शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

बाहेरून येणाऱ्यांची होणार कडक तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 05, 2020 5:00 AM

जिल्हाधिकारी कार्यालयात अत्यावश्यक सेवांच्या संदर्भातील सर्व व्यापारी प्रतिष्ठाने, दुकानांचे मालक, होलसेल विक्रेत्यांच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले, मनपाचे आयुक्त राजेश मोहिते, अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे आदींसह सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते. जीवनावश्यक वस्तूशी संबंधित सर्व व्यापाऱ्यानी यावेळी आवश्यक मनुष्यबळ व त्यांना प्रतिष्ठानाला पोहोचण्यासाठी पोलीस विभागाचे सहकार्य मिळावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.

ठळक मुद्देकोरोनाविरूद्ध उपाययोजना। अत्यावश्यक सेवा प्रतिष्ठानातील कर्मचाऱ्यांना देणार ओळखपत्र

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्ह्यात ४ एप्रिलपर्यंत एकही पॉझिटिव्ह रूग्ण नाही. विदेशात जाऊन आल्याची नोंद असणाऱ्या १९८ लोकांचे होम क्वारंटाईन पूर्ण झाले आहे. आतापर्यंत आलल्या सर्व रूग्णांचे अहवाल निगेटिव्ह आहेत. त्यामुळे येणारे दोन आठवडे आणखी जबाबदारीने वागत आवश्यकता नसेल तर घरीच राहावे. बाहेरून येणाऱ्या नागरिकांची होणार कसून तपासणी होणार असून विशेषत: तरुणांनी यासाठी काटेकोर नियम पाळून सहकार्य करणे आवश्यक आहे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी शनिवारी केले.जिल्हाधिकारी कार्यालयात अत्यावश्यक सेवांच्या संदर्भातील सर्व व्यापारी प्रतिष्ठाने, दुकानांचे मालक, होलसेल विक्रेत्यांच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले, मनपाचे आयुक्त राजेश मोहिते, अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे आदींसह सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते. जीवनावश्यक वस्तूशी संबंधित सर्व व्यापाऱ्यानी यावेळी आवश्यक मनुष्यबळ व त्यांना प्रतिष्ठानाला पोहोचण्यासाठी पोलीस विभागाचे सहकार्य मिळावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. जीवनावश्यक वस्तू निर्मिती, विक्री व दुरूस्तीच्या संदर्भात काम करणाऱ्या सर्व प्रतिष्ठानच्या कर्मचाºयांना ओळखपत्र देण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी केल्या. मात्र शक्य असेल तर या कर्मचाºयांना पायी येण्याबाबत निर्देश द्यावेत. रस्त्यांवर दुचाकींची संख्या अधिक झाली असून यामुळे सामाजिक अंतर राखणे कठीण होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. जिल्ह्याच्या सर्व सीमा बंद करण्यात आल्या आहे. मात्र अन्य राज्यातून येणारे अत्यावश्यक सामान, भाजीपाला, दूध, औषधी व अन्य वैद्यकीय सामानांचे वहन करणारे व यामध्ये सहभागी असणाऱ्या नागरिकांची आवश्यक ती तपासणी करण्यात येणार आहे. नागरिकांच्या आरोग्यासाठीच हे पाऊल उचलण्यात आले.त्यामुळे नागरिकांनी लॉकडाऊनचे उल्लंघन न करता जिल्हा प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. खेमनार यांनी बैठकीत केले.१९८ जणांची तपासणी, एकही पॉझिटीव्ह नाहीजिल्ह्यात एकही पॉझिटिव्ह रूग्ण नसून केवळ विदेशातून आलेले सहा नागरिक आता निगराणीखाली आहेत. १९८ लोकांना तपासणीअंती धोक्याबाहेर घोषित करण्यात आले आहे. सध्या केवळ एक परदेशातून आलेला नागरिक इन्स्टिट्युशनल क्वारंटाईनमध्ये असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी राजकुमार गहलोत यांनी दिली.वनसडीच्या महिलांकडून कापडी मास्क निर्मितीकोरपना : कोरोना आजारावर प्रतिबंधात्मक उपाययोजनेसाठी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानतंर्गत कापडी मास्क तयार करण्याचे काम वनसडी येथील सखी महिला ग्रामसंघाच्या १३ महिलांकडून केले जात आहे. या उपक्रमामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील महिलांना स्वयंरोजगाराची संधी मिळाली आहे. हा प्रकल्प जिल्हा परिषदेच्या माध्यमातून राबविला जातो.जीवनावश्यक वस्तूच्या वाहनांना ऑनलाईन ई-पासचंद्रपूर : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यामध्ये १४ एप्रिलपर्यंत लॉकडाऊन आहे. त्यामुळे जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करणारे वाहने व अत्यावश्यक सेवा देणाऱ्या वाहनांसाठी आरटीओ मार्फत ई-पास देण्यात येणार आहे. यासाठी ट्रान्टपोर्ट महाराष्ट्र या संकेतस्थळावर संबंधित वाहनधारकांना अर्ज करता येते, अशी माहिती आरटीओ कार्यालयाने दिली.बाजार समितीतील गर्दीवर नजरकृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होत असून ही बाब अतिशय धोकादायक आहे. याठिकाणी तातडीने उपाययोजना करून सामाजिक अंतर राखावे. जिल्ह्यामध्ये सध्या एकही रुग्ण नसताना बाहेरून येणारा धोका पत्करायचा नाही. त्यासाठी सीमावर्ती भागातील नाकाबंदी आणखी भक्कम करणे व वैद्यकीय तपासणी वाढविणे आवश्यक असल्याचेही जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.एचआयव्ही बाधितांसाठी समुपदेशक धावणारलॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर एचआयव्ही बाधित रूग्णाला एआरटी औषधोपचार घेण्यास खंड पडू नये व जिल्हास्थळी एआरटी केंद्रात येण्यास त्रास होऊ नये, याकरिता नॅशनल एड्स कंट्रोल संस्था व राज्य एड्स नियंत्रण संस्था, मुंबई यांच्या निर्देशानुसार जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निवृत्तीनाथ राठोड यांच्या सूचनेनुसार जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण पथक, सामान्य रूग्णालयाने अशा रूग्णांना त्यांच्याच तालुक्यात एआरटी औषध उपलब्ध करून दिले. त्यामुळे जिल्हास्थळी न येता तालुकास्थळी ग्रामीण रूग्णालयाच्या एचआयव्ही विभागातील समुपदेशकांशी संपर्क साधवा, असे आवाहन जिल्हा कार्यक्रम अधिकारी सुमंत पानगंटीवार यांनी केले आहे.कृषी केंद्र सुरूच राहणारशेतकऱ्यांच्या शेतीविषयक कामांमध्ये अडथळा येऊ नये, यासाठी ट्रॅक्टरसह दुचाकीपर्यंतच्या सर्व शोरूम सुरू करण्याचे निर्देश दिले. इलेक्ट्रिशियन, प्लंबर, मेकॅनिक यांनी स्वत:जवळचे ओळखपत्र दाखवून आवश्यक सेवा नागरिकांना द्यावी. पोलिसांना तशा सूचना देण्यात आले असल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.