शहरं
Join us  
Trending Stories
1
यूएनच्या सरचिटणिसांना इस्रायलमध्ये प्रवेशबंदी; इराणला योग्य वेळी प्रत्युत्तर देण्याची इस्रायलची धमकी
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक व व्यावसायिक दृष्टिकोनांतून आजचा दिवस लाभदायी
3
बदलापूर बलात्कार प्रकरणात मोठी कारवाई, त्या शाळेच्या दोन फरार पदाधिकाऱ्यांना अखेर अटक
4
मविआतील लहान घटक पक्षांना हव्यात ४० जागा; प्रस्तावावर ७ आणि ८ ऑक्टोबरला पुन्हा चर्चा
5
अजित पवार गटाला हव्यात महायुतीतील ६५ ते ६८ जागा; अमित शाह यांच्याकडे आग्रही मागणी
6
मुलगी जर दिसायला चांगली असेल तर... अजित पवार समर्थक आमदार देवेंद्र भुयार यांचे सभेत वादग्रस्त विधान
7
स्वस्त पेट्राेल-डिझेल आता विसरा; युद्धाचे ढग; कच्च्या तेलाचे दर वाढले
8
मुंबईकर सरफराझ खानचे ऐतिहासिक नाबाद द्विशतक
9
माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांचे निधन
10
नाेकऱ्या अन् पगारवाढही! पण, उत्पादन क्षेत्रातील वाढ नीचांकावर
11
मराठीला अभिजात दर्जासाठी अवघ्या 26 आमदारांनीच दाखविला रस
12
मानवरहित सौर ऊर्जा बोटीद्वारे कचरा संकलन; समुद्र होणार चकाचक
13
आहारामुळे विद्यार्थ्यांची आबाळ; शिक्षणमंत्री मध्यरात्री आले; झोपलेल्या मुलांना उठवून गेले
14
‘एमएमआरडीएचे अधिकारी संवेदनशील का नाहीत?’ आयुक्तांनी उपस्थित राहून स्पष्टीकरण द्यावे
15
देहविक्रयासाठी थायलंडच्या मुलीचा पाच हजारांत सौदा; ठाण्यात चौघांना अटक
16
लोकसभेत महायुतीने भिवंडीत ‘सिंह’ गमावला आता गड राखण्याचे आव्हान
17
“अमित शाह यांना दररोज नमस्कार केला पाहिजे”; चंद्रकांत पाटील यांनी सांगितले कारण
18
Video: जपानच्या विमानतळावर अमेरिकन बॉम्बचा अचानक स्फोट, ८७ विमान उड्डाणे रद्द
19
X युजर्सना यापुढे 'ही' सुविधा मिळणार नाही; इलॉन मस्क यांनी केली घोषणा, काय बदलले? पाहा...
20
Harbhajan Singh, IPL 2025 Auction: ना विराट, ना रोहित... 'या' भारतीयावर IPLमध्ये लागेल ३०-३५ कोटींची बोली; भज्जीचा मोठा दावा

जिवतीत चोर बिटी बियाण्यांनी केला शेतकऱ्यांचा घात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 05, 2018 12:32 AM

बळीराजाच्या डोक्यावर आधीच आर्थिक संकट कोसळले असताना आता चोर बिटी बियाण्यांनी घात केला आहे. जिवती ताललुक्यातील पाटण परिसरात चोर बिटी बियाण्यांमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.

ठळक मुद्देत्या वनकर्मचाऱ्यांकडून चोर बिटीची अवैध विक्री : शेतकऱ्यांची फसगत, बियाणे विकणाºयांवर कारवाई करा

फारूख शेख।लोकमत न्यूज नेटवर्कपाटण : बळीराजाच्या डोक्यावर आधीच आर्थिक संकट कोसळले असताना आता चोर बिटी बियाण्यांनी घात केला आहे. जिवती ताललुक्यातील पाटण परिसरात चोर बिटी बियाण्यांमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.आदिवासीबहुल जिवती तालुक्यातील पाटण, नंदप्पा, कोलांडी, खडकी, हिरापूर, गोंदापूर येथील शेतकऱ्यांनी पाटण येथील एका वन कर्मचाऱ्यांच्या आमिषाला बळी पडून कापसाचे अवैध चोर बिटी बियाण्यांची खरेदी केली व शेतात लागवड केली. या बियाण्यांमुळे निंदनाचा खर्च कमी येतो, फवारणी करून गवत नाहिसे केले जाते, कापसाला काही होत नाही, कमी खर्चात जास्त पीक हाती येते, असे सांगून पाटण येथील एका वन कर्मचाऱ्याने शेतकऱ्यांना अवैधरित्या चोर बिटी बियाणे विकले. मात्र या बियाण्यांनी आता आपला रंग दाखविला आहे. शेतकऱ्यांच्या शेतातील कापसाला दोन-चार बोंडेच लागली असून शेतकरी आर्थिक विवंचनेत सापडला आहे. प्रस्तुत प्रतिनिधीने शेतकरी परशुराम वैलादी रा. नंदप्पा या शेतकºयाच्या शेतात भेट दिली असता त्याने आपली आपबिती सांगितली. आपली फसगत करणाऱ्या त्या वन कर्मचाऱ्याची तक्रार करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.चोर बिटीवर बंदीजे कापसाचे वाण शासनातर्फे प्रमाणित नाही, अशा वाणांना बंदी घातली आहे. परंतु जिल्ह्यात काही एजंटकडून पैशाच्या हव्यासापोटी बंदी असलेल्या चोर बिटी बियाण्यांची विक्री केली जात आहे. याकडे कृषी विभागही कानाडोळा करीत आहे.चुकीच्या औषध फवारणीमुळे कपाशी करपलीआक्सापूर : कृषी केंद्राने चुकीची व मुदतबाह्य कीटकनाशक औषधे पुरविली. ही औषधे फवारल्यामुळे चार एकरातील कपाशी करपली.गोंडपीपरी तालुक्यातील चेकपिपरी येथील अल्पभूधारक शेतकरी रामचंद्र झाडे यांना भंगाराम तळोधी येथील सतीश कृषी केंद्राकडून चुकीची व मुदताबाह्य कीटकनाशक औषध पुरविण्यात आली. हंगामाच्या शेवटी तोंडातील घास हिरावल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. रामचंद्र झाडे यांनी २२ सप्टेंबरला भंगाराम तळोधी येथील सतीश कृषी केंद्र येथून बुम फ्लावर, मोनो व ग्रोमोक्सोवन व सोबत तणनाशक असे दोन हजार २०० रुपयांचे औषध खरेदी केले. या औषधाचे बिल मागितले असता जवळच्या व्यक्तीला बिलाची काय आवश्यकता, असे म्हणून बिल दिले नाही. शेतकऱ्याने ३० सप्टेबरला फवारणी केली व लगेच दुसऱ्या दिवशी शेतात जाऊन बघितले असता संपूर्ण कपाशी करपून गेली होती. ते बघून रामचंद्र झाडे यांना धक्काच बसला. पीक गेल्याने शेतकऱ्यांवर मोठे आर्थिक संकट ओढवले आहे. झाडे यांनी कृषी विभाग गोंडपिपरी यांच्याकडे तक्रार केली असून कृषी केंद्रावर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती