लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : नववर्षाच्या उत्सवी पर्वावर पोलिसांनी विविध ठिकाणी नाकाबंदी करून जिल्ह्यातील ३१ मद्यपी वाहनचालकांना अटक केली आहे.जिल्ह्यात नववर्षाचे स्वागत मोठ्या धुमधडाक्यात करण्यात आले. जिल्ह्यात अनेक ठिकाणी लहान-मोठ्या पार्ट्यांचे आयोजन झाले. नववर्षाची सुरूवात शांततेत व्हावी, यासाठी पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या मार्गदर्शनात जिल्हाभरात मुख्य रस्त्यावर नाकाबंदी करण्यात आली होती. मद्य प्राशन करूनारस्त्यावरून बेभान गाडी चालविणाऱ्या ३१ मद्यपी वाहनचालकांना अटक करण्यात आली. यामध्ये पडोली पोलीस ठाण्याअंतर्गत ठाणेदार व्ही. एम. ढाले यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने १० आरोपी, पाथरी सहा, शेगाव व भिसी प्रत्येक तीन, वरोरा, भद्रावती, सिंदेवाही, धाबा प्रत्येकी एक, सावली व जिवती प्रत्येकी दोन वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली. शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी ठाणेदार गोटमारे यांच्या मार्गदर्शनात बागला चौक, गिरणार चौक, श्री टॉकीज, जटपूरा गेट, रामाळा तलाव याठिकाणी नाकाबंदी करून ट्रिपलसीट वाहन चालविणाºया २० वाहनचालकांवर रात्रीच्या सुमारास कारवाई करण्यात आली आहे.वाहतूक शाखेकडून १७३ वाहनचालकांविरूद्ध गुन्हाचंद्रपूर वाहतूक शाखेचे निरिक्षक जयवंत चव्हाण यांनी ३१ ला शहरात शांतता राहावी, यासाठी सकाळपासून पथकाद्वारे विशेष मोहीम राबवली. या मोहिमेतंर्गत विविध कायद्यातंर्गत १७३ वाहनचालकांवर कारवाई करून ३५ हजार ८०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. यामध्ये विना हेल्मेट वाहन चालविणारा एक, हाईट लोड सात, नो पार्किग १९, बिना सीट बेल्ट ३६, राँग साईड दोन, ट्रिपल सीट सहा, विना पीयूसी तीन, फं्रट सिट एक, फॅन्सी नंबर प्लेट पाच, विना वाहन परवाना ३२, विना कागदपत्राअभावी वाहन चालविणे ५७, इतर कारवाई दोन अशा विविध नियमानुसार १७३ वाहनधारकांवर कारवाई करण्यात आली. यावेळी ३५ हजार ८०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
‘थर्टीफर्स्ट’ला ३१ तळीरामांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 01, 2019 10:55 PM
नववर्षाच्या उत्सवी पर्वावर पोलिसांनी विविध ठिकाणी नाकाबंदी करून जिल्ह्यातील ३१ मद्यपी वाहनचालकांना अटक केली आहे.
ठळक मुद्देआरोपींमध्ये युवक सर्वाधिक : मुख्य मार्गांवर नाकाबंदी