शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
3
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
4
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
5
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
6
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
7
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
8
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
9
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

चोरांची टोळी अटकेत ; कोठडीत रवानगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2017 11:56 PM

पोलीस ठाण्याच्या हद्दीत मागील दोन वर्षांपासून घरफोड्या करून धुमाकूळ घालणारी चार जणांची आंतरजिल्हा टोळी पोलिसांच्या हातात लागली आहे.

ठळक मुद्दे१० घरफोड्या उघड : ३.५० लाखांचा मुद्देमाल हस्तगत

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : पोलीस ठाण्याच्या हद्दीत मागील दोन वर्षांपासून घरफोड्या करून धुमाकूळ घालणारी चार जणांची आंतरजिल्हा टोळी पोलिसांच्या हातात लागली आहे. या टोळीने केलेल्या १० घरफोड्याही उघडकीस आल्या आहेत. या कारवाईत चोरीचा ३ लाख ५० हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.अजय केशव धकाते (४२) रा. उमरेड, भगतराम नसरू ढेकनकर (२८) रा. लिंगा जि. छिंदवाडा (मध्यप्रदेश), शुभम उर्फ लकी राजेशकुमार जैन (२६) इतवारा नागपूर, प्रमोद उर्फ मोबाईल तुम्ण गेडाम (२४) रा. रासा(घोंसा) वणी जि. यवतमाळ, अशी आरोपींची नावे आहेत. दरम्यान, शनिवारी त्यांना न्यायालयात हजर केले असता सर्व आरोपींना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. विशेष म्हणजे, आरोपींकडून पोलिसांनी काही इलेक्ट्रॉनिक वस्तूही हस्तगत केल्या आहेत.२०१६ व २०१७ या दोन वर्षात या टोळीने जैन मंदिर येथील दानपेटी, तुळाराम गजभिये रा. सुमठाना, विश्वेश्वर रघुनाथ कांबळे रा. सुरक्षानगर, नलीम अजय फुले, चंडीका वॉर्ड, प्रकाश नत्थूजी सैनाने रा. पांडववॉर्ड, अनिल परसूटकर गुरूनगर, प्राशीश ताठे रा. आशीर्वाद लेआऊट, संतोष जुनघरे झाडे प्लॉट या दहा जणांच्या घरी चोºया करून तब्बल ३ लाख ५० हजारांचा मुद्देमाल लुटण्यात आला होता. येथील ठाणेदार विलास निकम यांच्या मार्गदर्शनात गुन्हे अन्वेशन विभागाचे महेंद्र इंगळे, पोउनि किशोर मित्तलवार यांनी चौघांना अटक या टोळीचा पर्दाफाश केला. या कारवाईत राजेश वºहाडे, सचिन गुरनुले, नरेश शेरकी, हेमराज प्रधान, केशव चिटघरे यांनी मोलाची कामगिरी बजावली. या आंतरजिल्हा टोळीकडून पुन्हा गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. फिर्यादींना त्यांचा मुद्देमाल न्यायालयातून हस्तगत करता येणार आहे, अशी माहिती ठाणेदार विलास निकम यांनी दिली.