लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्ह्यात आता एकूण बाधितांची संख्या १६ हजार १७२ झाली आहे. विशेष म्हणजे यात पुरुष बाधितांचीच संख्या अधिक आहे. आतापर्यंत नऊ हजार ८८९ पुरुषांना कोरोनाची बाधा झाली आहे तर महिलावर्ग घरीच अधिक राहत असल्याने बाधित होण्यामध्ये त्यांची संख्या कमी म्हणजे सहा हजार २७३ आहे. याशिवाय ६० वर्षांवरील तब्बल एक हजार ७८७ वृध्दांनाही कोरोनाने ग्रासले आहे.मंगळवारी १८२ नवीन बाधितांची भर पडली आहे. आतापर्यंत बाधितांची एकूण संख्या १६ हजार १७२ वर पोहोचली आहे. तसेच १३४ बाधित कोरोनातून बरे झाले आहे. कोरोना रुग्णाच्या मृत्यूने आज पुन्हा उच्चांक गाठला आहे. बाधितही दररोज आढळून येत आहेत. याउलट दिवाळीनिमित्त बाजारपेठेत गर्दी उसळत आहे. अशावेळी नागरिकांनी गाफील राहण्यापेक्षा बाजारपेठेत जाताना विशेष काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे. आतापर्यंत १३ हजार १३५ जण कोरोनातून बरे झाले आहेत.सध्या दोन हजार ७९५ बाधितांवर उपचार सुरू आहे.सहा जणांचा मृत्यूमंगळवारी जिल्ह्यात सहा कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यात चंद्रपूर शहरातील इंदिरानगर येथील ७२ वर्षीय पुरुष, बालाजी वार्ड येथील ५१ वर्षीय पुरुष, समाधी वार्ड येथील ४२ वर्षीय महिला, बल्लारपूर शहरातील लक्ष्मी नगर वार्ड येथील ६५ वर्षीय महिला, भद्रावती येथील ७१ वर्षीय पुरुष तर गडचिरोली येथील ६८ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत २४२ बाधितांचा मृत्यू झाला असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील २२६, तेलंगाणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली सात, यवतमाळ पाच, भंडारा एक आणि वर्धा येथील एका बाधिताचा समावेश आहे.ग्रामीण भागातील बाधितबल्लारपूर तालुक्यातील लक्ष्मी नगर वार्ड, बिल्ट कॉलनी परिसर, झाकीर हुसेन वार्ड, विसापूर, विवेकानंद वार्ड, सुभाष वार्ड, गांधी वार्ड, दादाभाई नौरोजी वार्ड, गणपती वार्ड, बामणी, संतोषीमाता वार्ड भागातून बाधित ठरले आहे. वरोरा तालुक्यातील अभ्यंकर वार्ड, डोंगरगाव रेल्वे, जाजू हॉस्पिटल परिसरातून पॉझिटीव्ह पुढे आले आहे. ब्रह्मपुरी तालुक्यातील विद्यानगर, शेष नगर, देलनवाडी परिसरातून बाधित ठरले आहे.चंद्रपुरात येथे सापडलेले नवे बाधितचंद्रपूर शहरातील व परिसरातील गजानन मंदिर वार्ड, चव्हाण कॉलनी परिसर, सरकार नगर, तुकडोजी नगर, कृष्णा नगर, नगिना बाग, साईबाबा वार्ड, बापट नगर, गांधी नगर, बाबुपेठ, दुर्गापूर, ताडाळी, भिवापूर, जयराज नगर, हॉस्पिटल वार्ड, शिवाजीनगर, तुकूम, सुमित्रा नगर, ओम नगर, जटपुरा गेट परिसर, विठ्ठल मंदिर वार्ड, उत्तम नगर भागातून बाधित पुढे आले आहे.तालुक्यात सापडलेले नवे बाधितजिल्ह्यात मंगळवारी पुढे आलेल्या बाधितांमध्ये ११८ पुरूष व ६४ महिलांचा समावेश आहे. यात चंद्रपूर शहर व परिसरातील ५५, बल्लारपूर तालुक्यातील २०, चिमूर तालुक्यातील चार, मूल तालुक्यातील तीन, गोंडपिपरी तालुक्यातील एक, कोरपना तालुक्यातील १०, ब्रह्मपुरी तालुक्यातील १०, नागभीड तालुक्यातील पाच, वरोरा तालुक्यातील आठ, भद्रावती तालुक्यातील ३५, सिंदेवाही तालुक्यातील आठ, राजुरा तालुक्यातील १०, गडचिरोली ११ तर यवतमाळ व गोंदिया येथील प्रत्येकी एक असा समावेश आहे.
बाधितांपैकी ९, ८८९ बाधित पुरुष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2020 5:00 AM
मंगळवारी जिल्ह्यात सहा कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यात चंद्रपूर शहरातील इंदिरानगर येथील ७२ वर्षीय पुरुष, बालाजी वार्ड येथील ५१ वर्षीय पुरुष, समाधी वार्ड येथील ४२ वर्षीय महिला, बल्लारपूर शहरातील लक्ष्मी नगर वार्ड येथील ६५ वर्षीय महिला, भद्रावती येथील ७१ वर्षीय पुरुष तर गडचिरोली येथील ६८ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत २४२ बाधितांचा मृत्यू झाला असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील २२६, तेलंगाणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली सात, यवतमाळ पाच, भंडारा एक आणि वर्धा येथील एका बाधिताचा समावेश आहे.
ठळक मुद्दे६२७३ महिला पॉझिटिव्ह : १७८७ ज्येष्ठांनाही बाधा