शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
4
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
5
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
8
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
9
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
10
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
11
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
12
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
13
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
14
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
15
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
16
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
17
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
18
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
19
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल

संघभूमीला हजारो धम्मबांधवांचे वंदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 01, 2020 6:00 AM

सम्राट अशोकाच्या काळापासून बौद्ध भिक्खूू व उपासक उपासिकांच्या साधना अधिष्ठान करण्याची भूमी अशी ओळख असलेल्या या साधनाभूमीत मागील २५ वर्षांपासून महाराष्ट्र उपासक -उपासिका संघाच्या वतीने आयोजित केला जात असलेल्या द्विदिवसीय धम्म समारंभाकरिता महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो धम्मबांधवांचे थवे दाखल झाले होते.

ठळक मुद्देमहामानवाचा जयघोष : संघारामगिरीत अवतरले निळ्या पाखरांचे थवे

लोकमत न्यूज नेटवर्कचिमूर : अस्पृश्यता लादलेल्या समाजाला अंध:कारातून युगप्रवर्तकाने ज्ञानाच्या प्रकाशात आणले. ३१ जानेवारी १९२० रोजी बाबासाहेबांनी 'मूकनायक ' हे मुखपत्र काढून मुक्तीचा संग्रामाची सुरुवात केली होती. पिढयानपिढया आंधळ्या असणाऱ्या समाजाला समतेचा सूर्य दाखविला. याच दिनाच्या ९९ व्या वर्षपूर्तीनिमित्त ३१ व ३१ जानेवारीला तपोभूमी संघराम गिरी येथे या धम्म मेळाव्याचे आयोजन करण्यात येत आहे. या धम्म क्रांतीचे साक्षीदार होण्यासाठी महाराष्ट्रातील धम्म बांधवानी या ऐतिहासिक भूमीत येऊन वंदन केले.सम्राट अशोकाच्या काळापासून बौद्ध भिक्खूू व उपासक उपासिकांच्या साधना अधिष्ठान करण्याची भूमी अशी ओळख असलेल्या या साधनाभूमीत मागील २५ वर्षांपासून महाराष्ट्र उपासक -उपासिका संघाच्या वतीने आयोजित केला जात असलेल्या द्विदिवसीय धम्म समारंभाकरिता महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो धम्मबांधवांचे थवे दाखल झाले होते. बुधवारी दिवसभर विविध कार्यक्रम पार पडले. रात्रभर बौद्ध अनुयायी मुक्कामी होते. महास्थावीर भदंत ज्ञानज्योती यांनी अष्ठशील वंदन केले. याप्रसंगी मंचावर समारंभाचे अध्यक्ष महास्थविर शिलानंद व देश-विदेशातील भिक्खू उपस्थित होते.विपश्यनेतून मानवी जीवनाचे कल्याण - महास्थवीर शिलानंदसमग्र मानव जातीचे कल्याण भगवान बुद्धांच्या धम्म आचरणातून होते व त्रिशरण, पंचशील अंगिकारून एक आदर्श व्यक्तिमत्व निर्माण होते. तथागतांच्या प्रणालीनुसार विपश्यना करून आपल्याला स्वत: वर नियंत्रण मिळविता येत असून अनुयायांनी विपश्यनेत सामील व्हावे, विपश्यना ही मानवी जीवनाचे कल्याण करणारी महत्त्वाची प्रणाली आहे, असे प्रतिपादन समारंभाचे अध्यक्ष महास्थवीर शिलानंद धम्मबांधवाना मार्गदर्शन करताना केले.धम्म चळवळ गतिमान करा- भदंत ज्ञानज्योतीडॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिक्षाभूमीवरील धम्मदीक्षा समारोहातून अनुयायांना संबोधित करताना बौद्धमय भारत निर्माण करण्याचे स्वप्न बघितले होते व अनुयायांना संदेश दिला होता. त्याच स्वप्नपूर्तीसाठी तुमची जबाबदारी व समाजाप्रति असलेली जाणीव ओळखून बौद्धमय भारत निर्माण करण्यासाठी धम्म चळवळ गतिमान करा, असा संदेश भिक्खू संघ, संघरामगिरीचे संघनायक महास्थविर भदंत ज्ञानज्योती यांनी उपस्थित धम्मबांधवाना दिला.महामंडळाच्या विशेष बसफेऱ्यासंघरामगिरीला धम्मसमारोहाकरिता उसळणारी धम्मबांधवांची गर्दी लक्षात घेता महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या चिमूर व वरोरा आगारातून संघरामगिरीसाठी विशेष बसगाडया सोडण्यात आल्या. यासह खासगी प्रवाशी वाहतूक करणाऱ्या वाहनांची मोठी रेलचेल दिवसभर होती. शुक्रवारी सकाळी ११ वाजेपर्यंत वनविभागाच्या प्रवेशद्वारावर हजारो वाहनांची नोंद झाली होती. तर दिवसभर वाहनांची संघरामगिरीच्या मार्गाने वर्दळ कायम होती.प्रशासनाकडून कडेकोट सुरक्षाधम्म समारंभाकरिता येणाऱ्या धम्मबांधवांच्या सुरक्षेसाठी व कायदा सुव्यवस्था ठेवण्यासाठी प्रशासनाकडून कडेकोट सुरक्षा व्यवस्था करण्यात आली होती. वन विभागाकडून सहायक वनसंरक्षक अमोल जाधव यांच्या मार्गदर्शनात वनपरिक्षेत्र अधिकारी, वनकर्मचारी, वनमजुर व व्याघ्र संरक्षण दलाचे पथक तैनात केले होते. मुख्य समारंभाचे ठिकाणी पोलीस विभागाकडून ठाणेदार सुधीर बोरकुटे यांच्या नेतृत्वात पोलिस कर्मचाऱ्यांची चमू तैनात होती.