बॉक्स
दंडाची थकबाकी वाढली
वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यावर ऑनलाईन चालान फाडण्यात येते. ते चालान भरण्यासाठी चालकाला काही अवधी दिला जातो. मात्र, अनेकजण त्याकडे कानाडोळा करतात. त्यामुळे दिवसेंदिवस दंडाची रक्कम वाढतच जात आहे. एकदा दंड केल्यानंतर वाहतूक विभागाकडे कुठलीही विचारणा केली जात नाही. त्यामुळे वाहनचालकसुद्धा दंडाला गांभीर्याने घेत नाहीत.
बॉक्स
कसे फाडले जाते ई चालान
नियमांचे उल्लंघन करणाऱ्याविरुद्ध कारवाई करताना वाहतूक पोलीस चिरीमिरी घेतात, असा नेहमीच आरोप होतो. त्यामुळे ऑनलाईन चालान ही संकल्पना सुरू करण्यात आली. याअंतर्गत वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकी किंवा चारचाकी वाहनाचा फोटो काढून त्याला ऑनलाईन चालान पाठविण्यात येते. तसा भम्रणध्वनीवर संदेशही पाठविण्यात येतो. हे चालान भरण्यासाठी चालकाला कालावधी दिला जातो. मात्र अनेकजण हे चालान भरण्याकडे कानाडोळा करताना दिसून येतात.
बॉक्स
मोबाईल अपडेट केला आहे का?
उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात जोडला असलेल्या नंबरवर चालान फाडल्यानंतर मेसेज पाठविण्यात येते. त्यासाठी नंबर जोडलेला असणे गरजेचे आहे. जर आपण पूर्वी दिलेला नंबर आणि आता वापरत असलेला नंबर वेग़ळा असेल तर तो अपडेट करणे गरजेचे असते.
कोट
वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना इ-चालान पाठविण्यात येते. मात्र, अनेकांनी ई-चालान भरले नाही. अशा वाहनचालकांवर आता कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे कारवाई टाळण्यासाठी थकित ई-चालान त्वरित भरावे.
हृदयनारायण यादव, वाहतूक निरीक्षक, चंद्रपूर