आॅनलाईन लोकमतचंद्रपूर :
आरोपीवर विविध गुन्हेया प्रकरणातील मुख्य आरोपीने आपल्या अन्य साथीदारांंना प्रशिक्षण देऊन ठिकठिकाणी पाठविले होते. हे आरोपी अत्यंत हुशारीने एटीएम कार्ड आणि पीन क्रमांकाची चोरी करायचे. या सर्व प्रकाराची इत्थंभूत माहिती दिल्लीतील मुख्य आरोपीला दिली जात होती. त्यानंतर बनावट एटीएम कार्ड तयार करुन त्याद्वारे रक्कम लंपास करणे सुरू होते. मुख्य आरोपीविरुद्ध विविध ठिकाणी गुन्हे दाखल झाल्याची माहितीही पोलीस तपासातून पुढे आली आहे.विदर्भातून २०० एटीएमधारकांचा चोरला डेटाअमरावती : एटीएम क्लोनिंग प्रकरणातील आरोपींनी विदर्भातील तब्बल २०० खातेदारांचा एटीएम डेटा चोरल्याची माहिती पुढे आली आहे. याप्रकरणात अमरावती पोलिसांनी एकास, तर चंद्रपूर पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली. चंद्रपुरातील तीन आरोपींना अमरावती पोलीस प्रॉडक्शन वॉरन्टवर ताब्यात घेणार आहे. बँक खात्यातून परस्पर पैसे चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीतील चार आरोपींना आतापर्यंत पोलिसांनी अटक केली आहे. यातील हरीश बिस्वास, विशाल उमरे व आलोक नावाच्या आरोपीस चंद्रपूर पोलिसांनी, तर परितोष पोतदारला अमरावती पोलिसांनी दिल्ली येथून अटक केली. या चौघांची पोलीस कोठडीत चौकशी सुुरू आहे. परितोष पोतदार व विशाल उमरे हे दोघेही खातेदारांचा डेटा चोरण्यासाठी अमरावतीत आले होते. या दोघांनी अमरावतीतील ५० ते ६० जणांचे एटीएम क्रमांक व पासवर्ड दिल्लीत बसलेला बॉस बिस्वासकडे पाठविले होते, तर विदर्भातील विविध शहरातील खातेदारांचा डेटा पाठविल्याची माहिती आरोपींनी दिली आहे.