लोकमत न्यूज नेटवर्कचिमूर : बौद्ध धम्मगुरू व अनुयायांना ध्यान व साधना करण्यासाठी संघारामगीरी येथील महाप्रज्ञा साधनाभूमीत धम्म सभारंभाच्या निमित्ताने गुरूवारी शेकडो धम्म बांधवांचे जथ्ये आणि भिक्खू संघ दाखल झाले आहेत. दोन दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमात प्रबोधनात्मक कार्यक्रमांची रेलचेल राहणार आहे. शुक्रवारी मुख्य समारोह होणार असल्याने आयोजनांकडून जय्यत तयारी करण्यात आली.भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ३१ जानेवारी १९२० रोजी ‘मूकनायक’ हे मुखपत्र सुरू केले. अंधारात चाचपडणाऱ्या शोषित व वंचितांच्या हजारो पिढ्यांना या मुखपत्राने वाचा दिली आणि समतेचा सूर्य दाखविला. या ऐतिहासिक दिनानिमित्त महामानवाच्या कार्याला वंदन करण्यासाठी महाराष्ट्र उपासक-उपसिका संघाच्या वतीने संघारामगिरीच्या पहाडीवर धम्म समारंभ आयोजनाची परंपरा आहे.आरोग्य पथक सज्जसंघरामगिरीत येणाऱ्या हजारो बौद्ध बांधवांना आरोग्यसेवा देण्यासाठी वैद्यकीय संघटनांनी पुढाकार घेतला. या परिसरात २४ तास आरोग्यसेवा पुरविण्याकरिता आरोग्य पथक सज्ज ठेवण्यात आले आहे.पिण्याचे पाणी व भोजनदानसंघरामगीरीत येणाऱ्या हजारो अनुयानांना आयोजक संस्था आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या वतीने कार्यक्रमस्थळी पिण्याचे पाणी व भोजनाची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.स्वच्छतेकरिता स्वयंसेवकदोन दिवसीय कार्यक्रमात संघरामगिरीत हजारो बौद्ध अनुयायी सहभागी होतात. त्यामुळे या ठिकाणी समता सैनिक दल व परिसरातील विविध सामाजिक संघटनांकडून स्वच्छतेची कामे केली जातात. शौचालय व स्नानगृहे उभारण्यात आले. परिसर स्वच्छ राहावा, या हेतुने स्वयंसेवकांची नियुक्ती करण्यात आली आहे.
हजारो धम्मबांधव घेणार संघारामगिरीतून प्रेरणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2020 6:00 AM
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ३१ जानेवारी १९२० रोजी ‘मूकनायक’ हे मुखपत्र सुरू केले. अंधारात चाचपडणाºया शोषित व वंचितांच्या हजारो पिढ्यांना या मुखपत्राने वाचा दिली आणि समतेचा सूर्य दाखविला. या ऐतिहासिक दिनानिमित्त महामानवाच्या कार्याला वंदन करण्यासाठी महाराष्ट्र उपासक-उपसिका संघाच्या वतीने संघारामगिरीच्या पहाडीवर धम्म समारंभ आयोजनाची परंपरा आहे.
ठळक मुद्देधम्मसमोराहाला सुरूवात : मुख्य कार्यक्रमात उसळणार गर्दी