुन:सर्व्हेक्षण करून त्यांना योग्य पीक नुकसान देण्याचे ट्रान्समिशन लाईनच्या अधिकाऱ्यांनी मान्य केले. तसेच ट्रान्समिशन लाईनच्या तारेखालील जाणाऱ्या विहिरीच्या नुकसानीसंदर्भात वरिष्ठ पातळीवर मोबदला देण्याकरिता मार्गदर्शन घेण्याचे मान्य केले.टॉवरग्रस्त शेतकऱ्यांना दिल्या जाणारा मोबदला हा टप्पानिहाय देण्याचे त्यांनी मान्य केले. ट्रान्समिशन लाईन खाली येणाऱ्या पिकांचे सागवान व इतर मुल्यवान झाडांचासुद्धा मोबदला दिल्या जाईल व सर्व मोबदल्याविषयीची माहिती लवकरच उपविभागीय अधिकारी वरोरा यांना सादर करण्याचे मान्य केले. तांत्रिक अडचणींमुळे ज्यांचा आर्थिक मोबदला थांबला होता. तीदेखील समस्या दूर करून येत्या काही दिवसातच त्यांना मोबदला देण्यात येईल असे यावेळी कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.बैठकीत उपविभागीय अधिकारी वरोरा प्रमोद भुसारी, तहसीलदार सचिन गोसावी, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रताप पवार, यासोबतच शिवसेना जिल्हा प्रमुख अनिल धानोरकर, सतीश भिवगडे, जिल्हा वाहतूक सेना प्रमुख प्रमोद मगरे, शिक्षक सेना जिल्हा प्रमुख राजेश नायडू, कामगार सेना जिल्हा प्रमुख जयदीप रोडे, शिवसेना उपजिल्हा प्रमुख विशाल बदखल, वासुदेव ठाकरे, भद्रावती नगर परिषदेचे उपाध्यक्ष प्रफुल्ल चटकी, मनोज पाल, वरोरा तालुका प्रमुख देवानंद मोरे, भद्रावती तालुका प्रमुख प्रवीण बांदूरकर, विलास डांगे, राजू चिकटे, पुरुषोत्तम पावडे, पद्माकर कडूकर उपस्थित होते.
पीक नुकसान मोबदल्याचे फेरसर्वेक्षण होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2018 10:37 PM
शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या अत्यल्प पीक नुकसानीसंदर्भात आमदार बाळू धानोरकर यांनी टॉवरग्रस्त शेतकऱ्यांना घेऊन उपविभागीय अधिकाऱ्यांच्या दालनात रायपूर-राजनांदगाव ट्रान्समिशन कंपनीच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली.
ठळक मुद्देबाळू धानोरकर : टॉवर प्रकरणी अधिकाऱ्यांशी सकारात्मक चर्चा