लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : विविध पोलीस स्टेशन अंतर्गत चोरीच्या गुन्ह्यातील एकूण १५ दुचाकी व चारचाकी वाहने हस्तगत करण्यात आली असून चार लाख ४० हजार रूपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. यात तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी पत्रकार परिषदेत दिली.वरोरा येथील पोलीस पथकाने चोरीच्या गुन्ह्यातील क्र. एम. एच. ३४ व्ही ०५४९, क्र. एमएच ३४ व्ही ७५४९ हिरो होंडा क्र. एम एच ३४ एन ५२ ४०, हिरो होंडा स्प्लेंडर क्र. एम एच ३४ क्यु ३१५, हिरो होंडा स्प्लेंडर क्र. एम एच ३४ ए १६१३, हिरो होंडा सीडी डिलक्स क्र. एम. एच. क्र. ३४ एक्स ८४७०, हिरो होंडा सीडी डिलक्स क्र. एम एच ३४ ए एम ८४८९ या क्रमांकाची वाहने जप्त केली. यात एका जणाला वरोरा पोलिसांनी अटक केली, असे डॉ. रेड्डी यांनी सांगितले. पोलीस स्टेशन रामनगर येथील गुन्हे पथकाने त्यांच्या हद्दीतून चोरीस गेलेल्या हिरो होंडा स्प्लेंडर क्र. एम एच ३४ पीबी ३१८, अप क्र. १०७६/१८ माी हिरा होंडा स्प्लेंडर क्र. एम एच ३४ एएम ४५९० अप क्र. ११०५/१८ मधील केटीएम क्र. एमउच ३४ बीके ३२१७, अप क्र. १११५/१८ मधील मारोती सुजीकी अल्टो क्र. एम एच ३४ सीएम ७७८४ या क्रमांकाच्या मोटरसायकल हस्तगत केल्या. दुर्गापूर येथील पथकाने हिरो होंडा स्प्लेंडर क्र. एम. एच ३४ एस ५४५ ही मोटरसायकल जप्त केली.
वाहने चोरणारी टोळी पडकली, १५ वाहने जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2018 1:08 AM
विविध पोलीस स्टेशन अंतर्गत चोरीच्या गुन्ह्यातील एकूण १५ दुचाकी व चारचाकी वाहने हस्तगत करण्यात आली असून चार लाख ४० हजार रूपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. यात तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे,.....
ठळक मुद्देपोलीस अधीक्षकांची माहिती : तीन जणांना अटक