बॉक्स
विक्रेत्यांचीच गर्दी अधिक
रेल्वेगाड्यांमध्ये प्रवाशांची गर्दी होत आहे. भरीस भर म्हणून किरकोळ विक्रेतेही डब्यांमध्ये गर्दी करतात. चहा, पोहे, समोसे, स्नॅक्स विकणारे थेट डब्यांमध्ये चढून विक्री करतात. त्यामुळे आधीच गर्दी असलेल्या डब्यांमध्ये फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा उडतो.
बॉक्स
सर्वच गाड्यात स्थिती सारखीच
बल्लारपूर जंक्शनवरुन केवळ विशेष रेल्वे धावत आहेत. सर्वच रेल्वेमध्ये सारखीच स्थिती दिसून येत आहे. गणेशोत्सवाच्या पूर्वी सर्वच रेल्वेत प्रवाशांची संख्या कमी होती. मात्र आता गणेशोत्सवामुळे प्रवाशांची संख्या वाढलेली दिसून येत आहे. त्यातच मोजके बर्थ असल्याने प्रवाशांची मोठी गर्दी होत आहे.
कोट
सध्या विशेष रेल्वे धावत आहेत. त्यातही मोजक्याच प्रवाशांना प्रवास करण्याची मुभा आहे. परिणामी विशेष ट्रेनमध्ये मोठी गर्दी दिसून येते. रेल्वे मंत्रालयाने पॅसेंजर ट्रेन सुरू केल्यास या गर्दीवर नियंत्रण मिळविणे शक्य होईल.
-राजेद्र मर्दाने, अध्यक्ष रेल्वे प्रवासी संघ, वरोरा, भद्रावती