चंद्रपूर : ग्रामीण भागातील नागरिकांना शुध्द, सुरक्षित, मुबलक व स्वच्छ पिण्याचे पाणी मिळावे, तसेच जलजन्य रोगांच्या प्रादुर्भावावर नियंत्रण ठेवले जावे, यासाठी जिल्हा परिषदेमधील पाणी व स्वच्छता विभागामार्फत जिल्हयातील पाणी गुणवत्ता सनियंत्रण कार्यक्रम राबविला जातो. या कार्यक्रमांतर्गत जिल्हयातील १४ हजार ९७१ पिण्याच्या पाण्याचे स्त्रोतांचे सर्वेक्षण मोहीम १ आक्टोंबर ते ३१ ऑक्टोबर २०१९ या कालावधीत राबविण्यात येणार आहे.पिण्याचे पाणी, परिसर आणि वैयक्तीक स्वच्छता या घटकांचा आरोग्याशी संबंध आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना शुध्द व स्वच्छ पाणी पुरवठा होण्यासाठी पाणी गुणवत्ता चांगली असणे आवश्यक आहे. पाणी गुणवत्ता व सनियंत्रण कार्यक्रमामध्ये स्वच्छता सर्वेक्षणाचे महत्व अनन्यसाधारण असून वैयक्तीक सवयी व सार्वजनिक स्वच्छता, नळ पाणी पुरवठा यंत्रणेतील तांत्रिक दोष, देखभाल व दुरुस्ती या कारणांमुळे पाणी दूषित होते. हे दूषित पाणी पिण्यास वापरल्याने विविध जलजन्य आजार होऊ शकतात.त्यामुळे जिल्हयातील प्राथमिक आरोग्य केंद्राकडून त्यांच्या कार्यक्षेत्रात असणाऱ्या सर्व गावांतील पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांचे सर्वेक्षण १ ऑक्टोबर ते ३१ ऑक्टोबर २०१९ या कालावधीत मोहीम स्वरुपात केले जाणार आहे. पिण्याच्या पाण्यामध्ये आढळून आलेले दोष नष्ट करुन साथरोगास प्रतिबंध केला जातो. पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत सुरक्षित राहावे, यासाठी शुध्दीकरण व प्रयोगशाळेत पाणी नमुन्याची तपासणी केली जाते. पाणी गुणवत्ता, सनियंत्रण व स्वच्छता सर्वेक्षण कार्यक्रमाअंतर्गत शुध्द पाणी पुरवठा करणाऱ्या ग्रामपंचायतींना हिरवे कार्ड दिले जाते. दूषित पाणी पुरवठा करणाºया ग्रामपंचायतींना लाल तर पाणी स्त्रोताभोवती अस्वच्छता असलेल्या ग्रामपंचायतींना पिवळे कार्ड दिले जाते.पाणी हा महत्त्वाचा घटकमानवी आहारात पाणी हा घटक महत्त्वाचा आहे. त्यामुळे पाण्याची गुणवत्ता राखण्याकडे आरोग्य विभागाने लक्ष केंद्रित केले आहे. गावांच्या वैयक्तीक सवयी, पाण्याचा वापर, सांडपाण्याचा निचरा, पाणी पुरवठा योजनेतील दुरुस्ती आणि देखभाल या बाबी यात महत्त्वाच्या मानल्या जातात.आपल्या गावातील ग्रामस्थांचे आरोग्य चांगले राहावे, याकरिता व गावात कोणताही जलजन्य आजार होऊ नये याकरिता जलसुरक्षक यांनी गावातील प्रत्येक पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांचे सर्वेक्षण करुन घ्यावे, पाणी नमुने गोळा करुन ते प्रयोगशाळेत पाठवावे. स्त्रोत दूषित असल्यास त्यावर उपाययोजना करता येईल. स्त्रोतांजवळ ग्रामस्थांनी स्वच्छता पाळावी.- विजय पचारेउपमुख्य कार्यकारी अधिकारी(पाणी व स्वच्छता) जिल्हा परिषद, चंद्रपूर.
जिल्ह्यातील १४,९७१ पाणीस्रोतांचे होणार सर्वेक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2019 12:43 AM
पिण्याच्या पाण्यामध्ये आढळून आलेले दोष नष्ट करुन साथरोगास प्रतिबंध केला जातो. पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत सुरक्षित राहावे, यासाठी शुध्दीकरण व प्रयोगशाळेत पाणी नमुन्याची तपासणी केली जाते. पाणी गुणवत्ता, सनियंत्रण व स्वच्छता सर्वेक्षण कार्यक्रमाअंतर्गत शुध्द पाणी पुरवठा करणाऱ्या ग्रामपंचायतींना हिरवे कार्ड दिले जाते.
ठळक मुद्देजि.प. चा उपक्रम : शासकीय विहिरी, हातपंप, नळ योजना यांचा समावेश