लोकमत न्यूज नेटवर्कनवरगाव : सिंदेवाही वनपरिक्षेत्रांतर्गत उपक्षेत्र नवरगाव अंतर्गत रत्नापूर, नवरगाव परिसरात तीन बिबट्यांचे दर्शन होत असल्याने व रात्री तो गावालगत येत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.मागील दोन दिवसांपासून रत्नापूर येथे सायंकाळी अगदी घरालगत बिवट येत असून मंगळवारी व बुधवारीसुध्दा वनविभागाच्या कर्मचाऱ्यांसह गावकºयांनी फटाके फोडून व लाठ्या-काठ्या सोबत घेऊ न पिटाळून लावले. मात्र, सदर बिबट दिवसभर गावाशेजारी स्मशानभूमी परिसरात दडी मारून बसतो. सायंकाळी अंधार पडताच गावालगत येतो. दोन दिवसांपूर्वीच वनविभागाच्या कर्मचाºयांनी या परिसरात कॅमेरे लावले असता बिबट कॅमेºयात कैद झाला. बिबट सायंकाळ होताच गावाशेजारी येत असल्याने नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे. मंगळवारी विश्वनाथ निकूरे यांच्या गावालगत असलेल्या शेतामध्ये आला. पुन्हा बुधवारी दोन वेळा याच शेतात आला. या परिसरात काही वावर पडीत असून त्यामध्ये बाबुळबन तयार झाल्याने लपण्यासाठी जागा निर्माण झाली. शिवाय याच परिसरातून नळयोजनेची पाईपलाईन गेली असून काही ठिकाणी लिकेज असल्याने पाणीही उपलब्ध आहे. याच परिसरालगत बिबट्याने दोन माकड व एक कुत्राही मारला. विशेष म्हणजे, अनेकजण याच परिसरात शौचास जात असल्याने रात्रीच्या वेळी धोका अधिकच वाढलेला आहे. स्थानिक कर्मचारी क्षेत्र सहाय्यक सुनिल बुटले, वनरक्षक जितेंद्र वैद्य, आर. यु. शेख, नितेश सहारे, येरमे, राजेश्री नागोसे व त्यांची संपूर्ण टिम या परिसरात दिवसरात्र गस्त घालून फटाके फोडून बिबट्याला हुसकावून लावण्याचा प्रयत्न मागील तीन- चार दिवसापासून करीत असले तरी यश आले नाही. विशेष म्हणजे, नवरगाव -रत्नापूरलगत एकूण तीन बिबटे फिरत असल्याची माहिती आहे. यामुळे गावकºयांमध्ये दहशत पसरली असून रात्री एखाद्या जनावराचे डोळे चमकले तरी बिबट आला म्हणून अख्खे गाव जमा होत आहे. त्यामुळे वनविभागाने याकडे लक्ष देण्याची मागणी आहे.नवरगावातही दर्शननवरगावलासुध्दा माळी मोहल्ल्याजवळ बिबट आल्याने नागरिकात भीती निर्माण झाली आहे. शिवाय पठाण राईस मिलजवळ नागरिकांना दोन बिबट्यांचे दर्शन अनेक वेळा झाले असून नवरगाव-रत्नापूर रस्त्यावर चार दिवसांपूर्वी रात्रीच्या सुमारास देवराव रामटेके यांच्या दुचाकीसमोर बिबट आडवा झाला. मात्र, सुदैवाने हल्ला केला नाही. आठ दिवसांपूर्वी रत्नापूर येथील पंढरी गभणे यांच्या गोºहा अंगणात बांधून असताना बिबट्याने हल्ला करून त्याला ठार केले होते.
रत्नापूर परिसरात तीन बिबट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2018 10:20 PM
सिंदेवाही वनपरिक्षेत्रांतर्गत उपक्षेत्र नवरगाव अंतर्गत रत्नापूर, नवरगाव परिसरात तीन बिबट्यांचे दर्शन होत असल्याने व रात्री तो गावालगत येत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
ठळक मुद्देरात्री गावशिवारात प्रवेश : नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण