परिमल डोहणे
चंद्रपूर : शहरात मागील अनेक दिवसांपासून चोरीच्या घटनेत वाढ झाली. आता तर चोरट्यांनी चक्क बांधकाम करण्याकरिता लागणारी मिक्सर मशीन चोरी केल्याचा प्रकार चंद्रपुरात समोर आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. तर एक फरार आरोपीचा शोध सुरु आहे. गुड्डू उर्फ कमल उर्फ राहुल श्रवण निषाद (33) रा.अष्टभुजा वार्ड चंद्रपूर, विशाल मारोती मडावी (33) रा. विरुर असे अटकेतील आरोपीचे नाव आहेत.
14 एप्रिलला सायंकाळी 5.30 वाजता रोहित कुमार देवांगण (43) रा. बाबूपेठ यांनी बिल्डिंग मटेरियल मिक्सर मशीन चंद्रपूर-बल्लारपूर रोडवर उभी ठेवली होती. दुसऱ्या दिवशी 15 एप्रिलला सकाळी ती मिक्सर मशीन गायब दिसली. त्यांनी सर्वत्र शोध घेतला. मात्र ती मशीन कुठेही आढळून आली नाही. त्यांनी 18 एप्रिलला चंद्रपूर शहर गाठून तक्रार दिली. पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. दरम्यान गुन्हे शोध पथकाचे सपोनि मंगेश भोंगाडे यांनी आपल्या चमुसह परिसरातील विविध सीसीटीव्ही कॅमेरे तपासून बघितले असता निळ्या रंगाच्या ट्रॅक्टरच्या मागे टोल लावून मिक्सर मशीन नेताना आढळून आले.
याबाबत अधिक तपास केला असता सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दिसलेली मिक्सर मशीन दुर्गापूर परिसरातून चोरी केली असल्याचे समोर आले पोलिसांनी अधिक तपास करत गुड्डू उर्फ कमल उर्फ राहुल श्रवण निषाद व विशाल मारोती मडावी या दोघांना ताब्यात घेत त्यांच्याजवळून शहर पोलिस ठाण्याअंतर्गत चोरी केलेली एक जुनी वापरती स्लॅप ढलाई काँक्रीट लिफ्ट मशीन, दुर्गापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतून चोरी केलेली केसरी रंगाची एक जुनी वापरती स्लॅप ढलाई काँक्रीट लिफ्ट मशीन व गुन्हयात वापरलेला एक जुना वापरता टॅक्टर (एम.एच. ३४ बि. आर. ४५४१) असा एकूण सात लाख रुपयांचा मुद्देमाल आरोपीकडून जप्त करण्यात आला. या प्रकरणील एक आरोपी फरार असून त्याचा तपास सुरु आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक रविद्रसिंह परदेसी, अप्पर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु , उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर नंदनवार मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सतीषसिंह राजपुत, सहाय्यक पुलिस निरीक्षक मंगेश भोंगाडे यांचे नेतृत्वात गुन्हे शोध पथक कर्मचारी शरीफ शेख, विलास निकोडे, महेंद्र बेसरकर, जयंत चुनारकर, सचीन बोरकर, संतोष पंडित, चेतन गजललवार, इम्रान खान, इर्शाद खान, दिलीप कुसराम ,संतोष कावड़े, रूपेश रणदिवे यांनी केली. पुढील तपास पोहवा महेंद्र बेसरकर करीत आहे.