शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री होताच हेमंत सोरेन यांचा मोठा निर्णय, 'मैया सन्मान योजने'संदर्भात मोठी घोषणा
2
अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात; मुकेश अंबानींनी अमेरिकेत केलं मोठं डील
3
PM Modi Salary: पंतप्रधान मोदींना दर महिन्याला सत्कार भत्ता म्हणून मिळतात केवळ 3000 रुपये, जाणूनघ्या किती आहे सॅलरी?
4
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
5
विराट कोहली सोबत World Cup ची ट्रॉफी उंचावणाऱ्या भारतीय खेळाडूचा क्रिकेटला रामराम
6
शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणाविरोधात मशीद समितीची सर्वोच्च न्यायालयात धाव; उद्या सुनावणी
7
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
8
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
9
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
10
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
11
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
12
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
13
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
14
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
15
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
16
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
17
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
18
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."
19
EVM वर पराभवाचे खापर, धनजंय मुंडेंचे काँग्रेसला खुले आव्हान; म्हणाले, “मान्य करा की...”
20
मृत्यूच्या १५ मिनिटं आधी सृष्टी आई, मावशीशी आनंदाने बोलली अन्...; कुटुंबीयांचा गंभीर आरोप

युगच्या न्यायासाठी हजारो नागरिक रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 03, 2018 11:19 PM

बहुचर्चित खंडाळा येथील युग अशोक मेश्राम या दोन वर्षीय बालकाचा गुप्तधनासाठी नरबळी घेणाऱ्या आरोपींना फाशी देण्याच्या मागणीसाठी शहरातील नागरिकांनी सोमवारी उपविभागीय अधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला.

ठळक मुद्देनरबळी प्रकरण : आरोपींना फ ाशी देण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कब्रह्मपुरी : बहुचर्चित खंडाळा येथील युग अशोक मेश्राम या दोन वर्षीय बालकाचा गुप्तधनासाठी नरबळी घेणाऱ्या आरोपींना फाशी देण्याच्या मागणीसाठी शहरातील नागरिकांनी सोमवारी उपविभागीय अधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला.युग अशोक मेश्राम अमर रहे, युगच्या मारेकºयांना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे, या मागणीचे फ लक घेऊन कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणातून सोमवारी अकरा वाजता मोर्चाची सुरूवात झाली. तत्पूर्वी खंडाळा ग्रामपंचायतमध्ये युगला गावकºयांच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. या घटनेतील सर्व दोषींना फाशीची शिक्षा द्यावी, प्रकरण अतिजलद न्यायालयात चालवावे, सरकारी वकील म्हणून अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करावी, परिसरातील सर्व मांत्रिकांना अटक करावी, आदी मागण्यांचे निवेदन प्रभारी उपविभागीय अधिकारी विद्यासागर चव्हाण यांना सादर करण्यात आले आहे. मोर्चात खंडाळा, काहाली, कन्हाळगाव, खेड चांदली व ब्रह्मपुरी शहरातील हजारो नागरिक सहभागी झाले होते. मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, केंद्रीयगृहराज्यमंत्री हंसराज अहीर, जिल्हाधिकारी कुणाल खेमणार, पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनाही पाठविण्यात आले आहे. यावेळी खंडाळा ग्रामपंचायत सरपंच नरेंद्र राखडे, उपसरपंच संदिप माटे, अमरदिप राखडे, जि. प. सदस्य डॉ. सतीश वारजुकर, विनोद झोडगे, अ‍ॅड. गोविंद भेंडारकर, उपसभापती पं. स. विलास उरकुडे, विजय डेंगे, राजेश डेंगे, आशा राखडे, शालू राखुंडे व खंडाळा ग्रामपंचायत आजी-माजी पदाधिकारी उपस्थित होते.खंडाळा गावात शुकशुकाटयुगचे आई वडिल या मोर्चात सहभागी झाले नाही. आईची प्रकृती बरी नसल्याने उपचारासाठी नागपूरला हलविल्याची माहिती गावकºयांनी दिली. युगला न्याय मिळावा आणि आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, यासाठी खंडाळा येथील गावकरी शेतीची कामे बंद ठेवून मोर्चात सहभागी झाले. त्यामुळे गावात शुकशुकाट पसरला होता.